शरीरात थायरॉईडच्या पाताळीमध्ये असंतुलन निर्माण झाले की दोष तयार होण्यास सुरवात होते. मग हा त्रास हायपरथायरॉईडीझमचा असो किंवा हायपोथायरॉईडचा असू शकतो. प्रामुख्याने स्त्रियांमध्ये आढळणार्या या आजारामध्ये शरीरात हार्मोनल इम्बॅलन्स निर्माण झाल्याने वजन वाढते. पण याचा अर्थ असा नाही की पुरूषांना थायरॉईडचा त्रास नसतो. स्त्रियांप्रमाणेच पुरूषांमध्येही थायरॉईडचा त्रास वाढतो. काही संशोधनानुसार, स्त्रियांच्या तुलनेत पुरूषांमध्ये हायपोथायरॉईडीझमचा त्रास हा आठपट कमी असतो. SRL Diagnostics चे President Technology & Mentor (Clinical Pathology) डॉ. अविनाश फडके यांच्या सल्ल्यानुसार, पुरूषांमधील थायरॉईडच्या धोक्याबाबत या ’4′ गोष्टी नक्की जाणून घ्या.
1. आजकाल छुप्या पद्धतीने पण झपाट्याने वाढणारा एक आजार म्हणजे हायपोथायरॉईडिझम. स्त्रियांप्रमाणेच पुरूषांमध्येही हायपोथायरॉईडिझमची लक्षण सारखीच आहेत. वजन वाढणं, थकवा जाणवणं,कमजोर वाटणं, कोलेस्टोलचं प्रमाण वाढणं, नैराश्य वाढणं या लक्षणांसोबत काही अधिक लक्षण पुरूषांमध्ये आढळतात. यामध्ये स्नायूंमध्ये कमजोरी, शीघ्रपतन, कामवासना कमी होणं आणि केसगळती हा त्रासही वाढतो. Hypothyroidism नियंत्रणात ठेवण्यासाठी 9 डाएट टीप्स !
2. स्त्रियांप्रमाणेच पुरूषांमध्येही थायरॉईडचा त्रास वाढण्यामागे अनुवंशिकता हा घटक एक महत्त्वाची भूमिका पार पाडतो. तुमच्या कुटुंबामध्ये थायरॉईडचा किंवा ऑटोइम्युन आजारांचा त्रास असेल तर सहाजिकच तुम्हांला (पुरूषांना ) थायरॉईडचा धोका बळावण्याची शक्यता वाढते. त्यामुळे पुरूषांनो ! तुम्हांला थायरॉईडची काही लक्षण आढळल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला आणि तपासण्या करून घ्याव्यात. थायरॉईडच्या चाचणीमध्ये TSH, Free T4, Free T3 and Thyroid Peroxidase Antibodies (TPO) या चाचण्या अवश्य करून घ्याव्यात.या चाचण्यांमधून तुम्हांला थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुरळीत आहे की नाही ? याची तपासणी करता येते. थायरॉईडच्या समस्येवर व्यायामाने फायदा होईल का?
3. थायरॉईडचा त्रास प्रामुख्याने उतारवयातील पुरूषांमध्ये आढळतो. पण या नियमाला काही अपावाददेखील असू शकतात. वयानुसार तुमची जीवनशैलीदेखील कारणीभूत असते. त्यामुळे खाण्या पिण्यासोबतच व्यायामाचे गणित सांभाळणेदेखील गरजेचे आहे. यामुळे थायरॉईड ग्रंथींचे कार्य सुधारते. तुमच्यावरील ताण तणावाचा परिणाम adrenal glands वर होतो. परिणामी cortisol या स्ट्रेस हार्मोन्सला चालना मिळते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते तसेच थायरॉईड ग्रंथींचे कार्यदेखील सुरळीत चालते.तसेच Hypothyroidism चा त्रास कमी करण्यासाठी खास डाएट प्लॅन ! देखील जरुर करा.
4. थायरॉईड ग्रंथींच्या कार्यावरच थायरॉईड हार्मोन्सचे कार्य अवलंबून असते. त्यामुळे आहाराचे आणि व्यायामाचे पथ्यपाणी सांभाळणे गरजेचे आहे. यामुळे तुमच्यावरील ताण तणावाचेदेखील नियोजन करणं गरजेचे आहे. धुम्रपानाच्या व्यसनापासून दूर रहा. आहारात आयोडीनचे प्रमाण किती असावे ? याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. कारण त्यावर तुमच्या थायरॉईड हार्मोन्सचे कार्य अवलंबून असते. आयोडीनमधून आवश्यक मिनरल्स मिळण्यास मदत होते. यामुळे पुरूषांप्रमाणेच स्त्रियांमधील थायरॉईडच्या समस्यांवर नियंत्रण मिळण्यास मदत होते.
Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock