बद्धकोष्ठता ही समस्या त्रासदायक असू शकते.बद्धकोष्ठतेमुळे केवळ शौच बाहेर पडण्यास त्रास होत नाही तर यामुळे शौचाचा प्रकार,सातत्य व घनता यामध्ये देखील बदल होतात ज्यामुळे ही समस्या अधिक त्रासदायक होऊ लागते.या समस्येचा त्रास मध्यमपासून गंभीर व तीव्र झाल्यामुळे इतर आरोग्य समस्या निर्माण होतात.यासाठी सकाळी उठल्यावर चहा-कॉफी घेतल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होण्यास मदत होते का ? हे नक्की वाचा.
जसलोक हॉस्पिटल व रिसर्च सेंटरच्या Consultant-Hepatologist, Gastroenterologist व Therapeutic Endoscopist डॉ.जयश्री शाह यांच्याकडून जाणून घेऊयात बद्धकोष्ठतेवर वेळीच उपचार न केल्यास कोणत्या आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.डॉक्टरांच्या मते ब-याचदा तरुण व मध्यम वयाच्या लोकांमध्ये जीवनशैलीमध्ये सुधारणा व आहारामध्ये योग्य बदल करुन बद्धकोष्ठतेची समस्या नियंत्रणात आणता येते.मात्र ही परिस्थिती तशीच राहील्यास उतारवयात ही समस्या अधिक गंभीर नक्कीच होऊ शकते.
१.Diverticulitis-शौच बाहेर पडताना सतत ताण आल्यामुळे वृद्ध लोकांच्या आतड्यांमध्ये पाउच निर्माण होतात ज्याला diverticula असे म्हणतात.या पाउच मध्ये शौच अडकून Diverticulitis ही गंभीर समस्या निर्माण होते ज्यामुळे इनफेक्शन व दाह होण्याचा धोका असतो.सर्वात वाईट गोष्ट म्हणजे या पाउचला छिद्र पडून अथवा पाउच फाटणे जीवघेणे असू शकते.ज्या परिस्थितीमध्ये रुग्णाला तात्काळ वैद्यकीय मदत मिळण्याची आवश्यक्ता असते.यासाठी वाचा या ‘बीयांचे’ मिश्रण झटपट हटवेल बद्धकोष्ठतेचा त्रास !
२.Haemorrhoids- गुदद्वारावर दाब आल्यामुळे त्यातील नसा सुजून Haemorrhoids अथवा पाइल्स(मूळव्याध) ही समस्या निर्माण होते.या स्थितीमध्ये शौच बाहेर पडताना वेदना व रक्त पडू शकते.ही स्थिती जरी गंभीर नसली तरी यावर वेळीच योग्य उपचार करणे फायद्याचे असते.यासाठी वाचा मूळव्याधीचा त्रास कमी करणार्या ’10′ फायदेशीर टीप्स !
३.Anal fissures-शौच कठीण झाल्यामुळे तो बाहेर पडताना गुदद्वार फाटण्याची व त्यातून रक्त बाहेर पडण्याची शक्यता असते.यामुळे अॅनल फिशर ही समस्या निर्माण होते जी फारचा वेदनादायक असते.फिशर निर्माण झाल्यामुळे शौच बाहेर पडणे अधिक कठीण व त्रासदायक होते.अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार करणे फार गरजेचे असते.
४.Irritable bowel syndrome-Irritable bowel syndrome मुळे सतत लघवीला जाणे व बद्धकोष्ठता दिसताना दोन निरनिराळ्या समस्या वाटू शकतात.मात्र आय.बी.एस ही समस्या ब-याचदा बद्धकोष्ठतेमुळे होते.आय.बी.एस.या स्थितीमध्ये आयुष्यभर पुरेसे लक्ष देण्याची व नियंत्रण ठेवण्याची गरज असते यासाठी बद्धकोष्ठता या समस्येकडे वेळीच लक्ष द्या.तसेच यासाठी जाणून घ्या इरीटेबल बोवल सिन्ड्रोमचा धोका वाढवणारे घटक
५.इनफेक्शन-बद्धकोष्ठतेच्या तीव्र समस्येमध्ये इनफेक्शन होण्याची शक्यता अधिक असते.मोठे आतडे व गुदमार्गातून शौच बाहेर पडताना तो कठीण झाल्यामुळे या मार्गात जखमा होऊन इनफेक्शन होण्याचा धोका निर्माण होतो.
६.Urine incontinence-मोठे आतडे व मूत्राशय जवळजवळ असते.त्यामुळे जेव्हा मोठे आतडे शौचामुळे भरलेले असते तेव्हा सहाजिकच त्याचा दाब मूत्राशयावर पडून समस्या निर्माण होतात.
७.Bowel cancer-शौच बाहेर पडण्यापूर्वी शौच मोठ्या आतड्यामध्ये साठतो या स्थितीला बद्धकोष्टता असे म्हणतात.शौचाचे प्रमाण वाढल्यास मोठ्या आतड्यावर ताण येऊन त्या भागात जखमा होतात व इनफेक्शन होते ज्यामुळे पुढे आतड्याचा कर्करोग होण्याची शक्यता निर्माण होते.यासाठी आतड्यांचा कॅन्सर – कोणत्या टप्प्यात त्याची गंभीरता किती ? हे अवश्य वाचा.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock