Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

chronic constipation चा त्रास म्हणजे काय ?

$
0
0

सकाळी उठल्यावर पोट साफ झाले की सारा दिवस  सुरळीत जातो. पण काहींना सकाळी शौचाला होत नाही. पोट साफ न झाल्याने त्याचा परिणाम दिवसभराच्या कामावर होतो. एखाद दोन दिवस पोट साफ न होणं, चिड चिड होणं, थकल्यासारखं वाटणं हा त्रास म्हणजे लगेच तुम्हांला तीव्र स्वरूपाची बद्धकोष्ठता आहे. असा होत नाही. बद्धकोष्ठतेचा त्रास आणि तो व्यक्तिपरत्वे प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वाढू शकतो. बद्धकोष्ठतेच्या त्रासाकडे दोन प्रकारे पाहिले जाते. किती दिवसांनी शौचाला होते आणि त्याचे स्वरूप. एखाद्या व्यक्तीसाठी सामान्य समजली जाणारी एखादी गोष्ट दुसर्‍यासाठीदेखिल तितकीच सामान्य असेल असे नाही. एखादी व्यक्ती दोन दिवसातून एकदा शौचाला जातो म्हणजे त्याला बद्धकोष्ठतेचा त्रास आहे असे नाही. प्रत्येकाच्या जीवनशैलीनुसार, बद्धकोष्ठतेचा त्रास वेगवेगळा आहे. असा सल्ला Jaslok Hospital & Research Centre चे  Consultant- Hepatologist, Gastroenterologist & Therapeutic Endoscopist डॉ. जयश्री शहा यांनी दिला आहे.

  • बद्धकोष्ठतेचा त्रास कधी ठरतो त्रासदायक ?

पोट जड वाटणं, ब्लोटिंग त्रास, भूक मंदावणं, पित्ताचा त्रास, ढेकर न येणं, अवघडल्यासारखं वाटणं ही बद्धकोष्ठतेची लक्षण आहेत. सुeरवातीच्या टप्प्यावरच बद्धकोष्ठतेच्या त्रासाकडे पुरेसे लक्ष दिल्यास आहारात आनि जीवनशैलीत सकारात्मक बदल करून बद्धकोष्ठतेचा त्रास आटोक्यात आणण्यास मदत होते. जुनाट किंवा तीव्र बद्धकोष्ठतेचा त्रास हा 2-4 आठवड्याचा असतो. तुम्हांला बद्धकोष्ठतेचा त्रास खूप काळ आणि सतत जाणवत असल्यास त्याकडे लक्ष देणं गरजेचे आहे. डॉ. शहा यांच्या सल्ल्यानुसार, सुमारे 80-90% बद्धकोष्ठतेचा त्रास हा खाण्या-पिण्याच्या चूकीच्या सवयी आणि आरोग्यदायी  जीवनशैली नसल्याने वाढतो. कोणत्या टप्प्यावर बद्धकोष्ठतेच्या त्रासासाठी उपचार सुरू करणे गरजेचे ठरते ? हेदेखील नक्की जाणून घ्या

कसा ओळखाल तुमचा तीव्र बद्धकोष्ठतेचा त्रास ?

  • शौचाचे स्वरूप कडक असल्यास
  • नियमित शौचाला होण्याऐवजी तुम्हांला एक दिवसा आड शौचाला होत असल्यास
  • दर दोन दिवसांनी शौचाला होणं ही तुमची सवय बदलून दर चार दिवसांनी शौचाला होणं.
  • दिवसातून दोनदा शौचाला होत असले  तरीही ते कडक / गोळ्या सारखे होण

तुमच्या शौचाला होण्याच्या या नियमित बदलांकडे  पुरेसे लक्ष द्या. हा त्रास 15 दिवस जाणवल्यास वेळीच त्याकडे लक्ष द्या. पोट साफ होण्यासाठी औषधांचा भडिमार करण्याऐवजी तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीमध्ये बदल करा. यामुळे तुम्हांला बद्धकोष्ठतेच्या त्रासावर नियंत्रण मिळवणे शक्य होईल. जुनाट बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी घरगुती उपाय

Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>