नवरात्रीच्या उपवासामध्ये रात्रीच्या जेवणात लाल भोपळ्याचा वापर केला जातो. प्रामुख्याने भाजीत किंवा सांबारमध्ये वापरला जाणारा लाल भोपळा चवीष्ट आणि आरोग्यदायी आहे. म्हणूनच आहारात लाल भोपळ्याचा वापर करून घेण्यामागील ही ’9′ कारणं नक्की जाणून घ्या . ( नवरात्रीचे उपवास नक्की करा, पण या ‘हेल्दी’ मार्गाने !)
- पचनमार्ग सुधारतो :
कपभर वाफवलेल्या भोपळ्यामुळे नियमित 11% फायबरची गरज पूर्ण होते. त्यामुळे पचनमार्ग आरोग्यदायी राहतो तसेच बद्धकोष्ठतेचा त्रासही कमी होण्यास मदत होते.
- डोळ्यांचे आरोग्य सुधारते :
भोपळ्यामधून शरीराला मुबलक प्रमाणात व्हिटामिन ए चा पुरवठा होतो. कपभर वाफवलेला भोपळा म्हणजे अंदाजे 100 ग्रॅम भोपळ्यातून 245% व्हिटामिन ए ची दैनंदिन गरज पूर्ण होते. तसेच मुबलक बीटा कॅरोटीन मिळते. यामुळे मोतिबिंदू आणि वाढत्या वयानुसार डोळ्यांच्या कमजोर होणार्या स्नायूंची समस्या कमी होते. ( डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी खास टीप्स )
- वजन घटवते :
भोपळ्यामध्ये अत्यंत कमी प्रमाणात कॅलरीज असतात. 100 ग्रॅम भोपळ्यातून 26 कॅलरीज मिळतात. सोबतच त्यात फायबर असल्याने शरीरात फॅट्स न वाढवता भूकेवर नियंत्रण मिळते. परिणामकारक वजन घटवतील ही ’15′ घरगुती ड्रिंक्स !!
- रोगप्रतिकारशक्ती वाढते:
भोपळ्यामध्ये व्हिटामिन ए, इ, सी सोबतच आयर्नचा मुबलक साठा असतो. चांगल्या रोगप्रतिकारशक्तीमुळे संसर्ग दूर ठेवण्यास तसेच वारंवार आजारी पडण्याची शक्यता कमी होते. भोपळ्यातील बीटा कॅरोटीन घटकांमुळे दाह कमी होण्यास मदत होते. P
- हृद्यविकार कमी होतात :
हद्याला रक्तपुरवठा करणार्या रक्तवाहिन्यांमध्ये बॅड फॅट्स साचून राहिल्याने हृद्यविकार जडतात. भोपळ्यातील फायबर घटक ब्लॉकेजेस मोकळे करण्यास मदत करतात. तसेच कमी प्रमाणात कॅरोटेनॉईड आहारात घेतल्यास हृद्यविकार वाढतात. त्यामुळे आहारात भोपळा टाळू नका.
- मधूमेहींसाठी योग्य पर्याय :
चवीला गोड असले तरीही भोपळा शरीरात साखरेचे प्रमाण वाढवत नाही. त्यामुळे मधूमेहींबरोबरच इतरांमध्येही रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. म्हणूनच भोपळा आहारात ठेवल्यास इन्सुलिनच्या निर्मितीचे प्रमाण नियंत्रणात राहते. मधुमेह नियंत्रित करणारे ’10′ रामबाण उपाय
- स्तनाच्या कर्करोगापासून बचाव होतो :
भोपळ्यातील अॅन्टीऑक्सिडंट घटक व व्हिटामिन्स शरीरातील फ्री रॅडिकल्सचा धोका कमी करण्यास मदत करतात. परिणामी कॅन्सरचाही धोका कमी होतो. रक्तामध्ये केरोटीनचे प्रमाण अधिक असल्यास ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होतो.
- थकवा कमी होतो :
व्यायामादरम्यान जाणवणारा थकवा कमी करण्यास भोपळा मदत करतो. भोपळ्यामुळे रक्तातील लॅक्टीक अॅसिड आणि अॅमोनिया घटक कमी होणयास मदत होते.
- तुम्हांला हायड्रेटेड ठेवते :
फायबरच्याबरोबरीने भोपळ्यात पाण्याचा अंशदेखील मुबलक असतो. भोपळ्यात 90% पाणी असते. यामुळे भोपळा खाल्ल्याने तुम्ही हायड्रेटेड राहण्यासोबतच रिफ्रेशही राहता.
संबंधित दुवे -
शिराळं/दोडकं आहारात न टाळण्याची ’6′ कारणं
‘शेपू’ची भाजी आहारात ठेवण्याची ’7′ आरोग्यदायी कारणं !
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Source - 9 reasons pumpkin or kaddu is good for your health
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.