गर्भधारणा तेव्हाच यशस्वीपणे होऊ शकते जेव्हा तुमच्या शरीरातील सर्व कार्य सुरळीत होत असते.शरीरातील अनेक अवयव त्यांचे कार्य यांचा संबंध गर्भधारणेशी येत असतो.थायरॉईड ग्रंथीचा देखील तुमच्या गर्भधारणेवर परिणाम होत असतो.यासाठी फर्टिलिटी बाबतचे ’9′ समज-गैरसमज !जरुर जाणून घ्या.
थायरॉईड विकाराची कारणे,लक्षणे,निदान पद्धती व उपचार.
हायपोथायरॉडीझम ही एक अशी आरोग्य स्थिती आहे ज्यामध्ये थायरॉईड ग्रंथी योग्य प्रमाणात हॉर्मोन्सची निर्मिती करु शकत नाही.याचा परिणाम तुमच्या गर्भधारणेवर होतो यामुळे एकतर त्या स्त्रीला वंधत्व येते किंवा प्रेगन्सीमध्ये धोका निर्माण होतो.
यासाठी या थायरॉईड ग्रंथीबाबत या काही महत्वाच्या गोष्टी जरुर जाणून घ्या-
१.थायरॉईड हॉर्मोन्सच्या कमी निर्मितीमुळे ओव्हरीच्या(अंडाशय) कार्यावर परिणाम होतो.ज्यामुळे प्रोजेस्टरॉनची निर्मिती कमी होऊन PMS किंवा Premenstrual syndrome निर्माण होतात.इंडीयन थायरॉईड सोसायटीनूसार PMS असलेल्या ७० टक्के महिलांमध्ये थायरॉईड डिसफंक्शन व वंधत्वाची समस्या निर्माण होते.
२.थायरॉईड हॉर्मोन्समुळे सेल्युलर फंक्शन सुरळीत चालते.त्यामुळे थायरॉईडच्या कार्यात असतुंलन निर्माण झाल्यास तुमच्या गर्भधारणेवर त्याचा परिणाम होऊ शकतो.थायरॉईड विकारांचे निदान व उपचार न झाल्यामुळे वंधत्व येऊ शकते अथवा सतत मिसकॅरेज होऊ शकतात.नवी दिल्लीमधील मदर लॅप आयव्हीएफ सेंटरच्या आयव्हीएफ एक्सपर्ट डॉ.शोभा गुप्ता यांच्यामते अनेक महिलांमध्ये थायरॉईड विकारांवर योग्य उपचार करण्यात येत नाही कारण ८० टक्के महिलांमध्ये थायरॉईड समस्या वंधत्वावर उपचार करण्यासाठी केल्या जाणा-या ब्लड टेस्टमधून समोर येतात.यासाठी जाणून घ्या Hypothyroidism चा त्रास फर्टिलिटीवर कशाप्रकारे परिणाम करतो ?
३.अनेक महिलांमधील वंधत्वाचे कारण थायरॉईडची पातळी कमी असल्यामुळे अंडाशयावर होणारा परिणाम हे असते.कधी कधी वंधत्वामागचे कारण हायपोथायरॉडीझम सह पिट्युटरी ग्रंथीच्या कार्यात बिघाड होणे हे देखील असते.
४.या समस्येमधील लक्षणे प्रत्येक व्यक्तीनूसार निरनिराळी असतात.काही महिलांमध्ये या स्थितीत कोणतीही लक्षणे दिसत नाहीत तर काही महिलांमध्ये झालेल्या त्रासातून काही लक्षणे समोर येतात.वजन वाढणे,थकवा,बद्धकोष्ठता,सांधे व स्नायुंमध्ये वेदना,आळस,थंडी सहन न होणे,अनियमित मासिकपाळी व निद्रानाश ही या समस्येमागची काही सामान्य लक्षणे आहेत.तसेच या समस्येमुळे काही जणींची त्वचा कोरडी व जाड होऊ शकते.केस निर्जिव व पातळ होतात.तर काही जणींच्या भुवया पातळ व नखे ठिसूळ होतात.याच प्रमाणे गर्भधारणेमध्ये समस्या निर्माण होणे हे देखील या स्थितीचे एक प्रमुख लक्षण आहे.तसेच थायरॉइडच्या या ’6′ लक्षणांकडे मुळीच दुर्लक्ष करू नका !
५.हायपोथारॉडीझमवर करण्यात येणारे उपचार देखील प्रत्येक व्यक्तीनूसार निरनिराळे असू शकतात.त्यामुळे जर तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करीत असाल तर चांगल्या डॉक्टरची मदत घ्या.तुमची आरोग्य स्थिती तपासून डॉक्टर यासाठी तुम्हाला हॉर्मोन थेरपी घेण्याचा सल्ला देऊ शकतात.औषधांच्या सहाय्याने हॉर्मोन लेवल पुर्ववत करण्यासाठी १ ते २ महिने लागू शकतात.औषधोपचार सुरु असताना तुम्हाला सतत TSH पातळी तपासून ती नॉर्मल होत आहे का हे पहावे लागते.यासाठी तुम्हाला आयुष्यभर औषधे घ्यावी लागतात व दर सहा महिन्यांनी तुमच्या थायरॉईडची पातळी तपासावी लागते.
६.थायरॉईडचे कार्य सुधारण्यासाठी वजन आटोक्यामध्ये ठेवा,नियमित औषधे घ्या,ताण-तणावापासून दूर रहा व पुरेशी झोप घ्या.तसेच तुमच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका व नियमित चेक-अप करत जा.या उपाय योजनांनी लवकरच तुम्हाला प्रेगन्सीची गोड बातमी मिळेल.तसेच गर्भारपण व प्रसूती देखील सुखरुप होईल.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य : Shutterstock