Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

गर्भाशयाचे आरोग्य सुधारण्यासाठी ९ महत्वाच्या टीप्स !

$
0
0

बाळाच्या जन्मासाठी गर्भाशय गरजेचे असले तरी या अवयवाच्या आरोग्याकडे फार लक्ष दिले जात नाही.स्त्रीच्या शरीरातील गर्भाशय हा एकमेव असा अवयव आहे ज्यातून नाळेसारख्या आणखी एका अवयवाची निर्मिती केली जाते.गर्भाशयातील स्नायू हे संपूर्ण शरीरातील इतर स्नायूंपेक्षा अतिशय मजबूत असतात.मात्र अयोग्य जीवनशैली,पोषणमुल्यांचा अभाव व चुकीच्या सवयी यामुळे आपणच या अवयवाचे नुकसान करीत असतो.या चुकीच्या जीवनशैलीमुळेच आजकाल Hysterectomies व सिझेरियन डिलीव्हरी सारख्या घटनांमध्ये वाढ होत आहे.स्त्रीच्या निरोगी आरोग्यासाठी व प्रजनन क्षमतेसाठी तिचे गर्भाशय मजबूत असणे फार गरजेचे आहे.तसेच भारतातील पहिल्या यशस्वी गर्भाशय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेबाबतची ’5′ खास वैशिष्ट्य ! जरुर जाणून घ्या.

World’s first Ayurvedic and natural wellness platform- Allayurveda.com च्या सीईओ व आयुर्वेदिक एक्सपर्ट जिवीका त्यागी यांच्याकडून जाणून घेऊयात निरोगी गर्भाशयासाठी काही महत्वाच्या टीप्स.

१.नैसर्गिक विधी रोखून धरु नका.

जिवीका यांच्यामते नैसर्गिक विधी रोखून धरल्यामुळे टॉक्सिनचा निचरा न झाल्यामुळे योनीमार्ग व पेल्विक भागात इनफेक्शन होऊ शकते.तसेच दीर्घ काळ हे टाकाऊ पदार्थ शरीरात राहिल्यामुळे ते शरीरात पुन्हा शोषले जाऊन विकार निर्माण होतात.सतत वाढलेल्या मूत्राशय अथवा पोटामुळे गर्भाशयावर दाब येऊन त्याची स्थिती बदलू शकते.

२.बराच काळ एकाच ठिकाणी बसून राहू नका.

जिवीका यांच्यामते अनेक जण ऑफीसमध्ये बसून जॉब करतात.त्यामुळे दिवसाचे काही ठराविक तास एकाच ठिकाणी बसावे लागते.बराच वेळ एकाच ठिकाणी बसल्यामुळे तुमच्या पेल्विक भागातील रक्त व उर्जेच्या प्रवाहामध्ये अडथळा येतो. ज्यामुळे गर्भाशयाचे अस्तर जाड होते व Endometriosis होण्याची शक्यता असते.यासाठी जरी तुम्ही बसून काम करीत असलात तरी प्रत्येक तासाने उठून उभे रहा व हालचाल करा.तसेच जाणून घ्या या ’7′ कारणांमुळे स्त्रियांच्या पेल्विक भागात वेदना जाणवतात !

३.नियमित Pomegranate-hibiscus uterine tonic घ्या.

जिवीका यांच्या सल्लानूसार तुमच्या निरोगी गर्भाशयासाठी हे टॉनिक तयार करा.यासाठी २० ते ५० जास्वंदाच्या फुलांच्या कळ्या घ्या व त्या सुर्यप्रकाशामध्ये सुकवा.त्या मिक्सरमध्ये वाटून एका हवाबंद डब्यात भरुन ठेवा व दररोज एक चमचा पावडर एक कप डाळिंबाच्या रसामधून घ्या.हा गर्भाशय निरोगी ठेवण्याचा व अॅनिमिया दूर करण्याचा एक उत्तम घरगुती उपाय आहे.

४.आहारात भरपूर प्रमाणात तृणधान्यांचा समावेश करा.

