vaginal yeast infections म्हणजेच योनिमार्गातील इंफेक्शनबाबत अनेक स्त्रियांच्या मनात अनेकप्रकारची भीती आणि प्रश्न असतात. घरातल्या स्त्रियांना याबाबत विचारले तर वेगवेगळी उत्तरं मिळू शकतात तर काही जणींना अशावेळी सेक्स केल्यास साथीदाराला इंफेक्शन होण्याची भीती वाटत राहते. Well Woman Clinic, Gurgaon च्या Gynaecologist and obstetrician, डॉ. नुपूर गुप्ता यांच्या सल्ल्यानुसार,vaginal yeast infections बाबतच्या तुमच्या मनातील प्रश्नांबाबत हा सल्ला नक्की जाणून घ्या.
डॉ. नुपूर यांच्या सल्ल्यानुसार, जर तुम्हांला vaginal yeast infection चा धोका असेल तर तुमच्या साथीदारालादेखील हे इंफेक्शन पसरू शकते. मात्र त्याचा धोका तुलनेत कमी असतो. तुम्हांला vaginitis and candidiasis,चे इंफेक्शन असेल तर दोघांनाही त्यावर उपचार घेणं गरजेचे असते.त्यामुळे तुम्हांला योनिमार्गात काही इंफेक्शन जाणवत असेल तर डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या तसेच या काळात सेक्सचा आनंद घेणं टाळा. सार्वजनिक स्वच्छतागृह वापरताना या ‘९’ स्टेप्स नक्की पाळा
सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर केल्यानेदेखील योनिमार्गात इंफेक्शन होण्याची शक्यता वाढते. असेदेखील काही स्त्रियांना वाटते. डॉ. नुपूर यांच्या सल्ल्यानुसार, तुम्ही स्वतः काही स्वच्छतेचे नियम पाळल्यास सार्वजनिक स्वच्छतागृहांमुळे योनिमार्गात इंफेक्शन वाढण्याचा धोका कमी असतो. स्वच्छतागृहांचा वापर करण्यापूर्वी टॉयलेट सीट स्वच्छ करा तसेच योग्यरित्या फ्लश करा. मूत्रविसर्जनादरम्यान काही बॅक्टेरिया, यिस्ट बाहेर पडतात. तुम्ही काही मिनिटाभरासाठी टॉयलेटसीटवर बसता. टॉयलेटसीट खूपच अस्वच्छ असेल तर इंफेक्शन होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे तुम्ही वापर करण्यापूर्वी टॉयलेट सीट पुरेशी स्वच्छ करा आणि वापर झाल्यानंतरही ती स्वच्छच राहील याची काळजी घ्या. म्हनजे इंफेक्शनचा धोका आपोआपच कमी होईल. vaginal yeast infection चा त्रास टॉयलेट सीटमुळे होण्याचा धोका फारच विरळ असतो. वेस्टर्न स्टाईल पब्लिक टॉयलेटच्या वापराने आजारांना आमंत्रण !
स्त्रियांप्रमाणेच पुरूषांनादेखिल yeast infectionचा धोका होऊ शकतो. पण पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांना हा धोका अधिक असतो. कारण स्त्रियांमध्ये हा भाग अधिक खुला असतो तसेच योनिमार्गाला रक्तपुरवठा होण्याचे प्रमाण अधिक असते. जर स्त्री गरोदर असेल, मेनोपॉजच्या टप्प्यावर असेल, मधूमेही असेल किंवा रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर अशा स्त्रियांना vaginal yeast infection चा धोका अधिक असतो. योनीमार्गाचे आरोग्य जपण्यासाठी हे पदार्थ अवश्य खा !
Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock