शरीरात थायरॉईड ग्रंथींच्या कार्यामध्ये बिघाड झाला की थकवा जाणवणं मनाची अस्वथता वाढणं, सतत अंगदुखीचा त्रास जाणवणं असे त्रास वाढतात. अशावेळेच थायरॉईडची चाचणी करून त्यामधील दोष तपासणं गरजेचे आहे. पण सोबतच औषधोपचारांसोबत काही प्राचीन आणि आयुर्वेदीक उपचार पद्धतींची मदत घेणंदेखील फायदेशीर ठरते. याकरिता Allayurveda.com च्या आयुर्वेदिक एक्सपर्ट शिवांगी चॅटर्जी यांनी सुचवालेले हे आयुर्वेदीक उपाय नक्की आजमावून पहा.
1. डोक्याला मसाज - थायरॉईड ग्रंथी निष्क्रिय किंवा कमजोर असल्याचं एक संकेत म्हणजे गाऊटचा त्रास. यामध्ये शरीरात युरिक अॅसिडची निर्मिती अधिक वाढते. त्यामुळे सांध्यांचे दुखणे, अर्थ्राईटिसचा त्रास बळावतो. अशावेळेस एरंडेल तेलाने डोक्याला मसाज केल्यास थायरॉईड ग्रंथीला चालना मिळते, रक्तदाब कमी होतो, निद्रानाशाची समस्या आटोक्यात राहते. नियमित एक टीस्पून एरंडेल तेल पिणं देखील फायद्याचं आहे.
2. नस्य थेरपी - नाकपुडीमधून तेल शरीरात सोडणं या आयुर्वेदीक उपचार पद्धतीला नस्य उपचारपद्धती असे म्हणतात.मान थोडी तिरकी करून नाकपुडीतून तेल आत सोडले जाते. काही तेल तुम्ही घरीच बनवू शकता. तीळच्या तेलामध्ये आलं मिसळून तयार केलेलं तेल थायरॉईडच्या ग्रंथीला चालना देतात.
3. पादाभ्यंग - म्हणजेच पायाला मसाज. विशुद्ध चक्र किंवा थ्रोट चक्राला मसाज केल्याने थायरॉईडच्या समस्यांना आटोक्यात ठेवता येते.तळव्याला काही विशिष्ट पॉईंटवर मसाज केल्यास हा त्रास कमी करायला मदत होते. पायाच्या तळव्याला गोलाकार दिशेने हलका मसाज केल्याने शरीरात थंडावा निर्माण होण्यास मदत होते आणि आरामदायी वाटते. थायरॉईडच्या समस्येवर व्यायामाने फायदा होईल का?
4. शरीरातील adrenal gland कमजोर झाल्यास थायरॉईडच्या पातळीमध्ये असंतुलन निर्माण होते. परिणामी hypothyroidism आणि hyperthyroidism चा त्रास बळावतो. त्यामुळे adrenal gland ची काळजी घेण्यासाठी पुरेशी झोप घ्या, ताणतणाव आटोक्यात ठेवा, नियमित योगासनं,ध्यानधारणा करा. यामुळे शरीरातील घातक घटक बाहेर पडण्यास मदत होते. या ’6′प्रकारे थायरॉईडचा त्रास ठरू शकतो तुमच्या गरोदरपणातील अडथळा !
5. प्रो बायोटिक फूड - आयुर्वेदानुसार, अनेक आजार आटोक्यात आणण्यासाठी पचनाचे विकार आणि खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचे आहे. हायपोथायरॉईडिझमचा त्रास नियंत्रणात ठेवण्यासाठीदेखील पचन मार्ग आरोग्यदायी ठेवणं गरजेचे आहे. त्याकरिता प्रोबायोटिकचा आहारात समावेश करा. ताक, दही, योगर्ट, पनीर यांचा आहारातील समावेश वाढवा. Hypothyroidism चा त्रास कमी करण्यासाठी खास डाएट प्लॅन !
Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock