धुम्रपान सोडण्यासाठी टोबॅको पॅचेस या नावाने ओळखल्या जाणा-या निकोटीन पॅचेसचा उपाय सुचविण्यात येतो.अचानक धुम्रपान सोडताना त्रास होऊ नये यासाठी निकोटीन रिप्लेसमेंट थेअरीच्या सहाय्याने या पॅचेसमधील निकोटीनमध्ये अंशत: बदल करण्यात येतो.ज्यामुळे निकोटीन पॅचेसच्या वापरामुळे तुमच्या शरीराला निकोटीन कमी प्रमाणात घेण्याची सवय लागते व ज्याने तुमची धुम्रपान करण्याची इच्छा देखील कमी होते.कालांतराने( ८ ते १० आठवड्यांच्या कोर्सच्या कालावधीनंतर)तुम्ही धुम्रपान सोडण्यामध्ये यशस्वी होता.जाणून घ्या धुम्रपानाची सवय सोडल्यानंतर पुढील 20 मिनिटंं ते वर्षभराच्या काळात शरीरात होतात हे बदल !
आमचे एक्सपर्ट फोर्टीस मेमोरीयल रिसर्च इन्स्टीट्यूटचे इएनटी हेड अॅन्ड नेक कन्सल्टंट डॉ.प्रसंत अचर्जी यांच्याकडून जाणून घेऊयात निकोटीन पॅचेस वापरण्याचा शरीरावर काय परिणाम होऊ शकतो.
निकोटीन पॅचेस-कसे वापरावे?
निकोटीन पॅचेस दिवसातून एकदा व सामान्यत: दिवसाच्या ठराविक वेळी थेट त्वचेवर लावण्यात येतात.लक्षात ठेवा तुम्हाला हे पॅचेस स्वच्छ,कोरड्या व केसविरहीत त्वचेवर जसे की छातीचा वरचा भाग,दंड किंवा मांड्या या ठिकाणी लावावे लागतात.पॅचेस वापरुन झाल्यावर काढून टाकल्यावर दुसरा पॅच नवीन जागी लावावा.कारण पुन्हा त्याच जागी पॅच लावल्यास तुम्हाला त्रास होऊ शकतो.तसेच पॅचवर दिलेल्या सूचना देखील तंतोतंत पाळणे गरजेचे आहे.काही पॅच हे ६ ते २० आठवडे लावावे लागतात.
हे निकोटीन पॅचेस कसे कार्य करतात?
निकोटीन पॅचेस Self-adhesive असून एखाद्या बॅन्ड-एड प्रमाणे दिसतात.त्यांना दोन रींग असतात.त्यातील बाहेरील रींग त्वचेला चिकवटली जाते त्यामुळे आतील भाग त्वचेवर दाबला जातो व त्यातील निकोटीन हळूहळू त्वचेमध्ये सोडले जाते.धुम्रपानामध्ये धुर फुफ्फुसांच्या आतील अस्तरांमध्ये तात्काळ पोहचतो पण निकोटीन पॅचेस मधून निकोटीन त्वचेच्या आत व तिथून रक्तप्रवाहामध्ये जाण्यासाठी जवळजवळ तीन तास लागतात.
निकोटीन पॅचच्या माध्यमातून पुरेसे निकोटीन शरीरात गेल्यामुळे तुमची धुम्रपानाची इच्छा कमी होते.दोन आठवडे उपचार केल्यावर तुम्हाला कदाचित कमी क्षमतेचे निकोटीन पॅचेस लावावे लागू शकतात.सामान्यत: कमी क्षमतेचे निकोटीन पॅचेस लावल्यामुळे निकोटीन सोडताना जाणवणारी लक्षणे कमी होतात.यासाठी बहुतेक वेळा धुम्रपान सोडल्यामुळे सकाळी जाणवणारी लक्षणे टाळण्यासाठी २४ तास पॅच लावण्याचा सल्ला देण्यात येतो.तसेच उत्तम सेक्स लाईफसाठी धुम्रपान सोडा !हे देखील जरुर वाचा.
निकोटीन पॅचेस लावण्याचे दुष्परिणाम होतात का?
होय.निकोटीन पॅचेस लावण्याचे दुष्परिणाम नक्कीच आहेत पण ते प्रत्येक व्यक्तीनूसार निरनिराळे असू शकतात.निकोटीन पॅचेसमुळे सामान्यत: चक्कर, डोकेदुखी, मळमळ, उलटी, डायरीया, पॅच लावलेल्या ठिकाणी सूज व लालसरपणा हे दुष्परिणाम दिसू शकतात.काही केसेसमध्ये श्वास घेण्यास समस्या,तीव्र पुरळ अथवा सूज,असामान्य ह्रदयाचे ठोके अथवा लय,झटका असे गंभीर दुष्परिणाम देखील आढळून आलेले आहेत.तसेच तोंडाचे आरोग्य जपताना ही काळजी न घेतल्यास वाढेल कॅन्सरचा धोका !देखील जरुर वाचा.
निकोटीन पॅचेस वापरताना या काही गोष्टी जरुर लक्षात ठेवा.
१.जर तुम्हाला पुर्वी हार्ट अॅटेक आलेला असेल किंवा अनियमित ह्रदयाचे ठोके, छातीत कळा, अल्सर, अनियंत्रित हाय ब्लड प्रेशर, थायरॉइडचे असतुंलन, फ्रीमोक्रोमोसायटोमा किंवा त्वचा समस्या किंवा त्वचा विकार असतील तर निकोटीन पॅचेस वापरु नका.
२.जर तुम्ही गरोदर असाल किंवा गर्भधारणेसाठी प्रयत्न करीत असाल किंवा स्तनपान करणा-या माता असाल तर निकोटीन पॅचेसपासून दूर रहा कारण याचा तुमच्या बाळावर दुष्परिणाम होऊ शकतो.या स्थितीत जर तुम्ही निकोटीन पॅचेस वापरण्यास सुरुवात केली असेल तर याबाबत त्वरीत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
३.जर तुम्ही एसिटामिनोफेन, कॅफेन, Diuretics, Imipramine, इन्सुलीन, उच्च रक्तदाबावरील औषधे, Oxazepam, Pentazocine, Propoxyphene, Propranolol, Theophylline, व्हिटॅमिन अशी औषधे घेत असाल तर निकोटीन पॅचेस वापरु नका.
४.तसेच निकोटीन पॅच लावल्यावर तुम्ही धुम्रपान किंवा इतर माध्यमातून निकोटीनचे सेवन करु नये कारण यामुळे तुमच्या शरीरात निकोटीनची मात्रा अतिप्रमाणात वाढू शकते.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock