हस्तमैथुनाचा आनंद किंवा अनुभव घेण्यासाठी तुम्ही सिंगलच असणं गरजेचे नाही. तुम्ही सेक्सचा आनंद घेता म्हणजे हस्तमैथून करूच नये किंवा त्याचा इतर कोणत्या अॅक्टिव्हिटीवर परिणाम होतो असे नाही. एका संशोधनानुसार, ज्या स्त्रिया हस्तमैथुनाचा आनंद घेतात त्या ऑर्गेझमचा आनंदही अधिक चांगल्याप्रकारे घेऊ शकतात. तसेच सेक्सदरम्यानही ऑर्गेझमचा अधिक आनंद घेतात. पण ऑर्गेझमच्या आनंदासोबत इतर कोणत्या फायद्यांसाठी हस्तमैथुन करणे फायदेशीर आहे. लग्नानंतरही ‘हस्तमैथून’ करणे योग्य आहे का ?
- ताण तणाव हलका होतो - तुमच्यावरील ताण तणाव हलका करण्यासाठी हस्तमैथून फायदेशीर ठरते. त्यामुळे तुमच्या साथीदारासोबतचे संबंधही सुधारण्यास मदत होते. हस्तमैथुनाच्या आनंदामुळे शरीरात फील गुड हार्मोन्स म्हणजेच endorphins सुधारण्यास मदत होते.
- रिलेशनशीपमधील पॅशन सुधारते - तुमचं नातं अधिक खुलवण्यासाठी, कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यासाठी हस्तमैथुनाचा आनंद फायदेशीर ठरतो. ’5′ फायदे हस्तमैथुनाचे !
- तुमचा आत्मविश्वास सुधारतो - नात्यामधील एकमेकांबद्दलचे आकर्षण कमी झाले की सेक्सची भावनादेखील खालावते. अशावेळी हस्तमैथुनाचा आनंद तुम्हांला नवी उर्जा देण्यास फायदेशीर ठरतो. या अनुभवाचा फायदा तुम्हांला साथीदारापासून सेक्स दरम्यान नेमके काय अपेक्षित आहे याबाबतचे विचार स्पष्ट करायला मदत होते.
- मासिकपाळीच्या काळातील त्रास कमी होतो - ऑर्गेझम मासिकपाळीच्या दिवसातील त्रास, वेदना कमी करण्यास मदत करतात. हस्तमैथुनामुळे शरीरात एन्डार्फिनचा प्रवाह सुधारतो. त्यामुळे वेदनांचा विसर पडण्यास मदत होते. परिणामी मासिकपाळीच्या काळातील चिडचिड त्यातून होणारी भांडणं कमी होण्यास मदत होते. स्त्रियांमध्ये हस्तमैथुनाचा परिणाम मासिकपाळीवर होतो का ?
- अॅक्टीव्ह फॅन्टसी लाईफ – तु म्ही तुमच्या सेक्स लाईफकडे अधिक कुतुहुलतेने पाहायला शिकाल. हस्तमैथुनाचा आनंद घेता घेता तुम्ही आपो आपच एका आभा सी जगात तु मच्या साथी दारासो बतची काही फॅ न्टसी बनवाल. हा अनु भव खू पच रं जक असेल आणि हे मूळीच मूर्ख पणा चे नसते. मग कसा घ्यावा स्त्रियांनी ‘हस्तमैथुनाचा’ आनंद ! हेे देखिल नक्की जाणून घ्या
Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock