Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

जेव्हा 78 व्या वर्षी उषा सोमण मिनिटाभरापेक्षा अधिकवेळ प्लॅन्क करतात… (व्हिडियो पहा)

$
0
0

वयाची पन्नाशी पार केलेल्या मिंलिंद सोमणने आयर्नमॅन आणि अल्ट्रामॅन या जगातील दोन सर्वाधिक कठीण स्पर्धा यशस्वीरित्या पार करून अनेकांना फीटनेसकडे बघण्याचा नवा आदर्श दिला. पण मिलिंद सोमण याची आईदेखील तितकीच फीटनेस फ्रिक आहे. वयाच्या 78 व्या वर्षीदेखील उषा सोमण यांनी 1 मिनिटं 20 सेकंद साडीत प्लॅन्क केला आहे.स्त्रियांनी सारी बंधनं झुगारून स्वतःच्या फीटनेसकडे लक्ष द्यावे याकरिता मिलिंद नेहमीच दक्ष असतो.पिंकाथॉन या उपक्रमाअंतर्गत विविध आरोग्यविषयक संदेश देण्यासाठी मिलिंद देशभर फिरतो. महिलांना अधिक सुकरपणे धावता यावे याकरिता खास साडीदेखील डिझाईन करून घेतली आहे. सिक्स पॅक अ‍ॅब्स हवेत? मग करा ‘प्लान्क’ व्यायामाचे हे 5 प्रकार

यंदाचा मदर्सडे सेलिब्रेट करताना मिलिंदने त्याच्या सोशल मिडियापेजवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्याने हा खास संदेश दिला आहे.

1min 20sec plank for Mother’s day! Not her personal best but good all the same :) #live2inspire#Nextispushups #78 #UshaSoman#NeverGiveUp #KeepMoving

 

प्लॅन्क झालं आता लवकरच तुम्हांला उषा सोमण पुशअप्सदेखील करताना दिसतील असा संकेत मिलिंदने या पोस्टमध्ये दिला आहे. यापूर्वीदेखील मिलिंद सोमणसोबत उषा सोमण पिंकाथॉनदरम्यान धावताना दिसल्या. अल्ट्रामॅनच्या प्रत्येक टप्प्यावर उषा सोमण मिलिंदची काळजी घेत होत्या. तर  TheGreatIndiaRun च्या अंतिम ट्प्प्यावर मिलिंद सोमणला आईची साथ मिळली होती. देशामध्ये धावणंं या खेळाबद्दल जागृती निर्माण व्हावी याकरिता The Great India Run च्या अंतर्गत अभिनेता, धावपटू मिलिंद सोमण अहमदाबाद ते मुंंबई  हे 570 किमी अंतर धावला होता.

आई ही प्रत्येकाच्या आयुष्यातील खास व्यक्ती असते. तशीच मिलिंदला प्रेरणा देणार्‍या आईसाठी त्याने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

छायाचित्र सौजन्य – milind Soman / Facebook Account


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>