निरोगी गर्भाशयासाठी पोषक आहार फार महत्वाचा आहे.जिवीका यांच्यामते स्त्रीला निरोगी गर्भाशयासाठी फॉलिक अॅसिड व बीटा-कॅरोटीन या दोन पोषणमुल्यांची गरज असते.शरीरात या पोषणमुल्यांच्या शोषणासाठी सकाळची वेळ सर्वोत्तम असल्यामुळे सकाळच्या नास्तामध्ये त्यांचा समावेश करा.

५.हेल्दी फॅट्स द्वारे तुमच्या शरीरातील टीश्यूजचे पोषण करा.

ज्याप्रमाणे निरोगी रहाण्यासाठी फॅट्स कमी करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे निरोगी राहण्यासाठी काही प्रमाणात हेल्थी फॅट्स घेणे देखील तितकेच गरेजेचे आहे.शरीरातील टीश्यू निरोगी रहाण्यासाठी त्यांना हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे.यासाठी सतत भरपूर प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे.जिवीका यांच्यामते शरीरातील टीश्यू हायड्रेट ठेवण्यासाठी पाण्याप्रमाणेच तूप,फ्लॅक्ससीड्स व नारळाच्या तेलाचा देखील चांगला फायदा होतो.

६.गर्भाशयाला उत्तेजित करण्यासाठी एरंडेल तेलाचा वापर करा.

पोटाला एरंडेल तेलाचा मसाज केल्याने तुमच्या मासिकपाळीच्या समस्या कमी होऊ शकतात.जिवीका यांच्यामते जर तुम्हाला मासिकपाळीमध्ये त्रास होत असेल तर पोटावर एरंडेल तेलाचा मसाज अवश्य करा.एरंडेल तेलाच्या जड व उष्ण गुणधर्मांमुळे तुमच्या उर्जेचे मार्ग मोकळे होतात.मात्र लक्षात ठेवा मासिकपाळीच्या काळात हा मसाज करु नका.

७.मासिकपाळी नियमित येण्यासाठी तुमच्या झोपेचे वेळापत्र सुधारा.

अपु-या झोपेचा तुमच्या हॉर्मोन्सवर परिणाम होतो.जिवीका यांच्यामते यासाठी दररोज अगदी सुट्टीच्या दिवशी देखील वेळेवर झोपा व वेळेवर उठा.कारण तुमच्या प्रजननप्रक्रियेतील हॉर्मोन्सवर परिणाम होत असतो.त्यामुळे नियमित पुरेशी झोप घेणे तुमच्या गर्भाशयाच्या आरोग्यासाठी फार महत्वाचे आहे.तसेच मासिकपाळी पुढे ढकलणार्‍या गोळ्या घेण्यापूर्वी जाणून घ्या त्याबाबत या ’10′ गोष्टी

८.नियमित व्यायाम करा.

निरोगी जीवनासाठी व्यायाम करणे फार गरजेचे आहे.गर्भाशयाच्या आरोग्यासाठी तुम्ही डाउनवर्ड डॉग,सलंब शिरशासन,विपरित दंडासन,सुप्त विरासन अशा योगासनांमुळे पेल्विक भागातील रक्ताभिसरण सुधारेल व गर्भाशय निरोगी राहिल.तसेच जाणून घ्या गर्भाशयातील फायब्राइडस,पॉलिप्स व सिस्ट यामध्ये नेमका काय फरक आहे?

९.प्रक्रिया केलेले पॅक फूड खाणे टाळा.

घरी शिजवलेल्या पोषक व हेल्दी अन्नपदार्थांना पर्याय असू शकत नाही.यासाठी प्रक्रिया केलेले पॅक फूड खाणे टाळा.कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्टिफिशीयल स्वाीटनर्स,फ्लेवरींग घटक,प्रिझर्वेटीव्ह असतात ज्यांच्यामुळे तुमच्या शरीरात हानिकारक केमिकल निर्माण होतात.सोया प्रोटीन सारखे हेल्दी पदार्थ देखील बराच काळ पॅकींग केलेले असल्यामुळे त्यांच्या सेवनामुळे हॉर्नोनल असतुंलन होऊ शकते.या साठी घरी तयार केलेले नैसर्गिक व सेंद्रिय पदार्थ खा.

 

Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock   


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>