ह्रदयविकार,स्ट्रोक,लठ्ठपणा यांचा उच्च रक्तदाबाशी संबंध असतो.पण अनेकांना हे माहितच नसते की उच्च रक्तदाबाचा तुमच्या सेक्स लाइफवर देखील विपरित परिणाम होऊ शकतो.जेव्हा रक्तवाहिन्यांच्या आतील अस्तर जाड होते तेव्हा तेथील रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होतो.सहाजिकच ज्यामुळे रक्तदाब वाढून अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात.Erectile dysfunction ही देखील त्यापैकीच एक आरोग्य समस्या आहे शिश्नामधील रक्तवाहिन्या अरुंद झाल्यामुळे पेनिसला योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होत नाही.त्यामुळे सेक्स दरम्यान इरेक्शन होताना समस्या निर्माण होते.तसेच हायपरटेंशनचे शरीरावर हे १० दुष्परिणाम देखील होतात.
हायपरटेंशनचा व सेक्स लाइफचा काय सबंध असतो?
हायपरटेंशनवर घेण्यात येणा-या औषधोपचारांमुळे सेक्स समस्या अधिक गंभीर होतात. हायपरटेंशनवर घेण्यात येणा-या काही अॅन्टी-हायपरटेंसीव्ह औषधांमुळे पुरुषांमध्ये इरेक्शन समस्या निर्माण होतात तर महिलांमध्ये सेक्सची इच्छा कमी होते.यासाठी सेक्स लाइफचा आनंद घेण्यासाठी तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला दिलेल्या औषधांबाबत त्यांच्याशी जरुर चर्चा करा.सामान्यत: यासाठी Diuretics व Beta blockers या औषधांवर ACE Inhibitors Alpha Blockers व Calcium Channel Blockers घेण्याचा सल्ला देण्यात येतो.
औषधे घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या
काही केसेसमध्ये सेक्स समस्येवर उपचार करण्यासाठी Viagra, Cialis व Levitra घेण्याचा सल्ला देण्यात येतो.या औषधांचा तुमच्या आरोग्यावर दुष्परिणाम देखील होऊ शकतो यासाठी ही औषधे घेेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांना तुमची संपुर्ण मेडीकल हिस्ट्री सविस्तरपणे सांगा.जर तुम्ही छातीत दुखण्यावर अथवा ह्रदयविकारांवर Nitrates हे औषध घेत असाल तर वरील औषधे तुम्ही घेऊ शकत नाही कारण त्यामुळे तुमचा रक्तदाब अचानक कमी होऊ शकतो जे फार भयंकर आहे.वियाग्रा घेतल्याने स्पर्मची गुणवत्ता सुधारते का ?हे जरुर वाचा.
सेक्समुळे हायपरटेंशन ही समस्या गंभीर होते का?
हा एक फार मोठा गैरसमज आहे की हायपरटेंशन असलेल्या व्यक्तीने सेक्स केल्यास त्याची स्थिती अधिक गंभीर होते.सामान्य व निरोगी व्यक्तीप्रमाणेच हायपरटेंशन असलेल्या व्यक्तींसाठी देखील सेक्स तितकेच फायदेशीर असते.कारण सेक्स केल्यामुळे तुम्ही फीट रहाता,तुमच्यामधील आत्मविश्वास वाढतो व ताण-तणाव देखील कमी होतो.त्यामुळे जरी तुमचा रक्तदाब वाढत असला तरी सेक्स केल्यामुळे त्यात वाढ होत नाही.जाणून घ्या सेक्स करण्याचे ’5′ आरोग्यदायी फायदे !
जीवनशैली मध्ये योग्य बदल केल्याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो.
धुम्रपान करणे टाळणे,योग्य व पोषक आहार घेणे,आहारातून मीठाचे प्रमाण कमी करणे,मद्यपान कमी करणे,दिवसभरात कमीतकमी ४५ मिनीटे व्यायाम करणे व ताण-तणावापासून दूर रहाणे असे जीवनशैलीमध्ये योग्य बदल केल्याने तुमचा फक्त रक्तदाबच कमी होत नाही तर तुमचे हायपरटेंशनवरील औषधांवर अवलंबून रहाणे देखील कमी होते.यामुळे सहाजिकच तुमच्या सेक्स लाइफ मध्ये चांगली देखील सुधारणा होऊ शकते.तसेच कोणते मीठ आणि किती प्रमाणात खाणे आरोग्यासाठी हितकारी ?हे देखील जरुर वाचा.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock