स्मोकिंगची सवय मोडणे, सोपे नाही. अतिशय तीव्र इच्छा असल्याशिवाय स्मोकिंग सोडणे शक्य होत नाही. त्यात काहीतरी अडथळे येत राहतात. धूम्रपान सोडल्याने बद्धकोष्ठता होते. हा समज अनेकांना पुन्हा व्यसनाच्या मार्गाकडे वळवतो. परंतु, तुम्हाला खरंच धूम्रपान सोडण्याची इच्छा असेल तर थोडा धीर धरा. शरीराची निकोटीनच्या वासाची सवय मोडली की हा त्रास देखील काही दिवसात दूर होईल. स्मोकींग सोडण्यासाठी ११ सोप्या डाएट टिप्स
- असे का होते?
तुम्ही शरीराचा कसा वापर करता किंवा कशी हानी पोहचवता, याचा परिणाम बद्धकोष्ठतेत होतो. बरेचदा याचा संबंध तुमच्या जीवनशैलीशी आणि आहाराच्या सवयींशी असतो. म्हणजे खूप चहा-कॉफी पिणे किंवा अल्कोहोलचे सेवन आणि धूम्रपान याचा परिणाम आतड्यांच्या प्रक्रियेवर होतो, असे जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेन्टरच्या Consultant-Hepatologist, Gastroenterologist आणि Therapeutic Endoscopist डॉ. जयश्री शहा यांनी सांगितले.
स्मोकर्सनी दिवसाच्या सुरवातीला १-२ सिगरेट्स ओढल्या की त्यांची bowel movement चालू होते. त्यामुळे शरीराला निकोटीनपासून मिळणाऱ्या नशेची, चालनेची सवय झालेली असते. परंतु, कालांतराने शरीरात निकोटीन सहन करण्याची क्षमता तयार होते. म्हणून जर एखादी व्यक्ती एक सिगरेट ओढत असेल तर हळूहळू त्याची संख्या वाढू लागते. त्यामुळे bowel movement होण्यास मदत होते. आणि जर त्यांनी स्मोकिंग करणे बंद केल्यास त्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ लागतो. बद्धकोष्ठतेवर काही घरगुती उपाय
जर स्मोकिंग केल्याने तुमच्या bowel movement ला चालना मिळत असेल तर हे वाचा: धूम्रपानाच्या सवयीमुळे शरीरात निकोटीन आणि इतर टॉक्सिन्सचे प्रमाण वाढते, त्याचा संचय शरीरात होऊ लागतो. आणि निकोटिनच्या सवयीमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास अधिक बिकट होतो. तसंच २००३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या The journal Addiction च्या अहवालानुसार स्मोकिंग सोडणाऱ्या ६ व्यक्तींपैकी एकाला बद्धकोष्ठतेचा त्रास होतो आणि ११ जणांपैकी एकाची समस्या गंभीर होते. जुनाट बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी घरगुती उपाय
- यावर काय करावे?
बद्धकोष्ठतेवर इलाज म्हणून पुन्हा स्मोकिंगला सुरवात करणे योग्य नाही. धूम्रपान सोडल्यानंतर बद्धकोष्ठतेवर मात करण्यासाठी काही गोष्टी करा.
- तुम्हाला शक्य तितकं पाणी प्या. दिवसभरात कमीतकमी २-३ लिटरवर पाणी प्या. या टीप्सने पूर्ण होईल तुमचं नियमित 8 ग्लास पाणी पिण्याचे लक्ष्य !
- थोडासा गरम चहा आणि फळांचा रस घेतल्यास फायदा होईल. सकाळी उठल्यावर चहा-कॉफी घेतल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होण्यास मदत होते का ?
- भरपूर फळे खा. मनुके हा त्यावरील अतिशय उत्तम नैसर्गिक उपाय आहे.
- व्यायामामुळे नक्कीच फायदा होईल. फक्त २० मिनिटे चालणे फायदेशीर ठरेल.
- मल सौम्य करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्या.
- टॉयलेट सीटवर बसल्यावर थोडेसे पाय उचला.
जर हा त्रास २-३ आठवडे राहिल्यास डॉक्टरांची भेट घेऊन त्यावर उपचार करा. कोणत्या टप्प्यावर बद्धकोष्ठतेच्या त्रासासाठी उपचार सुरू करणे गरजेचे ठरते ?
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock