Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

फ्रोझन फ्रुट्सचा पर्याय निवडणं खरंच आरोग्यदायी आहे का ?

$
0
0

पेर, स्ट्राबेरीज, ब्लूबेरीज, पपई यांसारखी फळे फ्रोझन करून मिळतात. सुपरमार्केटमध्ये ती सहज उपलब्ध असतात. परंतु, ते खरेदी करण्यापूर्वी किंवा खाण्यापूर्वी त्यातील पोषकघटक आणि कॅलरीजचे प्रमाण ठाऊक असते, महत्त्वाचे आहे. फ्रोझन फ्रुट्स खाणे योग्य की अयोग्य, हेल्दी की अनहेल्दी यावर न्यूट्रिशियनिस्ट अदिती रामपाल यांनी मार्गदर्शन केले.

  • फ्रीझ फ्रुट्स म्हणजे नेमके काय ?

फळं फ्रीझ करण्याच्या प्रक्रीयेत अनेक पायऱ्या आहेत. प्रथम उत्पादक (मॅनिफॅचरर) फळं धुतात. नंतर त्यावर ascorbic acid यांसारखे केमिकल कंपाऊंड लावले जाते. त्यामुळे फळे पिकण्याला आळा घातला जातो. नंतर ते फ्लॅश फ्रीझिंग प्रोसेससाठी वापरले जातात. त्यामुळे फळं खराब न होता लगेच फ्रीझ होतात.

  • फळं फ्रीझ केल्यानंतर देखील त्यात पोषकघटक टिकून राहतात का?

फ्रीझिंग प्रोसेसनंतर फळात पुष्कळसे पोषकघटक टिकून राहतात. परंतु, काही वेळेस फळातील व्हिटॅमिन सी नष्ट होते. कपभर ताज्या स्ट्रॉबेरीजमध्ये ८४ मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी असते तर कपभर फ्रोझन स्ट्रॉबेरीज मध्ये ६१ मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी असते. टवटवीत त्वचा मिळवण्यासाठी ही १० फळे आणि भाज्या खा !

  • फ्रोझन फळांमध्ये खूप कॅलरीज असतात का ?

काही उत्पादक फळात गोडवा आणण्यासाठी कृत्रिम स्वीटनरचा वापर करतात. त्यामुळे फळात कॅलरीजचे प्रमाण वाढते. उदा. कपभर ताज्या स्ट्रॉबेरीजमध्ये ४६ कॅलरीज असतात आणि ७ ग्रॅम नैसर्गिक साखर असते. तर कपभर फ्रोझन आणि स्वीटनर न घातलेल्या स्ट्रॉबेरीजमध्ये ५२ कॅलरीज व ७ ग्रॅम नैसर्गिक साखर असते. परंतु, स्वीटनर घातलेल्या कपभर फ्रोझन स्ट्रॉबेरीजमध्ये ७५ कॅलरीज असतात. हायपरटेंशनचा त्रास आटोक्यात ठेवायला मदत करतील ही १० फळं आणि भाज्या

टीप:

फ्रोझन फळे विकत घेण्यापूर्वी त्यावरील लेबल जरूर वाचा. त्यावरून फळात साखर घातली आहे की नाही ते समजेल. कपभर फ्रोझन व साखर न घातलेल्या ब्लूबेरीजमध्ये सुमारे ७९ कॅलरीज असतात. तर फ्रोझन पण साखर घातलेल्या कपभर ब्लूबेरीजमध्ये १८६ कॅलरीज असतात. जर तुम्हाला गोड फळे खायला आवडत असतील तर साखर न घातलेली, नैसर्गिकरित्या पिकलेली ताजी फळे खा. कृत्रिम साखर घातलेली नाही. खाण्यापूर्वी फळं/ भाज्या कशाप्रकारे धुणे गरजेचे आहे ?

थोडक्यात फ्रोझन फळांच्या पोषकतत्त्वात फार थोडा फरक आढळून येतो तर कॅलरीजचे प्रमाण तुलनेने थोडे जास्त असते.

 

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>