मासिकपाळीचं येणं तुम्ही गरोदर आहात की नाही याचे संकेत देतात तसेच तुमच्या आरोग्याबाबतही अनेक संकेत देतात.प्रत्येक महिन्याला येणारी मासिकपाळी ही वेगळ्या स्वरूपाची असते त्यामुळे प्रत्येक महिन्याला होणारा त्रास, वेदना, पाळीचे स्वरूप हेदेखील वेगवेगळे असते. मासिकपाळी दरम्यान होणारा रक्तस्त्राव आणि त्याचा रंगदेखील अनेक संकेत देतात. पण तपकिरी रंगाचे रक्त बाहेर पडणे हे चिंतेचे कारण आहे का ? असा प्रश्न अनेकांना सतावत असतो. मग तुमच्या मनातील याच प्रश्नाला स्त्रिरोगतज्ञ डॉ. अरुंधती धर यांनी दिलेला हा खास सल्ला नक्की जाणून घ्या.
प्रत्येक मासिकपाळीप्रमाणेच त्याच्या पाच दिवसातही रक्ताचे स्वरूप आणि रंग बदलतो. एखाद्या दिवशी रक्तस्त्राव जाड आणि गुठळ्यांनी युक्त असू शकतो तर लगेजच दुसर्या दिवशी पातळ रक्तस्त्राव होतो. मासिकपाळीदरम्यान गर्भाशयातील नाजूक आतड्यांचे आवरणही पाळीदरम्यान बाहेर पडते. सुरवातीच्या काही दिवसात रक्ताचा रंग लालसर असतो तर काही दिवसांनी रक्त जुने झाल्याने त्याचा रंग थोडा गडद / तपकिरी होतो. काही वेळेस मासिकपाळीच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये ते शरीराबाहेर पडते. काही वेळेस शरीरात रक्त लगेजच बाहेर पडत नाही. काही काळाने ते शरीराबाहेर पडते.तसेच रक्तामध्ये ऑक्सिडाईज अधिक असल्याने ते डार्क ब्राऊन रंगाचे दिसते. मासिकपाळी की गर्भपात – नेमका कशामुळे होतोय रक्तस्त्राव हे कसं ओळखाल ?
- रंगाच्या स्वरूपाबद्दल चिंता कधी करावी ?
प्रत्येक मासिकपाळी वेगवेगळी असते. त्यामुळे त्याच्या स्वरूपात आणि रंगात बदल दिसणं सहाजिकच आहे. प्रत्येक मासिकपाळीच्या चक्रात बाहेर पडणारे गर्भाशयाचे आवरण वेगळ्या स्वरूपाचे असते. पण रक्तासोबतच तुम्हांला विशिष्ट प्रकारचा उग्र वास येत असेल तर ते इंफेक्शनचे संकेत देतात. काही बर्थ कंट्रोल गोळ्यांमुळे अशा प्रकारची दुर्गंधी येऊ शकते. रक्तस्त्रावाचा रंग तपकिरी असतो. मासिकपाळीच्या नियमित दिवसांपेक्षा अधिककाळ रक्तस्त्राव होत असल्यास किंवा दोन मासिकपाळीच्या दरम्यान स्पॉटिंग होत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.मासिकपाळी आठवडाभर आधी येण्याचे कारण काय असावे ? यासोबतच मासिकपाळीबद्दल मुलींच्या मनातील ’10′ प्रश्नांवर तज्ञांची खास उत्तरं
Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock