आईच्या गर्भातून बाहेर पडलेले बाळ नव्या जगात प्रवेश करताना अनेकदा रडारड करते, त्याला स्थिरावायला वेळ लागतो किंवा काही त्रास, इन्फेक्शनचा धोका कमी करण्यासाठी त्याला अत्यंत संवेदनशील कक्षात ठेवले जाते. मात्र आल्यानंतर काही वेळातच बाळ चालायला लागले हे तुम्ही क्वचितच ऐकलं असेल. लहान मुलांनी उलटे पाय दुमडून का बसू नये ? हेदेखील नक्की जाणून घ्या आणि त्यांची ही सवय ताबडतोब मोडा.
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडियोनुसार नवजात बाळ जन्माला आल्यानंतर काही वेळातच सरसर पाऊल पुढे टाकत असल्याचे दिसत आहे. सामान्यपणे जन्मानंतर काही महिन्यांनी मुलं रांगायला लागतात, हळूहळू आधाराच्या मदतीने बसायला शिकतात तर सुमारे 9-12 महिन्यांच्या कालावधीत पुरेशा सहाय्याने लहान मुलं पाऊलं पुढे टाकतात. पण व्हिडियोमधील दृश्य पाहता नवजात बाळ जन्मानंतर अल्पावधीतच पाऊलं टाकत असल्याने अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडियोला जगभरातून पसंती मिळत आहे. फेसबुकवर या व्हिडियोला 71,158,658 Views तर 1,629,722 shares मिळाले आहेत.. तुम्ही पण हा व्हिडियो पहा… आणि तुम्हांला काय वाटते या ‘अजब सुपरबेबी’बद्दल हे आम्हांला खालील कमेंटबॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच असा प्रकार क्वचितच घडतो. त्यामुळे तुमच्या घरातील बाळासोबत जबरदस्तीने त्याला बसायला किंवा चालवायचा प्रयत्न करू नका. हे त्याच्या वाढीसाठी त्रासदायक ठरू शकते. म्हणूनच नव्या बाळासोबत ‘बॉन्डींग’ वाढवण्यासाठी स्टेप बाय स्टेप गाईड ! नक्की फॉलो करा.
व्हिडियो आणि छायाचित्र सौजन्य - Arlete Arantes फेसबुुक पेज