Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

ओठांचा काळपटपणा कमी करण्याचा झटपट घरगुती उपाय

$
0
0

चेहर्‍याचे सौंदर्य खरे खुलते ते तुमच्या ओठांमुळे! पण सतत ओठांना जीभ लागल्यामुळे, सुर्यप्रकाशामुळे तर काहीजणांमध्ये धुम्रपानामुळे ते काळे पडण्याची शक्यता असते. पण पुन्हा ते पूर्वरत करण्यासाठी सेलिब्रिटी डरमॅटोलॉजिस्ट डॉ. जयश्री शरद यांनी सुचवलेला हा उपाय तुम्ही नक्की वापरून पहा.

ओठांना पुन्हा गुलाबी करण्याचा खास पॅक -

  • चमचाभर मधामध्ये काही थेंब लिंबाचा रस मिसळा.
  • ओठांवर या मिश्रणाचा हलका मसाज करा.
  • त्यावर दुधाच्या सायीने हळूवार मसाज करा.
  • 10 मिनिटांनंतर ओठ कोमट पाण्याने स्वच्छ करा.
  • नियमित हा प्रयोग केल्यास काही दिवसात तुम्हांला ओठांमध्ये फरक जाणवेल.

या पॅकमध्ये वापरलेले घटक नैसर्गिकरित्या ओठांना मॉईश्चराईज आणि हलके करतात. त्यामुळे अधिकप्रमाणात एसपीएफ असणारे लिप बाम घराबाहेर पडण्यापूर्वी वापरा. म्हणजे घातक घटकांपासून तुमचा बचाव होतो.

जर तुमचे ओठ फार वेळ कोरडे राहत असतील तर त्यांना जीभ लावणे टाळा. यासवयीमुळे ओठ अजूनच काळे पडण्याची शक्यता अधिक असते. सोबतच धुम्रपानाची सवय टाळा. म्हणजे ओठांबरोबरच तुमचे आरोग्यही सुधारण्यास मदत होते.

संबंधित दुवे - 

दातांचा पिवळेपणा मिनिटाभरात हटवण्याचा हा उपाय


छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Source - Expert-recommended home remedy to get rid of dark lips

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>