Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी !

$
0
0

मासिकपाळीचे दिवस जवळ आले की अनेक स्त्रियांना ते नकोसे वाटते. मासिकपाळीच्या दिवसांमध्ये होणार्‍या वेदनांमुळे जशी चिडचिड होते तसेच मासिकपाळीच्या दिवसांमध्ये चेहरा निस्तेज होणं, पिंपल्स वाढणं हा त्रास अधिक बळावतो. नेहमीच्या पिंपल्सपेक्षा मासिकपाळीच्या दिवसात हार्मोनल बदलांमुळे वाढणारे पिंपल्स अधिक त्रासदायक असतात. ते त्वचेचे अधिक नुकसान करतात. वाढत्या वयानुसार तारुण्यापासून सुरू झालेला हा पिंपल्सचा त्रास वयासोबत वाढत जातो. परिणामी चेहर्‍याचे अनेक प्रकारे नुकसान होते. या ‘५’ सवयी अॅक्ने वाढण्यास कारणीभूत ठरतात

घरगुती उपायांपासून ते अगदी केमिकल पिल्स, बेंझॉल पेरॉक्साईड, सायक्लिक अ‍ॅसिड या सारख्या महागड्या आणि केमिकलयुक्त पर्यायांचा वापर करूनदेखील पिंपल्सचा त्रास कमी होत नाही. अशावेळी अनेकदा आयुर्वेदीक उपचारांची मदत घेतात. आपण काय खातो यावर आपले सौंदर्य अधिक अवलंबून असते. त्यामुळे मासिकपाळीच्या दिवसात स्त्रियांच्या शरीरात होणार्‍या बदलांमुळे वाढणारी अ‍ॅक्नेची समस्या आटोक्यात ठेवण्यासाठी  Dr Vaidya’s New Age Ayurveda च्या डॉ. सूर्या भागवती यांनी सांगितलेले हे आहाराचे पथ्यपाणी नक्की पाळून पहा.

  • हार्मोनल अ‍ॅक्नेचा त्रास वाढण्यामागे आहार कारणीभूत असू शकतो का ?

आयुर्वेदानुसार, आहाराचा परिणाम निश्चितच सौंदर्यावर दिसून येतो. प्रत्येक व्याधीचे मूळ हे पोटाशी निगडित असते. मासिकपाळीच्या दिवसात हॉर्मॉनल अ‍ॅक्नेचा त्रास हमखास जाणवत असेल तर नक्कीच शरीरात हार्मोनल इन्बॅलन्स असल्याचे संकेत मिळतात. खाण्याच्या चूकीच्या सवयींमुळे हा त्रास अधिक वाढतो. डॉ. भागवती यांच्या सल्ल्यानुसार, काही पदार्थांचा आहारात समावेश केल्याने पचनक्रियेमध्ये बिघाड होतो. मैद्याचे पदार्थ,कॉफी यांचे अधिक प्रमाणात सेवन केल्यास शरीरात घातक आणि विषारी घटकांचे प्रमाण वाढते. तसेच मसालेदार,खारट,आंबट पदार्थदेखील शरीरात पित्तदोष आणि मेटॅबॉलिक रेटचे असंतुलन निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. यामुळे शरीरात हार्मोन्सचेदेखील असंतुलन वाढते.  चेहर्‍यावर पिंपल येण्याच्या जागेवरून ओळखा त्यामागील कारण

  • हार्मोनल अ‍ॅक्नेचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी आहारात काय असावे ?

तुमच्या आहारात फळं,सुकामेवा, भाज्या यांचा समावेश मुबलक असणं गरजेचे आहे. यामुळे हार्मोन्सचे संतुलन  राखण्यास मदत होते. डॉ. भागवतींच्या सल्ल्यानुसार, आहारात काय असावे हे जाणून घेण्यासाठी खास डाएट प्लॅन -

फळं : सफरचंद, केळं, पेर आणि अंजीर

भाज्या : कोबी, फ्लॉवर, पालेभाज्या, रताळं,भेंडी, हिरवे वाटाणे

फॅट्स : खोबरेल तेल ( यामध्ये lauric acid मुबलक असते. ज्यामुळे त्वचेचे नुकसान भरून निघते तसेच हार्मोन्सच्या निर्मितीला चालना मिळते.) व तूप

मसाले : जिरं, लेमनग्रास, केशर, वेलची,बडीशेप आणि पुदीना

पेय : बदामाचं दूध, नारळपाणी

  • काय खाणं टाळाल ?

फळं – द्राक्षं, चिंच, पिच, आंबट सफरचंद खाणं टाळा.

फॅट्स – तिळाचं तेल, मक्याचं तेल

भाज्या – चिली पेपर्स, वांगं,ऑलिव्ह, कच्चा कांदा,मूळा,टोमॅटो,गाजर

मसाले – मिरच्या, राई, सुंठ,लवंग, लसूण

पेय – चहा,कॉफी, फिझी ड्रिंक्स, अल्कोहल

याप्रमाणेच अ‍ॅक्ने वाढवणारे हे ’8′ पदार्थ टाळाच!

Dr Vaidya’s New Age Ayurveda is an Ayurvedic institution that provides free medical consultation to those who seek it. It specialises in quality treatment and premium herbal pharmaceutical products. Visit their website: www.drvaidyas.com

Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>