Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

प्रोटीन सप्लिमेंट्समुळे अॅक्नेची समस्या उद्भवते का ?

$
0
0

व्यायाम केल्यानंतर चेहरा प्रसन्न व चमकदार दिसतो. पण हे तात्पुरते असते. कारण घामामुळे चेहरा किंवा पाठीवर अॅक्ने किंवा ब्रेकआउट्स येतात. हे व्यायामामुळे नाही तर घामामुळे होते. याचे कारण प्रोटीन सप्लिमेंट्स देखील असून शकते. विशेषतः whey प्रोटीन. याचा तुमच्या त्वचेवर परिणाम होतो.

अॅक्नेसाठी प्रोटीन जबाबदार ठरतात, हे सिद्ध करणारा कोणताही ठोस अहवाल नाही. पण अॅक्ने येण्याचे ते एक कारण असू शकते.

Whey protein आणि अॅक्ने यांचा संबंध:

Whey protein हे गाईच्या दुधापासून बनते. अनेकवेळा दुग्धजन्य पदार्थ अॅक्नेला कारणीभूत ठरतात. काही अभ्यासातून असे सिद्ध झाले आहे की Whey protein घेण्याचा आणि अॅक्नेचा संबंध असतो.  अ‍ॅक्नेचा त्रास असणार्‍यासाठी ’4′ महत्त्वाच्या मेकअप टीप्स !

२०१७ मध्ये झालेल्या अभ्यासानुसार आणि the journal Health Promotion Perspective याच्या अहवालानुसार प्रोटीन घेतल्याने trunk area मध्ये आणि काही वेळेस चेहऱ्यावर अॅक्ने ब्रेकआउट्स होतात. जेव्हा चीज बनवण्यासाठी दूध साकळवले जाते तेव्हा राहिलेल्या दुधापासून whey तयार होते. यात इन्सुलिन ग्रोथ फॅक्टर-१ (IGF-1) नावाचे हार्मोन असते. त्यामुळे मसल्स लवकर बिल्ड होण्यास मदत होते. अ‍ॅक्नेचा त्रास आटोक्यात आणायला मदत करतील या प्रगत ब्युटी ट्रीटमेंट्स !

अभ्यासावरून असे सिद्ध झाले आहे की न्यूट्रीशनल whey सप्लिमेंट्स जे जीमला जाणारे किंवा बॉडी बिल्डर्स खातात, त्यात ६-१२ लिटर दूध हे कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म्युलेशन मध्ये असते.  IGF-1 हे मसल्स बिल्ड आणि टोन करण्यासाठी मदत करतात. त्याचे अतिरिक्त प्रमाणामुळे काही समस्या निर्माण होतात.

  • adrenaline ग्रंथींना चालना मिळते व अधिक तेलाची निर्मिती होते.
  • तसंच त्यामुळे ब्रेकआउट्स होऊन त्वचेचे पोर्स बंद होतात.

ब्रेकआउट्स आणि अॅक्ने: ब्रेकआउट्स अधिक ठळकपणे दिसून येतात. परंतु, अभ्यासावरून असे दिसून आले आहे की प्रोटीन घेण्याचे प्रमाण योग्य ठेवल्यास आणि नियमित घेतल्यास अॅक्नेची संख्या कमी होते. अधिकतर प्रोटीन सप्लिमेंट्स या कॉन्सन्ट्रेटेड असून पचनास जड असतात. सगळे दुग्धजन्य पदार्थ असेच असतात. त्यामुळे पोट खराब होणे, अॅलर्जिक रॅशेस, allergic dermatitis होऊ शकतात, असे जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेन्टरचे डिरेक्टर ऑफ डर्मोटॉलॉजी डॉ. रामचंदानी यांनी सांगितले.

तुम्ही काय करू शकता?

आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या. त्यामुळे तुमचा आहार आणि प्रोटीन घेण्याचे प्रमाण यावर नियंत्रण येईल. प्रोटीन सप्लिमेंट्स सतत घेत राहणे, हे ब्रेकआउट्सला कारणीभूत ठरते. त्यासाठी डर्मोटॉलॉजिस्टची भेट घ्या. अ‍ॅक्ने, ब्लॅकहेडचा त्रास दूर करण्यासाठी कसा कराल मुलतानी मातीचा वापर

 

Reference: [1]Cengiz, F. P., Cemil, B. C., Emiroglu, N., Bahali, A. G., & Onsun, N. (2017). Acne located on the trunk, whey protein supplementation: Is there any association?. Health Promotion Perspectives, 7(2), 106.

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>