Quantcast
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Fetal echocardiogram (FE) scan बाबत काही खास गोष्टी !

गरोदरपणी प्रेगन्सी कर्न्फमेशन टेस्ट केल्यापासून तुमच्या गायनेकॉलॉजिस्टच्या सल्लानूसार गर्भाची वाढ तपासण्यासाठी आतापर्यंत तुम्ही अनेक टेस्ट केल्या असतील.यासाठी Pregnancy कन्फर्म करण्यासाठी मदत करतात या ’3′ टेस्ट !हे जरुर वाचा.गरोदरपणी केलेल्या अल्ट्रासाउंड टेस्टमुळे गर्भाच्या वाढीबाबत अनेक गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजतात.बाळाच्या ह्रदयामध्ये एखादी समस्या अाहे का हे जाणून घेण्यासाठी गायनेकॉलॉजिस्ट तुम्हाला Fetal echocardiogram scan करण्याचा सल्ला देतात.त्यामुळे जर तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला ही चाचणी करण्याचा सल्ला दिला असेल तर लगेच घाबरु नका त्यापेक्षा मुलूंडच्या फोर्टीस हॉस्पिटलमधील Consultant Paediatric Cardiologist डॉ.स्वाती गारेकर यांचा याबाबतचा हा सल्ला जरुर जाणून घ्या.

Fetal echocardiography म्हणजे नेमके काय?

Fetal echocardiography ही गर्भाच्या ह्रदयातील विकारांचे त्वरित निदान करणारी एक टेस्ट आहे.ही टेस्ट गर्भवती मातेच्या नेहमी करण्यात येणा-या अस्ट्रासाउंड स्कॅन प्रमाणेच असते. गर्भवती मातेची FE टेस्ट करणारी व्यक्ती ही एकतर Paediatric Cardiologist किंवा Foetal Echocardiography मधील स्पेशलीस्ट Radiologist असावी.

Fetal Echocardiogram टेस्ट करण्याची कोणाला गरज असू शकते?

गर्भामध्ये होणारा बिघाड हा जन्म दोषाचाच एक प्रकार असल्यामुळे सर्वच गरोदर महिलांना FE टेस्ट करण्याची गरज नसते.त्याऐवजी गरेदरपणातील अत्यावश्यक अल्ट्रासाउंड टेस्टचा एक भाग म्हणून स्क्रीनींग हार्ट व्हूव्ज ही एक साधी टेस्ट केली जाते.जी ब-याचदा रेडीओलॉजिस्ट कडून गर्भधारणेच्या अठराव्या आठवड्यामध्ये करण्यात येते. स्क्रीनींग हार्ट व्हूव्जमध्ये गर्भाच्या ह्रदयाच्या काही इमेजेस घेण्यात येतात ज्यामुळे गर्भाच्या ह्रदयातील बिघाडाचे निदान करणे सोपे जाते.जर या चाचणीमध्ये तज्ञांना काही संशय आढळला तर पुढे Fetal echocardiogram ही टेस्ट करावी लागते.

Fetal echocardiogram करण्यासाठी कोणती कारणे कारणीभूत असू शकतात?

काही आरोग्य स्थितीमुळे तुमच्या बाळाला ह्रदयविकार होण्याचा अधिक धोका असू शकतो.खालील पैकी काही गोष्टी तुमच्या केसमध्ये आढळल्यास तुम्हाला FE करण्याचा सल्ला देण्यात येतो.

१.गर्भाच्या मानेच्या बाजूची त्वचा जाड होणे(ज्याला शास्त्रीय भाषेत Nuchal thickness असे म्हणतात)असे असल्यास त्या गर्भवती स्त्रीला  FE करण्याचा सल्ला देण्यात येतो. गर्भधारणेच्या ११ ते १३ आठवड्यांमध्ये करण्यात येणा-या नियमित अल्ट्रासाउंड टेस्ट मध्ये Nuchal thickness चे निदान करण्यात येते.

२.१८ व्या आठवड्यातील स्कॅन मध्ये रेडीओलॉजिस्टला गर्भाच्या ह्रदयामध्ये बिघाड झाल्याचा संशय आल्यास.

३. डॉक्टरांना गर्भाच्या आकारामध्ये एखादी विकृती आढळली.

४.जर गरोदर स्त्रीच्या कुटूंबामध्ये Congenital Heart Diseaseची हिस्ट्री असेल.

५.जर स्त्रीला गरोदरपणात मधूमेह,ल्युपस अथवा रुबेला व इतर टॉर्च इनफेक्शनचा त्रास असेल .

६.जर प्रेगन्सीच्या सुरुवातीच्या काळात त्या स्त्रीची काही औषधे सुरु असतील.

७.आयव्हीएफ अथवा अनैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा केल्यास.

तसेच वाचा पस्तीशीनंतर आई होण्याचा निर्णय यशस्वी करण्यासाठी पाळा या ’35′ टीप्स !

FE टेस्ट करण्याचा योग्य कालावधी कोणता?

FE टेस्ट करण्याचा योग्य कालावधी हा गर्भधारणे दरम्यान १८ ते २२ आठवडे हा असू शकतो.कारण ही टेस्ट कनॉर्मल असल्यास गर्भाचे ह्रदय निरोगी आहे हे त्याच्या पालकांना समजू शकते.

Fetal echocardiogram चा रिझल्टचा परिणाम काय असू शकतो?

जर गर्भाच्या ह्रदयामध्ये एखाद्या गंभीर विकाराचे निदान झाले तर त्या पालकांना प्रथम त्या विकाराबाबत समूपदेशन करण्यात येते.त्यामुळे जन्माच्या वेळी काय होऊ शकते,त्यासाठी आधीच कोणती तयारी करणे गरजेचे आहे,कोणत्या वयात बाळाला काय उपाययोजना करणे गरजेचे आहे व उपचारांनंतर दीर्घकाळ कोणत्या वैद्यकीय मदतीची गरज लागणार या गोष्टी समजावण्यात येतात.पालकांना या विकारा बाबत समूपदेशन व योग्य ज्ञान दिल्यामुळे ते त्यांच्या सोयीनूसार उपचार पद्धती निवडू शकतात.

Fetal echocardiogram टेस्ट करताना काय समस्या येऊ शकतात?

आत्तापर्यंत १८ आठवड्यांच्या पुढील गर्भासाठी Fetal echocardiogram टेस्ट केल्याचे कोणतेही पुरावे नाहीत कारण त्यानंतर ही टेस्ट करणे बाळ व माता दोघांसाठी हानिकारक असू शकते. FE टेस्ट वेदनादायक नसते.लवकर या समस्येचे निदान झाल्यामुळे काही प्रमाणात बाळांच्या जीवाचा धोका टाळता येऊ शकतो.या टेस्टची गर्भाच्या फुफ्फुसांमधील रक्तवाहिन्यांवर येणारा अतिदाब यासारख्या गुंतागुतीच्या समस्या टाळण्यासाठी देखील मदत होते कारण अशा घटना बाळासाठी हानिकारक असू शकतात.त्यामुळे वेळीच ही टेस्ट केल्यामुळे पुढील धोके टाळता येतात.तसेच गर्भपातानंतर पुन्हा बाळासाठी प्रयत्न करण्यापुर्वी करा या ५ डायग्नोस्टीक टेस्ट देखील जरुर वाचा.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>