आजकाल फेसबूक,इन्स्टाग्राम व इतर सोशल मिडीयामुळे कोणालाही जगभरातील कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात रहाणे सहज शक्य असते.यामाध्यमातून सध्या परदेशात रहाणा-या तुमच्या बालपणीच्या शाळा,कॉलेजमधील मित्रमैत्रिणींचे अपडेटेड फोटो पहाणे किंवा संपर्कात नसणा-या एखाद्या जुन्या कलिगची माहिती मिळवणे तुम्हाला सहज शक्य असते.त्याचप्रमाणे ब्रेक-अप अथवा घटस्फोटानंतर कधीही न भेटलेला तुमचा एक्स प्रियकर अथवा नवरा सध्या त्याच्या आयुष्यात काय करत आहे हे देखील सोशल मिडीयाच्या माध्यमातून नकळत समोर येत असते.कधी कधी याच माध्यमातून तुम्हाला तुमचा एक्स बॉयफ्रेन्ड अथवा गर्लफ्रेन्ड किंवा पूर्व-पती अथवा पत्नी त्यांच्या आयुष्यात एखाद्या दुस-या जोडीदारासोबत एंगेंज झाल्याचे कळते व तुम्हाला अचानक धक्का बसतो.यासाठी ब्रेकअपनंतर फेसबूक, व्हॉट्सअॅप वापरताना या ’5′ गोष्टींचे भान ठेवा !
खरेतर तुम्ही दोघेही अगदी सामोपचाराने वेगळे झालेले असता तरीही या बातमीने तुमचे मन दुखावले जाते.या बातमीने तुमच्या मनातील दु:खद भावना तीव्रतेने वर येऊ लागतात.कदाचित या घटनेमुळे तुमचे मन पुन्हा एकदा तुटले जाते.वास्तविक तुमचे त्याच्यावर आता प्रेम नसते किंवा त्यानी पुन्हा तुमच्या आयुष्यात येण्याची कोणतीही शक्यता देखील नसते तसेच तुमच्या आयुष्यात देखील आता एखादी नवी व्यक्ती आलेली असते.त्यामुळे तुम्हाला या बातमीने ऐवढं वाईट वाटण्याचे नेमके काय कारण आहे समजत नाही.या बातमीमुळे तुम्ही संभ्रमात पडता किंवा स्वत:वर चिडचिड करु लागता.तुमच्या भूतकाळातील जोडीदाराच्या लग्नाच्या बातमीने तुमच्या भावनांचा होणारा हा कल्लोळ अधिक वाढण्याआधीच या सहा गोष्टींनी तुमच्या मनाला सावरण्याचा प्रयत्न करा.तसेच हे देखील जाणून घ्या कसं सांगाल त्याला की, तो तुमचा ‘Mr. Right’ नाही.
१. सर्वात आधी या बातमीने तुम्ही नाराज होणे हे अगदी स्वाभाविक आहे हे समजून घ्या.
तुमच्या मनात येणा-या अनंत प्रश्नांनी भंडावून जाण्याआधी ही भावना अगदी सामान्य आहे हे समजून घ्या कारण त्या व्यक्तीशी असलेले नाते तोडून तुम्ही कोणतीही चुक नक्कीच केलेली नाही.दुर्देवाने तुम्ही या गोष्टीपासून कितीही बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तरी भूतकाळाचा तुमच्या मनावर प्रचंड पगडा असतो हे एक सत्य आहे.खरेतर याचे आणखी एक कारण असे देखील आहे की तुम्ही कधीतरी तुमच्या एक्सच्या फार जवळ होतात तुमच्या मध्ये अनेक भावनिक संबधातून जवळीक झालेली होती.त्यामुळे कदाचित आता तुमचा ब्रेक-अप झालाय हे विसरुन तुम्ही त्यांच्यासोबत घालवलेल्या चांगल्या व अविस्मरणीय क्षणांची आठवण करत आहात.तसेच आता तुमची जागा इतर कोणीतरी घेतल्यामुळे तुमच्या मनात चिडचिड व राग निर्माण होत आहे.
हा तुमच्या जीवनातील एक टप्पा असून ही स्वाभाविक भावना कालांतराने आपोआप कमी होतील याची खात्री बाळगा.या गोष्टी नॉर्मल व्हायला कदाचित काही आठवडे लागणार असल्याने याबाबत जरा धीर ठेवा.तसेच तुम्ही सध्या एखाद्या निराळ्या व्यक्तीच्या रिलेशनशिपमध्ये असताना देखील तुम्हाला असे वाटत आहे हे काहीतरी चुकीचे आहे असे मुळीच समजून घेऊ नका.प्रेम नसून आकर्षण असल्याचे संकेत देतात या ‘९’ गोष्टी देखील अवश्य वाचा.
