Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या सोप्या उपायांनी वजन नियंत्रित राखण्यासाठी वाढवा तुमची इच्छाशक्ती !

$
0
0

जर इच्छाशक्ती अभावी तुमचा सतत व्यायाम टाळण्याकडे कल असेल तर तुम्ही हे उपाय जरुर करा.कारण या सोप्या उपायांनी तुमची इच्छाशक्ती बळकट होईल व तुम्ही नियमित व्यायाम करु लागाल. यासाठी फीटनेस एक्सपर्ट इजाझ अहमद यांचा हा सल्ला जरुर वाचा व तुम्हाला त्यातून झालेले फायदे देखील आम्हाला जरुर कळवा.

पुरेशी झोप घ्या-

दिवसभर तुम्ही थकलेले व उपाशी असाल तर व्यायामावर याचा नक्कीच दुष्परिणाम होऊ शकतो.यासाठी दुपारची झोप घेेणे टाळा व रात्री ठराविक वेळीच झोपी जा.तसेच तुमचे जेवण देखील वेळेवर घ्या.शांत झोप मिळवण्यासाठी ‘जायफळ’ फायदेशीर !

वेदनांकडे दुर्लक्ष करा व व्यायामाचा आनंद घ्या-

वर्कआउट नंतर येणा-या थकव्यामुळे तुम्ही व्यायाम करणे टाळत असाल तर यासाठी असे काहीतरी करा ज्यातून तुम्हाला आनंद देखील मिळेल.जर तुम्हाला योगासने करणे आवडत असेल तर तुम्ही व्यायामासाठी योगासने करु शकता.जर झुंबा क्लासमध्ये जाण्याचा तुम्ही विचार करत असाल तर दिवसभर काम करुन थकाल तेव्हा झुंबा केल्याने तुम्हाला आनंद मिळू शकेल.यासाठी वाचा या झुंबा डान्सस्टाईलने वजन ठेवा आटोक्यात.

व्यायाम करताना गाणी ऐका-

व्यायाम करत असताना संगीत ऐकण्याचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला व्यायाम टाळण्याची इच्छा होईल तेव्हा व्यायाम करताना एखादे संगीत ऐका ज्यामुळे तुम्हाला व्यायामाचा कंटाळा येणार नाही.तसेच व्यायाम आणि जीम बाबत हे ’9′ समज -गैरसमज दूर कराच !

तुमच्या ध्येयांची यादी करा-

तुम्ही यासाठी तुमच्या फीटनेस गोल्सची यादी करु शकता.मात्र तुमची ही उद्दीष्टे परिणामकारक व अचूक असतील याची काळजी घ्या.या ध्येयांच्या चिंतनामुळे तुम्हाला दररोज व्यायाम करण्यास प्रोत्साहन मिळेल.

अति आत्मविश्वास बाळगू नका-

अति आत्मविश्वासामुळे तुमच्या इच्छाशक्तीला धोका निर्माण होऊ शकतो यासाठी तुम्ही ज्या गोष्टी करणार आहात त्याबाबत अति आत्मविश्वास बाळगू नका.यापेक्षा स्वत:ला सतत असे सांगा की आपण आत्तापर्यंत अर्धेच ध्येय साध्य केले आहे व अजून बरेच काही करणे बाकी आहे.यासोबतच जीम बंद झाल्यानंतर घटवलेले वजन पुन्हा वाढते का ? हे जरुर वाचा.

पुढील नियोजन करा-

ध्येय साध्य करण्यासाठी केवळ सकारात्मक विचार पुरेसे नाहीत तर त्या विचारांप्रमाणे योग्य दिशेने प्रयत्न देखील करणे गरजेचे अाहे.यासाठी तुमच्या ध्येयाबाबत नीट नियोजन करा.तुम्ही जर काही दिवस सुट्टी घेऊन बाहेर जाणार असाल तर तिथे तुम्ही कसा व्यायाम करु शकता याचा आधीच विचार करा.

ध्यान करा -

ध्यान न करणा-या लोकांपेक्षा नियमित ध्यान करणा-या लोकांचे स्वत:वर पुर्ण नियंत्रण असते.यासाठी तुम्हाला तासनतास ध्यान करीत बसण्याची मुळीच गरज नाही.पण दिवसभरात कमीतकमी  १० मिनीटे ध्यान करा व तुमच्या श्वासावर लक्ष द्या.यामुळे तुम्हाला तुमच्या ध्येयावर लक्ष केद्रींत करणे सोपे जाईल व व्यायामाचा कंटाळा देखील नक्कीच टाळता येईल.यासाठी ध्यान करण्यास उपयुक्त ठरतील ही योगासनं !अवश्य वाचा.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>