Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

टोमॅटो रसमची हेल्दी टेस्टी रेसिपी

$
0
0

इडली डोसा, सांबार याप्रमाणेच रसम या दाक्षिण्य पदार्थाची चव जितकी सुरेख आहे तितकेच ते आरोग्यदायीदेखिल आहे. टोमॅटो सूपला एक हेल्दी पर्याय म्हणजे टोमॅटो रसम आहे. रसम भातासोबत, वड्यासोबत खाल्ले जाते. टो मॅटो रसम पोटभरीचा आणि पचायला हलका पदार्थ आहे. टोमॅटोसोबत मसाले, आलं, लसूण यांचादेखील समावेश असल्याने ते झटपट बनवणे शक्य असते. टोमॅटो रसम भातासोबत किंवा सूपसारखे केवळ पिण्यासाठी बनवले जाते. टोमॅटो रसमचा आहारात समावेश केल्यास उन्हाळ्यात होणारा डीहायड्रेशनचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते. शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रणात राहते.  या ’5′ घरगुती आणि हेल्दी सरबतांनी उन्हाळ्यात रहा कूल !

साहित्य :

3 मध्यम आकाराचे टोमॅटो

2 कप पाणी

चवीनुसार मीठ

इंचभर आलं

4-5 पाकळ्या लसूण

1 टेबलस्पून चिरलेला कांदा

5-6 काळामिरी

पाव चमचा राई

पाव चमचा उडीद डाळ

पाव चमचा चणा डाळ

पाव चमचा जिरं

1 चमचा धणे

1-2 कढीपत्त्याची पानं  

2 चमचे तेल  

चिमुटभर हिंग  

चिमुटभर हळद

1 चमचा लाल तिखट

कसं बनवाल रसम –  

  1. टोमॅटीची प्युरी करा किंवा ते शिजवा. याऐवजी बारिक चिरलेला टोमॅटो तुम्ही तेलामध्ये शिजवा म्हणजे तो मऊ होईल. हे मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये त्याची प्युरी करा.  
  2. या मिश्रणामध्ये लसूण, आलं, काळामिरी, कढीपत्त्याची पानं यांचीदेखील पेस्ट मिसळा.
  3. मंद आचेवर भांड गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेलावर राई व जिर्‍याची फोडणी घाला.
  4. फोडणी तडतडल्यानंतर त्यामध्ये उडीद डाळ, चणा डाळ मिसळा. उडीद डाळ थोडी हलकीच लालसर झाल्यानंतर त्यामध्ये चिरलेला कांदा घाला.
  5. या मिश्रणामध्ये आलं लसूणची पेस्ट व काळामिरी मिसळा. हे मिश्रण नीट हलवून सुमारे 1-2 मिनिटं शिजू द्यावं.त्यानंतर यामध्ये हळद, लाल तिखट व हिंग मिसळा. सारे मिश्रण नीट एकजीव करा.
  6. यानंतर यामध्ये टोमॅटोची पातळ पेस्ट मिसळा. थोडं पाणी घालून मिश्रण थोडं अधिक पातळ बनवा.
  7. या मिश्रणाला 10-15 मिनिटे उकळू द्यावे.
  8. उकळून एकजीव झालेले मिश्रण म्हणजेच रसममध्ये कोथिंबीरीची पानं मिसळा आणि गरमागरम रसमचा भातासोबत आस्वाद घ्या. या आरोग्यदायी कारणांसाठी जरूर कराच आहारात भाताचा समावेश !

मग तुम्हीही टोमॅटो सार बनवण्याऐवजी आज भातासोबत हा रसमचा प्रकार बनवून पहा आणि आम्हांला कमेंट बॉक्समध्ये सांगा कसं वाटतय तुम्हांला टोमॅटो रसम

Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>