Quantcast
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

मुलांना सांभाळण्यासाठी आया शोधण्यापूर्वी या 8 गोष्टी अवश्य लक्षात ठेवा

लहान बाळाचे त्याची आईच उत्तम संगोपन करु शकते.पण कधीकधी मुलांना सांभाळताना आईला देखील एखाद्या मदतनीसची गरज लागू शकते.विशेषत: जेव्हा त्या मातेला पुन्हा तिच्या कामासाठी रुजू व्हायचे असते किंवा घरातील इतर जबाबदा-या यशस्वीपणे पार पाडायच्या असतात.जर अशा परिस्थितीत तिला तिच्या घरच्यांकडून मदत मिळणे शक्य नसेल तर तेव्हा तिला एखाद्यी मदतनीस अथवा आयाची मुलांना सांभाळण्यासाठी मदत घ्यावी लागते.आयामुळे बाळाच्या आईला आराम मिळू शकतो,बाळंतपणानंतर येणा-या नैराश्यावर मात करता येते व बाळासोबत चांगले नाते निर्माण करण्यास मदत होते.

पण बाळासाठी एखादी योग्य  आया शोधताना या गोष्टी जरुर लक्षात ठेवा.

मदतनीस ठेवण्यापूर्वी तिच्यासोबत आधीच बोलून काही गोष्टी स्पष्ट करा.

सर्वात आधी समजून घ्या की ती हे काम करण्यास का तयार आहे.तुमची मदतनीस तुमच्या बाळाला दिवसभर सांभाळण्यास तयार आहे का? ती तुम्हाला स्वयंपाक घरातील कामात देखील मदत करु शकते का? तुम्हाला स्वयंपाकासाठी अथवा घरातील स्वच्छतेसाठी देखील तिची मदत हवी आहे का? या गोष्टी आधीच स्पष्टपणे बोलल्यामुळे तुम्हाला एकमेंकाकडून नेमके काय अपेक्षित आहे हे लक्षात येईल.जर घरच्या कामामुळे तुम्हाला तुमच्या बाळासोबत वेळ घालवणे शक्य नसेल तर तुमच्या मदतनीसचे काम किचनमध्ये मदत करणे हे देखील आहे हे तिला सांगा.पण जर तुम्ही पुन्हा तुमच्या कामावर जाण्यास सुरुवात करणार असाल तर मात्र तिची बाळाला सांभाळणे ही सर्वात महत्वाची जबाबदारी असेल.कारण नंतर जर तिने नंतर एखादे काम करण्यास नकार दिला तर तुमच्या घरातील वातावरण बिघडू शकते.यासाठी या गोष्टी आधीच स्पष्ट करा.तसेच या ’10′ उपायांनी प्रसुतीनंतर मिळवा पुरेशी झोप !

एखाद्या अनुभवी मदतनीसची मदत घ्या-

तुमच्या बाळाला सांभाळण्यासाठी एखादी तिशीतील किंवा त्यापेक्षा वयस्कर महिला शोधा कारण अशा महिलांना बाळाला सांभाळण्याचा चांगला अनुभव असतो.

मदतनीसची नीट चौकशी करा-

जर तुम्हाला राहण्यासाठी अथवा बारा तासांच्या शिफ्टसाठी मदतनीस हवी असेल तर मदतनीसची निवड करताना पोलिस वेरीफिकेशन करुन तिचे आइटेन्टी प्रूफ जरुर तपासा.जर तुम्ही निवडलेली मदतनीस आया सेंटर अथवा एखादया संस्थेच्या मार्फत असेल तर याबाबत असणा-या कायदेशीर बाबी जरुर पूर्ण केल्या जातात पण नसेल तर त्या तुम्हाला कराव्या लागतील.जरी ती तिच्या कामामध्ये कितीही चांगली असली तरी तुमच्या बाळाची सुरक्षा फार महत्वाची आहे.यासाठी तिच्या घरी भेट द्या,तिचा कॉन्टेक्ट नंबर घ्या तसेच तिच्या घरातील एखाद्या व्यक्तीचा फोन नंबर घ्या जेणेकरुन गरज लागल्यास तुम्ही तिच्या कुटूंबाला संपर्क करु शकाल.हे सर्व तुम्हाला तुमच्या बाळाच्या सुरक्षेसाठी करावेच लागेल.तसेच अधिक सुरक्षेसाठी घरी तुम्ही आय पी कॅमेरा व सीसीटीव्ही देखील लावू शकता.ज्यामुळे कामावर असताना तुमच्या कॅमे-यामध्ये तुम्ही तुमच्या घरातील वातावरण दररोज लाइव्ह पाहू शकता.ज्याची तुम्हाला मदतनीस व तुमच्या बाळावर लक्ष देण्यासाठी मदत होऊ शकते.

तिला ट्रेनींग द्या.

जरी तुमची मदतनीस अनुभवी असली तरी ती तुमची कामे तुमच्या पद्धतीने नाही करु शकत.त्यामुळे तिला स्वच्छता व बाळाची काळजी याबाबत पुरेसे प्रशिक्षण द्या.जर तुम्हाला कामावर जाणे पुन्हा सुरु करायचे असेल तर एक महिना आधीपासूनच तुमच्या मदतनीसला प्रशिक्षण देण्यास सुरुवात करा.तुमच्या बाळाच्या रोजच्या रुटीनबाबत,त्याची झोपण्याची व खेळण्याची वेळ तिला समजावून सांगा.बाळाचे अन्न कसे शिजवावे व त्याला कसे भरवावे हे तिला व्यवस्थित शिकवा.जर तुम्ही तुमच्या बाळाला काही औषधे देत असाल तर त्या औषधांची यादी करुन ती भिंतीवर चिकटवून ठेवा जेणे करुन ती बाळाला औषधे देण्यास विसरणार नाही.तिला या सर्व गोष्टी शिकवल्यावर तुम्ही घरी असताना तुमच्या मदतीशिवाय ती या सर्व गोष्टी कशा करते याचे परिक्षण करा.थोडक्यात तिच्यावर जबाबदा-या सोपवा व तिला बेसिक प्रथमोपचार देखील जरुर शिकवा.

तुमच्या मदतनीसला कामावर ठेवण्यापूर्वी तिचे संपूर्ण मेडीकल चेकअप करु घ्या.

तुमच्या मदतनीसला तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे घेऊन जा व ितचे आवश्यक लसीकरण करुन घ्या. ज्यामुळे तिच्यामार्फत तुमच्या बाळाला कोणतेही इनफेक्शन होणार नाही.तसेच तिचा रक्तदाब व आवश्यक ब्लड टेस्ट देखील जरुर करुन घ्या.कारण तुमचे बाळ सांभाळत असताना तुमच्या आजारी मदतनीसची तुम्हाला नक्कीच मदत होणार नाही.जर तुम्हाला घरी राहणारी मदतनीस हवी असेल तर या गोष्टी फार महत्वाच्या असू शकतात. मात्र बारा तासांची शिफ्ट करणा-या मदतनीसचे देखील मेडीकल चेकअप करणे गरजेचे आहे.

तुमच्या बाळाला देखील यात सहभागी करुन घ्या.

जर तुमचे बाळ मदतनीस कडे रहात नसेल तर तुमची सर्व मेहनत पाण्यात जाऊ शकते.त्यामुळे तुमच्या मदतनीसने कामाला येण्यास सुरुवात करण्यापूर्वी तिला तुमच्या बाळाला भेटू द्या.त्यामुळे जर तुमचे बाळ खूपच लहान असेल तर तुमच्यासमोर मदतनीसने त्याला भरवल्यावर अथवा स्वच्छ केल्यावर त्याला बरे वाटत आहे का हे जरुर पहा.कदाचित सुरुवातीला ते अस्वस्थ होऊ शकते पण काही दिवस झाल्यावर देखील तुमचे बाळ तिच्याकडे नीट रहात नसेल तर ती तुमच्या बाळाला सांभाळण्यासाठी नक्कीच चांगला पर्याय असू शकत नाही.

मदतनीसला नेहमी वेळेत घरी जाऊ द्या.

जर तुम्ही काही ठराविक वेळेसाठी मदतनीसला कामावर ठेवले असेल तर ती वेळ कटाक्षाने पाळा.कारण कोणालाही ओव्हर टाइम काम करणे आवडत नाही.त्यामुळे तुमच्या मदतनीस ला देखील कामाच्या वेळेनंतर थांबणे नक्कीच आवडणार नाही.त्यामुळे जर तुम्ही तिच्याकडून जास्त काम करुन घेतले तर ती त्याचा राग तुमच्या बाळावर काढू शकते आणि  हे फारच भयानक असेल.त्यामुळे शिस्त पाळा व वेळेचे नीट नियोजन करा.

तुमच्या मदतनीसला तिची स्पेस द्या.

जर मदतनीस तुमच्या घरी रहाणार असे ठरले असेल तर तिला कामावर असताना रहाण्यासाठी व झोपण्यासाठी तिची वेगळी स्पेस द्या.तसेच दिवसभरात काही ठराविक वेळेत तिला घरा बाहेरील एखाद्या पार्कमध्ये फिरण्यास जाणे अथवा तिचा एखाद्या आवडता कार्यक्रम टिव्हीवर पहाणे यासाठी वेळ द्या.जेव्हा मदतनीस दूर असेल तेव्हा या काळात तुम्ही तुमच्या बाळासोबत वेळ घालवू शकता.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>