Quantcast
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

हेल्दी रेसिपी- पनीर भुर्जी सँडविच

भेळ, पाणीपुरी यापेक्षा सँडविच नक्कीच हेल्दी आहे. सकाळच्या घाईत बनणारा हा पदार्थ  मुलांना आवडत असल्याने त्यांच्या डब्यात देण्यास ही चांगला पर्याय आहे. रात्री कामावरून उशिरा आल्यावर सँडविच पटकन बनतं आणि पोटभर होतं. परंतु, नेहमी भाज्या घालून सँडविच करण्याऐवजी हा वेगळा प्रकार नक्की ट्राय करा. बनवायला सोपं असलेलं पनीर भुर्जी सँडविच टेस्टी आणि हेल्दी आहे. मग जाणून घेऊया त्याची रेसिपी. ’6′ अस्सल मराठमोळे आणि हेल्दी पदार्थ !

 

साहित्य:

बनवण्याची पद्धत:

. मंद आचेवर पॅन ठेऊन त्यात तूप किंवा तेल घाला. तेल थोडं गरम झाल्यावर त्यात जिरं, आलं लसूण पेस्ट घाला. जिरं तडतडेपर्यंत आणि आलं लसूण पेस्टचा रंग बदलेपर्यंत थांबा.

. त्यात पनीर बारीक चिरून (कुस्करून) घाला. मग लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला आणि मीठ घाला. नंतर गॅस बंद करा आणि सगळं मिश्रण नीट मिक्स करा. वरून थोडी कोथिंबीर आणि आमचूर पावडर घाला. पुन्हा नीट मिक्स करा. तुमची पनीर भुर्जी तयार. घरच्या घरी कसा बनवाल पनीर ?

. ब्रेडच्या कडा कापून घ्या व ब्रेडला एका बाजूने बटर लावा. त्यानंतर त्यावर १-२ चमचे पनीर भुर्जी घालून पसरवा. टेस्टी पनीरचे ’5′ हेल्दी फायदे !

. त्यावर टोमॅटो आणि कांद्याचे १-२ स्लाईज ठेवा. त्यानंतर त्यावर कडा कापलेला ब्रेडचा दुसरा स्लाईज ठेवा.

. सँडविच टोस्टर मध्ये ठेवा किंवा ग्रील करा. जर तुमच्याकडे टोस्टर किंवा ग्रिल्लर नसेल तर तुम्ही पॅन वापरू शकता. पण गॅसवर ठेवून त्यावर थोडं बटर किंवा तूप घाला. त्यावर सँडविच ठेवा. मंद आचेवर सँडविच गोल्डन ब्राउन होऊ द्या. त्यानंतर गरमागरम सँडविचचा टोमॅटो सॉस किंवा खोबऱ्याच्या चटणी सोबत आस्वाद घ्या. प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेली सॅन्डव्हिचेस या ’4′ घातक कारणांसाठी टाळा !

 

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>