२. तुमच्या मनातील भावना कोणाला तरी सांगा.
तुमच्या एखाद्या विश्वासू मित्र किंवा मैत्रिणीला जे तुमचे म्हणणे तुम्हाला कोणताही दोष न देता शांतपणे ऐकतील अशा व्यक्तीला तुमच्या मनातील भावना सांगा.तुमच्या मनातील या भावना सांगितल्यामुळे कदाचित तुम्हाला बरे वाटेल व तुम्ही भविष्यात याबाबत तर्कशुद्ध पद्धतीने विचार करु लागाल.लक्षात ठेवा याच मित्र-मैत्रिणींनी तुम्हाला ब्रेक-अपमधून बाहेर येण्यास मदत केली होती त्यामुळे तुमचा एक्स तुमच्यासाठी चांगला आहे की नाही हे त्यांना माहित असल्यामुळे त्यांचा सल्ला तुमच्यासाठी नक्कीच योग्य ठरु शकेल.
३. तुमचे नाते का टिकू शकले नाही हे सतत लक्षात ठेवा.
जर तुम्हाला आता तुमच्या एक्स सोबत घालवलेला चांगला काळ आठवत असेल तर शक्य असल्यास त्याच्यासोबत नाते तोडण्यास कारणीभूत असलेल्या गोष्टीची यादी करा व ती आठवण्याचा प्रयत्न करा.त्यामुळे तुम्ही आता वेगळे झाला आहात ही तुमच्या आयुष्यातील किती चांगली गोष्ट आहे हे लक्षात ठेवणे सोपे जाईल.
४. शक्य असल्यास तुमच्या एक्स ला त्याच्या पुढील वाटचाली साठी अभिनंदन करा.
तुमच्या एक्सचा साखरपूडा अथवा लग्नाची बातमी मिळताच त्याला शुभेच्छा देण्याचा विचार करा.जर तुमच्या दोघांचे काही कॉमन फ्रेन्ड्स असतील किंवा तुम्ही त्यांना वारंवार भेटत असाल तर तुमच्या एक्सला सर्वासमोर शुभेच्छा द्या.ज्यामुळे कदाचित तुम्हाला आतुन बरे वाटेल.
५. जर तुमच्या ब्रेक-अप बाबत तुमच्या मनात काही कडू आठवणी असतील तर एक्ससोबत कोणताही संपर्क ठेऊ नका.
जर तुम्ही दोघे काही कडू आठवणींसह वेगळे झाला असाल व तुम्ही ब्रेकअपनंतर एकमेंकांना कधीच भेटला नसाल तर आता काही झाले तरी त्याच्यासोबत कोणताही सबंध ठेवण्याचा प्रयत्न करु नका.कारण असे केल्याने तुम्हाला अधिक त्रास होऊ शकतो त्यामुळे आता फक्त स्वत:चा विचार करा व या दु:खद गोष्टी पासून दूर रहाणे हेच तुमच्यासाठी योग्य आहे हे लक्षात ठेवा.तसेच यासाठी अपयशी प्रेमही शिकवते या ’8′ गोष्टी !हे देखील जरुर वाचा.
६. त्यांचा सोशल मिडीयाच्या सहाय्याने पाठलाग करणे थांबवा.
फेसबूक व इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तुमच्या एक्स-बॉयफ्रेन्डला फॉलो करुन त्याचे अपडेटेड फोटो पाहिल्यामुळे तुम्हाला दु:ख होऊ शकते.त्यामुळे असे मुळीच करु नका कारण या सवयीमुळे तुम्हाला तुमचा भूतकाळ विसरणे कठीण जाऊ शकते.त्यापेक्षा तुमच्या एक्सला सोशल मिडीया वरुन ब्लॉक करा ज्यामुळे तुम्हाला त्यांनी अपलोड केलेले फोटो पहावे लागणार नाही.यामुळे तुम्हाला शांत रहाण्यास व तर्कशुद्ध पद्धतीने विचार करण्यास मदतच होईल. तसेच सतत जवळ राहणा-या ‘चिपकू प्रियकरा’ला दूर ठेवण्यासाठी ६ टीप्स जरुर वाचा.
Read this in English
Translated By –Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock