ब-याचदा मुलांमधील ऑटिझम स्पेक्ट्रम डिसॉर्डर स्विकारणे त्या मुलाच्या पालक व कुटूंबियांना अवघड जाते.ऑटिस्टिक मुलांच्या पालकांची जीवनशैली नेहमीच त्रासदायक व तणावग्रस्त असते असे नाही.ऑटिझम या विकाराविषयी पुरेसे ज्ञान व अशा मुलांना सांभाळण्यासाठी काही टीप्स वापरल्यास पालकांना मुलांसोबत संवाद साधणे सोपे जाऊ शकते.
अभ्यासामध्ये असे आढळले आहे की ऑटिझमची निर्मिती मुलांमध्ये त्यांच्या मेंदूच्या विकासाच्या सुरुवातीच्या काळातच होते. प्रत्येक केसमधील ऑटिझम हा वेगळा असल्यामुळे त्या केसनुसार त्या मुलाच्या गरजा ओळखून त्याच्यावरील उपचार व थेरपी ठरविण्यात येते.यासाठी ऑटिस्टिक मुलांना सांभाळताना या ६ गोष्टी जरुर लक्षात ठेवा
यासाठी Mom’s Belief या संस्थेचे सीईओ नितीन बिंदलिश यांच्याकडून जाणून घेऊयात अशा मुलांना सांभाळण्यासाठी काही ऑटिझम टीप्स.
१.तुमच्या संवाद कमी साधणा-या मुलांशी बोलताना कमीतकमी शब्दांचा वापर करा.”पाणी पी” “खाली बस” किंवा “पुस्तक वाच” अशा सोप्या शब्दातील सूचना समजणे मुलांना सोपे जाते.तसेच ऑटीझमच्या या सुरवातीच्या टप्प्यातील लक्षणांकडे मूळीच दुर्लक्ष करू नका !
२.त्यांचे सांकेतिक भाषा ओळखा.ऑटिस्टिक मुले त्यांच्या गरजा सांगण्यासाठी विशिष्ट आवाज,बॉडी लॅन्ग्वेज,भावमुद्रा यांचा वापर करतात.त्यांची ही सांकेतिक भाषा समजून घेतल्यास तुम्हाला तुमच्या मुलाशी प्रभावीपणे संवाद साधता येऊ शकतो.
३.तुमच्या मुलांची संवेदनक्षमता ओळखा.ऑटिस्टिक मुले आवाज,प्रकाश,स्पर्श व गंधाबाबतीत अति संवेदनशील असतात.तुम्हाला या गोष्टी समजू लागल्यावर अशा गोष्टींना दूर ठेऊन तुम्ही मुलांशी चांगला संवाद साधू शकता.
४.दैनंदिन कामाचे वेळापत्रक पाळा.नित्याची कामे सुरळीत झाल्यास तुमच्या मुलाला सुरक्षित वाटू शकते.त्यांचे जेवण, दुपारची झोप,शाळा,थेरपी व रात्रीची झोप वेळेत होणे गरजेचे आहे.जर सुट्टीच्या दिवशी तुमच्या मुलांच्या रुटीनमध्ये फरक पडणार असेल तर याबाबतीत त्याला आधीच तयार करा.
५.तुमच्या मुलांच्या चांगले गुण व आवडत्या गोष्टींवर नीट लक्ष द्या.प्रत्येक मुलामध्ये काहीना काहीतरी चांगल्या गोष्टी व कौशल्ये असतात.खरेतर काही ऑटिस्टिक मुले तर अतिशय कुशल व प्रतिभावंत असतात.मुलांच्या या चांगल्या गोष्टींकडे लक्ष देऊन तुम्ही त्यांच्यामध्ये आत्मविश्वास व आत्मसन्मान निर्माण करु शकता.ऑटिस्टिक मुलांना काही मर्यादित गोष्टींमध्येच रुची असू शकते.त्या गोष्टींचा वापर तुम्ही त्यांच्यामध्ये भाषेचे ज्ञान व भाषा संपादन करण्यासाठी करु शकता.
६.घरामध्ये त्यांच्यासाठी सेफ झोन निर्माण करा.सेफ झोन ही या मुलांची अशी खाजगी जागा असते जिथे मुलांना सर्वांत जास्त सुरक्षित व आरामदायक वाटते.या जागेसाठी तुमच्या मुलाला समजतील अशा सीमा मर्यादित करा.या जागी मुलांसाठी धोकादायक असतील अशा कोणत्याच गोष्टी असणार नाहीत याची खात्री करुन घ्या.
७.मुलांसाठी काही विज्युअल संकेत वापरा.सामान्यत: ऑटिस्टिक मुलांना दृष्यस्वरुपातील भाषा समजते त्यामुळे त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो.यासाठी तुम्ही चित्रे,वस्तू,फोटो,चिन्ह किंवा व्हिडीओ वापरु शकता.
८. मुलांशी संवाद साधताना धीर ठेवा.मुलांसांठी कोणत्या गोष्टी योग्य आहेत हे समजून घेण्यासाठी काही गोष्टींचे प्रयोग सतत करत रहाणे गरजेचे असते.जेव्हा तुम्हाला त्या गोष्टी समजू लागतील सहाजिकच त्यासाठी लागणारा तुमचा वेळ व प्रयत्न दोन्हीही कमी होतील.तसेच या लक्षणांनी वेळीच ओळखा ऑटिझम आणि त्यावरील उपाय !
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock