आपण सगळेच जाणतो की फळे ही आरोग्यदायी आहेत. पण काही दुर्मिळ फळे म्हणजे जी सहज उपलब्ध होत नाहीत किंवा नियमित खाल्ली जात नाहीत. अशा फळांचे फायदे आपल्याला तितकेसे ठाऊक नसतात किंवा त्याविषयी फारशी जागरूकता नसते. ‘मलबेरी’ हे त्यापैकी एक फळ. हे अगदी छोटसं फळ चवीला अत्यंत छान असून त्याचे फायदे तर आश्चर्य वाटावे इतके मोठे आहेत. मग जाणून घेऊया मलबेरी खाण्याचे काही फायदे. ‘बेरीज’ आहारात ठेवा आणि आरोग्य सुधारा !
१. अँटिऑक्सिडंटचा मुबलक साठा:
मलबेरीच्या सगळ्या प्रकारांमध्ये अँटिऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. मलबेरीच्या फळावर करण्यात आलेल्या अभ्यासावरून असे सिद्ध झाले आहे की, ब्लॅक मलबेरीज मध्ये अधिक प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. तसेच अभ्यासातून असे दिसून आले आहे की, सिंथेटिक अँटिऑक्सिडंटला उत्तम पर्याय म्हणजे मलबेरीचे फळ होय. या ’10′ पदार्थांमधून अॅन्टीऑक्सिडंटस मिळवा आणि तंदरुस्त रहा !
२. अँटीडायबेटिक परिणाम:
मधुमेह असल्यास अनेक फळे खाण्यास बंदी असते. विशेषतः ज्या फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स अधिक आहे. परंतु, मलबेरीज मध्ये अँटीडायबेटिक गुणधर्म असल्यामुळे तुम्ही त्याचा आस्वाद अवश्य घेऊ शकता. मधुमेहींवर करण्यात आलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की मधुमेहावरीची औषधे ही मलबेरीजपेक्षा अल्प प्रमाणात उपयुक्त ठरतात. तसेच अभ्यासातून असे दिसून आले आहे की, मलबेरीज थेरपीचा hypoglycemic आणि hypolipidemic परिणाम होतात.
३. स्थूलतेला मात करणारे गुणधर्म:
वजन वाढीची चिंता वाटते का? मलबेरीजचा आहारात समावेश केल्याने वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. अभ्यासावरून असे दिसून आले आहे की, मलबेरीजमध्ये अँटी ओबेसिटी गुणधर्म असतात. उंदरावर करण्यात आलेल्या प्रयोगावरून हे सिद्ध झाले आहे. एका जाडजूड उंदराला १२ आठवडे मलबेरीची पाने आणि फळे खाण्यास दिली. त्यामुळे उंदराचे वजन कमी झाले.
४. लिव्हरमध्ये फॅट्स जमा होण्यास प्रतिबंधक:
मलबेरी हे polyphenols म्हणजेच gallic acid, chlorogenic acid, rutin आणि anthocyanins या सगळ्यांनी युक्त असे आहे. नियमित मलबेरीज खाल्याने वजन कमी होते. तसेच लिव्हर मधील लिपिड किंवा फॅट्सचे प्रमाण कमी होते. यकृतविकारांना दूर ठेवा या ’6′ नैसर्गिक उपायांनी !
५. कॅन्सरविरोधी गुणधर्म:
कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी मलबेरीज फायदेशीर ठरतात. शरीरातील फ्री रॅडिकल्स मुळे येणारा ताण हा कॅन्सर होण्याचे एक कारण आहे. मलबेरीज मुळे शरीराला घातक ठरणारी रॅडिकल्स बाहेर पडण्यास मदत होते. आहाराची ही ’6′ पथ्यपाणी सांभाळल्यास कमी होईल कॅन्सरचा धोका !
References:
1. Arfan, M., Khan, R., Rybarczyk, A., & Amarowicz, R. (2012). Antioxidant activity of mulberry fruit extracts. International journal of molecular sciences, 13(2), 2472-2480.
2. Andallu, B., Suryakantham, V., Srikanthi, B. L., & Reddy, G. K. (2001). Effect of mulberry (Morus indica L.) therapy on plasma and erythrocyte membrane lipids in patients with type 2 diabetes. Clinica Chimica Acta, 314(1), 47-53.
3. Lim, H. H., Lee, S. O., Kim, S. Y., Yang, S. J., & Lim, Y. (2013). Anti-inflammatory and antiobesity effects of mulberry leaf and fruit extract on high fat diet-induced obesity. Experimental Biology and Medicine, 238(10), 1160-1169.
4. Peng, C. H., Liu, L. K., Chuang, C. M., Chyau, C. C., Huang, C. N., & Wang, C. J. (2011). Mulberry water extracts possess an anti-obesity effect and ability to inhibit hepatic lipogenesis and promote lipolysis. Journal of agricultural and food chemistry, 59(6), 2663-2671.
5. Ou, T. T., Hsu, M. J., Chan, K. C., Huang, C. N., Ho, H. H., & Wang, C. J. (2011). Mulberry extract inhibits oleic acid‐induced lipid accumulation via reduction of lipogenesis and promotion of hepatic lipid clearance. Journal of the Science of Food and Agriculture, 91(15), 2740-2748.
6. Klaunig, J. E., Kamendulis, L. M., & Hocevar, B. A. (2010). Oxidative stress and oxidative damage in carcinogenesis. Toxicologic pathology, 38(1), 96-109.
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock