हाताचे सौंदर्य सांभाळताना नखांची काळजी घेणंदेखील गरजेचे आहे. अनेकदा नखं पिवळसर झाल्याने किंवा त्यावर पांढरे डाग पडल्याने त्यांना लपवण्यासाठी नेलपेंट्सचा वापर केला जातो. परंतू यामुळे नखांचे सौंदर्य अधिकच बिघडू शकते. बदलत्या जीवनशैली आणि तणावग्रस्त जीवनशैलीमुळे किंवा पोषणद्रव्याच्या कमतरतेमुळे ही समस्या वाढू शकते. मग नखांचे सौंदर्य वाढवण्यासाठी खालील घरगुती उपाय नक्की करून पहा -
लिंबू आणि बेकिंग सोडा -
लिंबामध्ये ब्लिचिंग घटक मुबलक प्रमाणात आढाळतात. सोबतच त्यातील अॅन्टिसेप्टीक आणि अॅन्टीबॅक्टेरियल घटक नखांवरील अतिरिक्त पिवळसरपणा कमी करण्यास मदत करतात. सोबतच बेकिंग सोडा नखांना चमकदार करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे या घरगुती मिश्रणाने तुमच्या नखांचे सौंदर्य अधिक खुलवा.
कसा कराल हा उपाय ?
- बेकींग सोडा आणि लिंबाचा रस समप्रमाणात मिसळून मिश्रण तयार करा.
- तयार मिश्रण नखांच्या क्युटिकल्सवर लावा.
- 10-15 मिनिटे हे मिश्रण सुकू द्या.
- त्यानंतर कोमट पाण्याने नखं स्वच्छ धुवा.
- त्यानंतर बोटांवर व नखांवर मॉईश्चराईझरने हलका मसाज करा.
- हा प्रयोग नियमित दिवसातून दोनदा करावा.
टुथपेस्ट
टुथपेस्टमध्ये काही प्रमाणात हायड्रोजन पॅरॉक्साईड आढळते. यामुळे नखं स्वच्छ, शुभ्र आणि चमकदार करण्यासाठी मदत होते. मात्र हायड्रोजन पॅरॉक्साईडचे प्रमाण 3% हून अधिक नसावे याची काळजी घ्या.
कसा कराल हा उपाय :
- नखांवर टूथपेस्ट लावून 10-15 मिनिटे ठेवा.
- नेलब्रश किंवा मऊ टुथब्रशच्या सहाय्याने हलका मसाज करा.
- कोमट पाण्यात कापसाचे बोळे बुडवा आणि त्याच्या सहाय्याने टुथपेस्ट काढा.
- हा प्रयोग आठवड्यातून 2-3 वेळेस करावा.
यासोबत नखांचे सौंदर्य वाढवण्यासाठी आणि पिवळे डाग कमी करण्यासाठी गडद रंगाची नेलपेंट लावण्यापूर्वी नखांवर ट्रान्सपरंट बेस कोट लावावा. यामुळे हाता-पायांना केलेले मेनिक्युर व पेडीक्युर दीर्घकाळ राहण्यास मदत होते. तसेच नखांचे सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही लिंबाचा रस किंवा बदामाच्या तेलाचा वापर करू शकता.
संबंधित दुवे -
नखं खाण्याची सवय दूर करतील या ’6′ गोष्टी !
नखांचा पिवळेपणा हटवणारा घरगुती उपाय !
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Source - How to whiten nails naturally?
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.