Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

ताण दूर करण्यासाठी चेहऱ्याला या पद्धतीने करा मसाज !

$
0
0

कामाच्या ताणामुळे किंवा नात्यातील अस्थिरतेमुळे तुम्ही चिंतेत आहात का ? ताण कोणत्याही कारणामुळे असो तो चेहऱ्यावर दिसू लागतो आणि मग तुमचा चेहरा उतरलेला दिसतो. ताण तणावामुळे अ‍ॅक्नेचा त्रास वाढतो का ?

कारण जेव्हा तुम्ही तणावात असता तेव्हा शरीरातून cortisol या ताणतणाव वाढविणार्‍या हार्मोन्सचा स्त्राव वाढतो. त्यामुळे शरीरातील मिठाचं प्रमाण कमी होऊन शरीरात पाणी साचू लागतं आणि त्यामुळे चेहरा सुजलेला दिसतो. पण यासाठी तुम्ही चेहऱ्याला मसाज करू शकता. त्यामुळे चेहऱ्याची सूज कमी होईल आणि तुमचा ताण लोकांना दिसणार देखील नाही. कॉस्मेटोलॉजिस्ट नंदिता दास यांची चेहऱ्याला मसाज करण्याची टेक्निक सांगितली.

  • पहिली पायरी: यासाठी तुम्हाला मॉइश्चरायझर आणि आय क्रीमची आवश्यकता आहे. हे प्रॉडक्टस फ्रीजमध्ये ठेवा. थंड झालेल्या प्रॉडक्टसमुळे चेहऱ्याची जळजळ, ताण दूर होण्यास मदत होईल. त्वचा मॉश्चराइज करण्याचे घरगुती उपाय
  • दुसरी पायरी: त्यानंतर हातावर मॉइश्चरायझिंग क्रीम घेऊन हळुवार मानेला आणि चेहऱ्याला लावा. या क्रीममुळे त्वचेची लवचिकता व पोत सुधारेल. या ’5′ संकेतांवरून ओळखा तुमचे मॉईश्चरायझर झाले ‘Expire’ !
  • तिसरी पायरी: हातावर अजून थोडी क्रीम घेऊन चेहऱ्याला वरच्या दिशेने हळुवार मसाज करा. त्यामुळे जळजळ होण्यास कारणीभूत ठरणारे घटक दूर होण्यास मदत होते. तसंच मसाज करताना कानाच्या मागे, कपाळावर हलकासा दाब द्या.
  • चौथी पायरी: बोटांनी डोळ्याच्या खाली असलेल्या नाजूक त्वचेवर हळुवारपणे आय क्रीम लावा. डोळ्यांच्या भोवती अनेक नर्व्हस असल्याने त्याजवळील त्वचेला हळुवार मसाज करा. तेलकट त्वचेच्या लोकांनी ‘नाईट क्रिम’ लावावी का?
  • पाचवी पायरी: त्यानंतर डोळ्यांभोवती गोलाकार मसाज करण्यास सुरवात करा आणि डोळ्यांजवळील प्रेशर पॉंईटसवर दाब द्या. . त्यामुळे डोळ्यांभोवतालचा रक्तप्रवाह सुधारतो. सुजलेले डोळे, डार्क सर्कल्स, सुरकुत्या डोळ्यांच्या या समस्या दूर करण्यासाठी आय क्रीम फायदेशीर ठरते. तेलाच्या मसाजामध्ये दडलय निरोगी स्वास्थ्याचे रहस्य !

म्हणून जर तुम्हाला कधी स्ट्रेस वाटले तर ५ मिनिटे काढा आणि मसाज करा. त्यामुळे तुम्ही रिलॅक्स व्हाल व चेहऱ्याला नवी झळाळी मिळेल. उन्हाळ्यात त्वचेला झटपट तजेलदार बनवेल हा घरगुती स्प्रे !

टीप: मसाज करताना तुम्ही सुगंधी मेणबत्त्या देखील लागू शकता. त्यामुळे स्पा मध्ये असल्यासारखे वाटेल व तुम्ही अधिक रिलॅक्स व्हाल. काश्याच्या वाटीने पायाला मसाज करण्याचे आरोग्यदायी फायदे !

 

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>