थायरॉईड ग्रंथी दिसायला अगदी लहान असली तरी ही शरीरातील अत्यंत महत्वाचे कार्य करणारी ग्रंथी आहे.या ग्रंथीद्वारे श्वास घेणे,वजन नियंत्रित ठेवणे,मासिकपाळीच्या चक्रावर नियंत्रण ठेवणे,शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवणे अशी शरीरातील महत्वाची कार्ये नियंत्रित केली जातात.T3 व T4 या दोन थायरॉईड हॉर्मोन्समुळे आपल्या शरीरातील अवयवांना कार्यक्षम रहाण्यास मदत होत असते.पण काही वेळा शरीरामध्ये बिघाड निर्माण होऊन थायरॉईड ग्रंथी हे हॉर्मोन्स अतिप्रमाणातात अथवा कमी प्रमाणातात निर्माण करु लागते.ज्यामुळे Hyperthyroidism व Hypothyroidism या समस्या निर्माण होतात.या दोन्ही समस्यांच्या नावामध्ये असलेल्या समानतेमुळे या समस्यांबाबत गैरसमज निर्माण होऊ शकतात.यासाठी जागतिक थायरॉईड दिन २०२७ निमित्त Endocrinologist डॉ.शशांक जोशी यांच्याकडून या पाच महत्वाच्या मुद्याबाबत Hyperthyroidism व Hypothyroidism यांच्यामध्ये असलेला महत्वाचा फरक जाणून घेऊयात.तसेच थायरॉईडचा त्रास आटोक्यात ठेवायला मदत करतील हे ’5′ आयुर्वेदीक उपाय ! देखील जरुर वाचा.
Hyperthyroidism व Hypothyroidism या समस्यांमध्ये काय फरक आहे ?
ग्रीक संज्ञेनूसार हायपर म्हणजे अति व हायपो म्हणजे कमी असा अर्थ होतो.त्यामुळे जेव्हा थायरॉईड ग्रंथी अतिप्रमाणामध्ये हॉर्मोन्स निर्माण करते तेव्हा त्या समस्येला हायपरथायरॉडीझम असे म्हणतात.त्याचप्रमाणे जेव्हा थायरॉईड ग्रंथी कमी प्रमाणात हॉर्मो्न्स निर्माण करते तेव्हा त्या समस्येला हायपोथायरॉडीझम असे म्हणतात.हायपरथायरॉडीझम या समस्या असलेल्या व्यक्तीच्या शरीरात अति उर्जा पातळी असते तर हायपोथायरॉडीझम समस्येमध्ये ही उर्जेची पातळी फारच कमी असते.यासाठी जाणून घ्या Hypothyroidism चा त्रास फर्टिलिटीवर कशाप्रकारे परिणाम करतो ?
Hyperthyroidism व Hypothyroidism या समस्यांची लक्षणे कोणती असतात ?
हायपरथायरॉडीझम असलेल्या व्यक्तीला भूक जास्त लागून देखील वजन कमी होते,ह्रदयाचे ठोके जलद होतात,घाम येतो व ह्रदयाची धडधड वाढते.चिंता वाढणे व निद्रानाश ही लक्षणे आढळतात.तसेच या समस्येमध्ये थायरॉईज ग्रंथीचा आकार वाढलेला दिसतो.
तर हायपोथायरॉडीझम मध्ये याविरुद्ध लक्षणे दिसतात.वजन वाढणे,थकवा,त्वचा कोरडी होणे,नखे ठिसूळ होणे,महिलांमध्ये मासिकपाळीमध्ये कमी रक्तस्त्राव ही लक्षणे आढळतात.तसेच या शारीरिक लक्षणांसोबत विस्मृती व डिप्रेशन ही लक्षणे देखील दिसून येतात.
Hyperthyroidism व Hypothyroidism या समस्या निर्माण होण्याची कारणे काय असतात ?
या दोघांपैकी हायपोथायरॉडीझम ही आनुवंशिक समस्या असून ती आईमुळे मुलीला होऊ शकते.तर हायपरथायरॉडीझम ही समस्या हायपोथायरॉडीझम सारखी आनुवंशिक नाही.Grave’s disease व thyroiditis या स्थिती थायरॉईड ग्रंथीच्या अति सक्रियेतेला कारणीभूत असू शकतात.यासाठी थायरॉईडच्या पातळीमध्ये असतुंलन निर्माण होण्याची ही १० कारणे देखील जरुर जाणून घ्या.
Hyperthyroidism व Hypothyroidism या समस्येवर काय उपचार करण्यात येतात ?
हायपरथायरॉडीझमवर प्रत्येक व्यक्तीनूसार निरनिराळे उपचार करण्यात येतात.हे उपचार ते त्या व्यक्तीची स्थिती गंभीर आहे यावर अवलंबून असू शकतात.या उपचारांमध्ये आयोडीन थेरपी,रेडीओअॅक्टीव्ह आयोडीन व अॅन्टीथायरॉईड औषधे यांचा समावेश असतो.फार दुर्मिळ परिस्थितीमध्ये अति सक्रिय झालेल्या थायरॉईड ग्रंथीला शस्त्रक्रिये द्वारे काढून टाकावे लागते.
हायपोथायरॉडीझम या समस्येवर सामान्यत: औषध देऊन उपचार करण्यात येतात ज्यामध्ये levothyroxine व thyroxine यामाध्यमातून कृत्रिम थायरॉईड हॉर्मोन्स देण्यात येतात.या औषधांमुळे थायरॉईडची पातळी सामान्य करणे व मेटाबॉलिक कार्य सुधारण्यास मदत होते.यासाठी वाचा डबल चीन आणि थायरॉईड सारख्या समस्यांवर प्रभावी योगासनं !
Hyperthyroidism व Hypothyroidism या समस्येमध्ये काय काळजी घ्याल?
हायपरथायरॉडीझम या समस्येमध्ये थायरॉईडचे कार्य व हॉर्मोन्सची पातळी यावर नियमित लक्ष ठेवणे गरजेचे असते.यासाठी उत्तम Endocrinologist चा सल्ला घ्या व नियमित चेक-अप साठी जा.
हायपोथायरॉडीझम या समस्येमध्ये नियमित व्यायाम व पोषक आहार घेऊन वजन नियंत्रित ठेवणे शक्य असते.यासाठी वजनाकडे नीट लक्ष द्या.हायपोथायरॉडीझम या समस्येमध्ये ह्रदयविकार,स्ट्रोक व हार्टअटॅक येण्याची अधिक शक्यता असते.यासाठी अशा रुग्णांनी नियमित ईसीजी टेस्ट करावी व कोलेस्टेरॉलच्या पातळीवर नियंत्रण ठेवावे.यासाठी Hypothyroidism चा त्रास कमी करण्यासाठी खास डाएट प्लॅन ! अवश्य वाचा.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock