बाळाच्या आगमनानंतर तुमच्यावर कुटूंब,मित्रमैत्रिणी,आप्तेष्टांकडून शुभेच्छांची अगदी बरसात होते.तुम्ही देखील मातृत्वाच्या आनंदात अगदी डुंबून जाता.पण बाळाला घेऊन घरी आल्यावर ख-या परिस्थितीची जाणिव होऊ लागते.या काही गोष्टींमुळे तुमचा मातृत्वाचा आनंद गमावला जाऊ शकतो.यासाठी जाणून घ्या या गोष्टींमुळे बाळंतपणानंतर तुमचे आयुष्य कसे बदलून जाते.
१.रात्रीची जागरणे करावी लागतात-तुम्हाला पुरेशी झोप घेता येत नाही.बाळासाठी तुम्हाला रात्रभर जागरण करावे लागते व दिवसा डुलक्या काढाव्या लागतात.अपु-या झोपेमुळे तुम्हा अस्वस्थ वाटू लागते.यासाठी या ’10′ उपायांनी प्रसुतीनंतर मिळवा पुरेशी झोप !
२.तुम्ही अजूनही गरोदर दिसता-बाळंतपणानंतर देखील काही दिवस तुमचे पोट गरोदरपणाप्रमाणेच वाढलेले दिसते.
३.डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स येतात-रात्रभराची जागरणे,बाळाचे रडणे त्याला सांभाळण्यामध्ये तुम्ही थकून जाता व तुमच्या डोळ्यांभोवती डार्कसर्कल्स येतात.यासाठी जाणून घ्या डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स का निर्माण होतात?
४.स्ट्रेचमार्कमुळे शरीर भयानक दिसू लागते-बाळंतपणानंतर पोटावर दिसणारे भयानक स्ट्रेच मार्क बघून तुम्हाला तुमच्या शरीराची लाज वाटू लागते.यासाठी जाणून घ्या प्रसूतीनंतर दिसणारे स्ट्रेच मार्क्स लेझर उपचारांनी दूर करता येतात का?
५.बाळंतपणानंतरचा रक्तस्त्राव मासिक पाळीपेक्षा त्रासदायक असतो-प्रसूतीनंतर होणा-या रक्तस्त्रावाला Lochia असे म्हणतात.मात्र हा त्रास मासिक पाळीपेक्षाही भयानक असतो.तसेच हा त्रास पाच दिवसांनंतर लगेच थांबत नाही.
६.सेक्सची इच्छा कमी होते-सिझेरियन डिलीवरी असो अथवा नैसर्गिक डिलीवरी बाळंतपणानंतर तुमची सेक्स ची इच्छा कमी होते.काही महिला काही दिवस,काही आठवडे तर काही महिने सेक्स करत नाहीत.तर काहीजणींना बाळंतपणानंतर दोन वर्ष सेक्स करण्याची इच्छा होत नाही.
७.मूड स्वींग होतो-बाळंतपणानंतर भावनिक विस्फोट व रडू येणे थांबवता येत नाही.बाळंतपणानंतर होणारा मूड स्वींगचा त्रास धोकादायक असू शकतो.यासाठी अचानक Mood Swing होण्याची 6 कारणं अवश्य वाचा.
८.तुमच्या पावलांचा आकार बदलतो-तुम्हाला तुमचे जुने शूज येत नाहीत कारण तुमच्या पावलांचा आकार कायमचा बदलतो.बाळंतपणानंतर तुम्हाला सूज येण्याची समस्या होत नाही पण तुमच्या पावलांचे स्नायू पूर्ववत होत नाहीत.तसेच यावर मसाज अथवा पेडीक्युअरचा देखील काही परिणाम होत नाही.
९.तुमचे आवडते जुने कपडे तुम्हाला आता घालता येत नाहीत-तुम्हाला जर बाळंतपणानंतर तुमचे आवडते कपडे पुन्हा घालण्याची इच्छा असेल तर तसे करता येत नाही.कारण बाळंतपणानंतर तुमचे पोट लगेच कमी होत नाही.खरंतर तुमचे पोट कमी झाले तरी पूर्वीप्रमाणे होऊ शकत नाही.
१०.मोठ्या प्रमाणावर केसगळती होते- बाळंतपणानंतर केस मोठ्या प्रमाणावर गळतात.त्यामुळे कितीही उपचार करुन व सौदर्यसाधने वापरुन त्यांना पूर्वीप्रमाणे करणे शक्य नसते.यासाठी केसगळती रोखण्यासाठी दिवसातील ’5 मिनिटं’ हा उपाय नक्की करा
११.तुमचे स्तन संवेदनशील होतात-केवळ स्तनपान करतानाच नव्हे तर इतर कोणत्याही स्पर्शामुळे तुमचे स्तन संवेदनशील होतात.
१२.आईपणाचा कंटाळा येतो- तुम्ही मान्य करा अथवा नाही पण दिवसभरात १५ ते २० वेळा बाळाचे रडणे,त्याला घेणे,त्याची शी-शू यामुळे तुम्ही कंटाळून जाता.पण असे असले तरी मुलांना सांभाळण्यासाठी आया शोधण्यापूर्वी या 8 गोष्टी अवश्य लक्षात ठेवा.
१३.इतर लोकांच्या झोपण्याचा तुम्हाला कंटाळा येतो-तुम्हाला रात्रभर जागे रहावे लागत असल्यामुळे घरातील इतर लोकांच्या शांत झोप घेण्याचा तुम्हाला मत्सर वाटू लागतो.
१४.सतत लघवीला होते-बाळंतपणानंतर तुम्हाला लघवी नियंत्रण ठेवणे कठीण होते.(हे केवळ बाळंतपणाचे लक्षण नसून कधीकधी आयुष्यभर आढळणारे लक्षण आहे.)
१५.तुम्हाला दिवसभर भुक लागते-बाळाला स्तनपान केल्यामुळे तुम्हाला सतत भुक लागते.पण तुम्हाला व्यवस्थित खाण्यासाठी वेळ काढता येत नाही.त्यामुळे तुम्हाला झोप व भुकेच्या चक्रात अडकून रहाता.
बाळंतपणानंतर २८ किलो वजन कमी करणा-या महिलेची प्रेरणादायी कहाणी ! जरुर वाचा.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock