Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

उच्च रक्तदाबाच्या गोळ्या घेणं बंद केल्यास काय होईल ?

$
0
0

काही औषधे आयुष्यभर घ्यावी लागतात. त्यामुळे त्याचा कंटाळा येतो. औषधांवर सतत अवलंबून राहणे कंटाळवाणे असते. पण तरीही उच्च रक्तदाब असल्यास तो नियंत्रित राहण्यासाठी व त्यावर उपचार होण्यासाठी नियमित औषधे घ्यावी लागतात. परंतु, डॉक्टर यावर अधिक काळजीपूर्वक औषधे देतात. उच्च रक्तदाबासंबंधीचे हे ’10′ गैरसमज आजच दूर करा

एखाद्या व्यक्तीचा रक्तदाब कधीच नियंत्रित नसतो, अगदी दिवसभर देखील नसतोच. रक्तदाब वाढण्याचा किंवा कमी होण्याचा संबंध ताणाशी असतो. काही वेळेस चक्कर येऊन पडल्यावर देखील रक्तदाबात चढ-उतार होत नाहीत, असे हिंदुजा हॉस्पिटल आणि रिसर्च सेन्टरचे कॉन्स्लटंट कार्डिओलॉजिस्ट डॉ. सुधीर पिल्लई यांनी सांगितले.

उच्च रक्तदाबाचा त्रास तुम्हाला थायरॉईड, स्थूलता,  घोरणे, endocrine issues यांसारख्या समस्यांमुळे झाला असेल तर त्याची औषधे घेताना तुमचा रक्तदाब देखील आटोक्यात राहण्यास मदत होईल. परंतु, आपली बैठी जीवनशैली असल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात आणि हे आजार पूर्णपणे बरे होत नाही. त्यावर आयुष्यभर औषधे घेणे हा एकच पर्याय आहे. हायपरटेंशनचे शरीरावर हे १० दुष्परिणाम होतात

उच्च रक्तदाबाचे प्रमाण हे व्यक्तीचे बॉडी मास इंडेक्स, वजन आणि इतर घटकांवर देखील अवलंबून आहे. म्हणून जेव्हा डॉक्टर तुमचे ब्लड प्रेशर तपासतात तेव्हा ते अधिकाधिक १४० असले, (अगदी चार वेळा तपासूनही) आणि कमीतकमी ८० असेल तर तुमचे ब्लड प्रेशर साधारणपणे १४०/९० असेल. जे नॉर्मल आहे आणि त्यात  काळजीचे काही कारण नाही. परंतु, जर ब्लड प्रेशर १८०/१३० पर्यंत वाढले आणि नॉर्मल पातळीवर येत नसेल तर मात्र डॉक्टरांना औषधं देणे अपरिहार्य आहे. आवळ्याचा रस – रक्तदाब आटोक्यात ठेवणारा नैसर्गिक उपाय

उच्च रक्तदाबाची औषधे ही तो नियंत्रित राहण्यासाठी दिली जातात. म्हणून जर तुमचे ब्लड प्रेशर १८०/१३० ते ११०-९० असेल आणि तुम्ही औषधे घेणे बंद केले तर तुमचे ब्लड प्रेशर २००/१८० इतपर्यंत वाढू शकते. त्याला ‘रीअॅक्टिव्ह हायपरटेंशन’ असे म्हणतात.  रीअॅक्टिव्ह हायपरटेंशन हे गंभीर स्वरूपाचे असून त्यामुळे स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. म्हणून जर तुम्ही काही वेळासाठी औषधे घेणे बंद केले असेल तर पुन्हा औषधे सुरु करणे योग्य ठरेल. परंतु, औषधे पुन्हा सुरु करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम. कारण त्यात काही बदल असतील किंवा एखादा डोस अधिक घेण्याची गरज असल्यास त्याची नीट माहिती मिळेल. हायपरटेंशनचा त्रास आटोक्यात ठेवायला मदत करतील ही १० फळं आणि भाज्या

म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उच्च रक्तदाबाची औषधे घेणे धोक्याचे ठरेल. लिंबू – रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचा उत्तम घरगुती उपाय !

 

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>