Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

जेनरिक व ब्रॅन्डेड औषधांमध्ये नेमका काय फरक आहे?

$
0
0

मेडीकल काउंसिल ऑफ इंडीयाने नुकतेच सर्व हॉस्पिटल मधील डॉक्टरांना ब्रॅन्डेड औषधांऐवजी रुग्णांच्या खिशाला परवडतील अशा जेनेरिक औषधांचे प्रिस्क्रीप्शन देण्याचे निर्देश दिले आहेत.त्यामुळे अनेक लोकांच्या मनात असा संभ्रम निर्माण होऊ शकतो की ही जेनेरिक औषधे म्हणजे नेमके काय? व ही औषधे स्वस्त का असतात?

तसेच यासोबतच जाणून घ्या प्रिस्क्रिप्शनशिवाय वेदनाशामक औषधे खरेदी करणे सुरक्षित आहे का ?

जेनरिक औषधे नेमके म्हणजे काय?

जेनरिक औषधे व ब्रॅन्डेड औषधे याबाबतीत सारखीच असतात.

कंम्पोझिशन-जेनरिक व ब्रॅन्डेड औषधांमधील घटक पदार्थ समान असतात.

स्ट्रेंथ-या दोन्ही औषधांसाठी लागणा-या घटकांचा खर्च समान असायला हवा.

डोस-या दोन्ही औषधांचे डोस हे समप्रमाणात घेण्याचाच सल्ला देण्यात येतो.

साइड इफेक्ट-दोन्ही औषधे शरीरामध्ये समान पद्धतीनेच शोषली जातात.त्यामुळे त्यांचे परिणाम व दुष्परिणाम देखील सारखेच असतात.

औषधे घेण्याची पद्धत-दोन्ही औषधे समान प्रमाणात घेण्यात येतात.जसे की एकतर तोंडावाटे किंवा इंजेक्शनच्या माध्यमातून अथवा ड्रॉप्समधून.तसेच यासोबतच या ‘७’ OTC औषधांचा सेक्स लाईफवर होतो दुष्परिणाम हे देखील जरुर वाचा.

उदा.पॅरासिटॅमॉल हे जेनरिक औषध Calpol या Crocin ब्रॅन्डच्या नावाने विकले जाते.तसेच अॅस्प्रीन व डिस्प्रीन ही जेनेरिक औषधे वेदनाशामक औषधे म्हणून ओळखली जातात.त्यामुळे सहाजिकच जेनेरिक औषधांचे कार्य हे ब्रॅन्डेड औषधांप्रमाणेच असते.तसेच डॉक्टरांचे स्पष्ट आणि जेनरिक औषधं लिहून देणं कसे ठरणार फायदेशीर ?हे देखील जरुर वाचा.

जेनरिक औषधे ब्रॅन्डेड औषधांप्रमाणे कशी असतात?

जेव्हा फार्मास्युटीकल कंपनी एखादे औषध विकसित करते तेव्हा त्या औषधाचे पेटंट त्या कंपनीला मिळते.कंपनी वैद्यकीय संशोधनासाठी केलेल्या खर्चाची भरपाई करुन घेण्यासाठी औषधांवर काही प्रमाणात प्रिमीयम चार्ज करते.काही वर्षांनंतर जेव्हा त्या औषधांच्या पेटंटची मुदत संपते तेव्हा इतर कंपन्या देखील ही औषधे तयार करुन स्वस्त दरात विकू शकतात.सामान्यत: अनेक कंपन्यांमध्ये समान जेनेरिक औषधांच्या विक्रीबाबत स्पर्धा सुरु असते.Calpol व Crocin या दोन्ही औषधांमध्ये पॅरासिटॅमॉल हे समान औषधी घटक असतात फक्त ही औषधे दोन वेगवेगळ्या फार्मास्युटीकल कंपनी विकतात.अगदी तसेच Combiflam आणि Ibugesic या दोन्हीमध्ये देखील समान ibuprofen हे जेनेरिक औषध असते पण ती दोन्ही औषधे दोन निरनिराळ्या कंपन्या विकत अाहेत.यासाठी अधिक जाणून घ्या जेनरिक औषधं म्हणजे काय ?

जेनरिक औषधे व ब्रॅन्डेड औषधांमध्ये काय फरक असतो?

या दोन्ही औषधांमध्ये अगदी थोडाफार फरक असू शकतो.

जसे की-

पॅकेजिंग- प्रत्येक कंपनीचे औषधांचे पॅकेजिंग निरनिराळे असू शकते.

रंग- जेनरिक व ब्रॅन्डेड औषधांच्या टॅबलेट किंवा कॅप्सूलचा रंग निरनिराळा असू शकतो.

निष्क्रीय घटक- दोन कंपनीमधील निर्माण केल्या गेलेल्या मात्र औषधी घटक समान असलेल्या जेनरिक खोकल्याच्या औषधांची चव निरनिराळी असू शकते.

जेनरिक औषधे की ब्रॅन्डेड औषधे घेणे अधिक सुरक्षित आहे?

जेनरिक औषधे फक्त स्वस्त आहेत म्हणून ती ब्रॅन्डेड औषधांप्रमाणे प्रभावी नाहीत असे मुळीच नाही.दी सेंट्रल ड्रग्ज स्टॅन्डर्ड कंन्ट्रोल ऑर्गनायझेशन भारताच्या औषध नियामक प्राधिकरण आणि अन्न व औषध प्रसाशनाने या औषधांमधील घटक,त्यांची गुणवत्ता व प्रभाव काटेकोरपणे तपासले आहेत व त्यांनी जेनरिक व ब्रॅन्डेड या दोन्ही औषधांना समान मानांकन दिले आहे.त्यामुळे दोन्ही औषधांचा प्रभाव हा समानच असतो.

काही जेनरिक औषधे व त्यांचे भारतीय ब्रॅन्ड-

  • Paracetamol (pain reliever, fever reducer) – Crocin, Calpol

  • Prednisolone (corticosteroid) – Wysolone, Prid tab, Hostacortin

  • Ibuprofen (anti inflammatory drug) – Combiflam, Sugafen,

  • Iburin Aspirin (mild pain killer) – ASA, Solosprin, Modlip ASP, Disprin

  • Pantoprazole (antacid) – Pan 40, Aciban, Anto- D

  • Enalapril (BP medication) – Envas, Enace D

  • Codeine (mild pain killer) – Corex, Paracod, Codopyrin

  • Amoxicillin (antibiotic) – Amox, Cidomex, Glamoxin

  • Insulin (diabetes) – Actrapid, B D Microfine, Humanext N

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>