उन्हात फिरताना चेहऱ्यावर, मानेवर, काखेत मध्ये घाम येतो. तो चटकन दिसतो. पण पावलांना येणारा घाम, तो दिसत नसल्यामुळे त्याचा त्रास फक्त त्या व्यक्तीलाच होतो. पावलांना आलेल्या घामामुळे दुर्गंधी निर्माण होते. डर्मोटॉलॉजिस्ट डॉ. सेजल शहा यांनी पावलांना घाम येण्याची कारणे, तसंच ओले शूज आणि घामटलेले सॉक्स या समस्या दूर करण्यासाठी काही उपाय सांगितले.
- तुमच्या पावलांना अतिरिक्त घाम येतो का?
पावलांना अतिरिक्त घाम येणे ही समस्या अनुवंशिक आहे. याला hyperhysrosis असे म्हणतात. उष्ण वातावरण, भीती, चिंता, ताप, आजारपण किंवा इन्फेकशन यामुळे घाम येतो. तसंच सॉक्ससाठी वापरले जाणारे फॅब्रिक यामुळे देखील अति प्रमाणात उष्णता निर्माण होते व त्यामुळे घाम येतो. पायांच्या भेगा दूर करण्याचा सोपा घरगुती उपाय !
- पायाला येणाऱ्या दुर्गंधीसाठी काय करावे?
- पायाला येणारा घाम आणि दुर्गंधी दूर करण्यासाठी tea soaks वापरून बघा. tea soaks पाण्यात घालून त्यात पाय बुडवून बसा. चहा मध्ये असलेल्या tannins यामुळे घामग्रंथी तात्पुरत्या आकुंचित होतात आणि त्यामुळे कमी घाम येतो. मध आणि तांदळाच्या पॅकने वाढवा पायांचे सौंदर्य !
- त्वचा कोरडी करण्यासाठी आणि दुर्गंधी आटोक्यात राहण्यासाठी तुम्ही counter powder व sprays चा वापर करू शकता. तसंच काखेजवळील घाम कमी करण्यासाठी वापरले जाणारे antiperspirants तुम्ही वापरू शकता. पायांची दुर्गंधी कमी करण्यासाठी घरगुती उपाय
- कॉटनचे सॉक्स वापरणे अधिक फायदेशीर ठरेल. त्यामुळे पावलांला मोकळा श्वास घेता येईल व त्वचेतील ओलावा दूर होतो. लव्हेंडर ऑईलने दूर करा पायाच्या दुर्गंधीची समस्या
- बोटं झाकून जाणारे शूज वापरल्याने विशेषतः उन्हाळ्यात अधिक घाम येतो. शक्य असल्यास बोटं मोकळी राहतील असे शूज वापरा. लेदर आणि कॅनव्हासचे शूज वापरल्यास घाम दूर राहतो. तसंच सिन्थेटिक मटेरियलच्या सॉक्स ऐवजी ते सॉक्स वापरणे अधिक योग्य ठरेल. शूजमधून येणारी दुर्गंधी कमी करणारे झटपट उपाय !
- पावलांना येणारा अतिरिक्त घाम कमी करण्यासाठी दुसरी कोणती ट्रीटमेंट आहे का ?
Mirady या प्रक्रियेमुळे काही काळाने पावलांना-हातांना घाम येण्याचे प्रमाण कमी होते. तसंच पावलांना बूटॉक्स केल्याने तात्पुरती म्हणजे तीन महिन्यांसाठी घाम निर्मिती स्थगित (ब्लॉक) होते. पायाच्या तळव्यांमध्ये जळजळ वाढण्यामागील ’8′ कारणं !
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock