Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

पुदीन्याचा चहा – PCOS ची समस्या आटोक्यात आणणारा नैसर्गिक उपाय

$
0
0

स्त्रियांमध्ये वाढणार्‍या PCOS च्या समस्येमुळे चेहर्‍यावर अनावश्यक केस वाढणं आणि अ‍ॅक्नेचा त्रास हे अत्यंत त्रासदायक असतात. या समस्येला hirsutism म्हणतात.शरीरातील androgens चे प्रमाण वाढल्याने हा त्रास अधिक वाढतो.

ओठांवर केस वाढणं, चेहर्‍यावर केस वाढणं यामुळे स्त्रियांना लज्जास्पद वाटते. चेहर्‍यावर वाढणार्‍या अनावश्यक केसांमुळे अनेकींचा आत्मविश्वास कमी होतो. चेहर्‍यावरील अनावश्यक केस कमी करण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत पण PCOS चा त्रास असणार्‍या मुलींमध्ये मेल हार्मोन कमी  करण्यासाठी पुदीना हा नैसर्गिक उपाय नक्की वापरून पहा..

पुदीन्याचा मंद सुगंध आणि ताजी चव तुमचा मूड सुधारण्यासाठी नक्की मदत करतो. पण सोबतच PCOS चा त्रास असणार्‍यांनी पुदीन्याचा चहा पिणं फायदेशीर आहे.

टर्कीमध्ये 21 महिलांवर करण्यात आलेल्या एका प्रयोगानुसार, 12 PCOS चा त्रास असणार्‍या मुलींना मासिकपाळीच्या follicular phase दरम्यान 5 दिवस दोनदा पुदीन्याचा चहा देण्यात आला होता.

काही दिवसांनी संशोधकांनी त्यांच्या शरीरात testosterone चे प्रमाण तपासले. त्याचा निष्कर्ष आश्चर्यचकित करणारा होता. या मुलींच्या शरीरातील  testosterone ची पातळी खालावलेली आढळून आली आहे. तर follicle ला चालना देणार्‍या हार्मोन्समध्ये सुधारणा झालेली दिसून आली. 2009 साली करण्यात आलेल्या अहवालानुसार, hirsutism वर उपचार करण्यासाठी पुदीना हा उत्तम नैसर्गिक उपाय आहे.

पुदीन्याचा चहा कसा बनवाल ?

पुदीन्याचा चहा बनवण्यासाठी तुम्ही ताजी पुदीन्याची पानं किंवा सुकलेली, ऑनलाईन विकत मिळणारी spearmint विकत घेऊ शकता.

  • चहापुरता पाणी उकळा.
  • पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये पानं मिसळा.
  • 5 मिनिटांनंतर चहा गाळून केवळ गरम पाण्यात मिसळलेल्या पुदीन्याच्या पानांचा आस्वाद घ्या.
  • याऐवजी पाण्यामध्ये पुदीन्याची पानं मिसळल्यानंतर तो चहा न गाळता तसाच प्यावा. पुदीन्याची पानंदेखील तुम्ही चावू किंवा चघळू शकता.
  • सकाळ – संध्याकाळ म्हणजेच साधारण दिवसातून दोनदा तुम्ही  पुदीन्याचा चहा पिऊ शकता.

References:

1. Akdoğan, M., Tamer, M. N., Cüre, E., Cüre, M. C., Köroğlu, B. K., & Delibaş, N. (2007). Effect of spearmint (Mentha spicata Labiatae) teas on androgen levels in women with hirsutism. Phytotherapy Research, 21(5), 444-447.

2. Grant, P. (2010). Spearmint herbal tea has significant anti‐androgen effects in polycystic ovarian syndrome. a randomized controlled trial. Phytotherapy Research, 24(2), 186-188.

Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>