जर तुम्ही वजन घटवण्याच्या मिशनवर असाल तर भातापाठोपाठ ‘बटाटा’ तुम्ही आहारातून नक्कीच वगळत असाल. पण यामुळे तुम्ही वजन घटवण्याच्या एका सोप्या मार्गापासून दूर जाताय हे तुम्हांला ठाऊक आहे का ? तळकट बटाट्याची भजी किंवा फ्रेंच फ्राईज हे आरोग्यदायी पदार्थ नाहीत. मग बटाटा खाऊन वजन घटवण्याचे उपाय नक्की जाणून घ्या -
लो कॅलरी -
बटाटा न तळता खाल्यास तो शरीरात कॅलरीज वाढवत नाही. 10 ग्रॅम उकडलेला बटाटा खाल्ल्यास केवळ 10 ग्रॅम कॅलरीज मिळतात. त्यामुळे आहारात किंवा ब्रेकफास्टला वाटीभर ( 100 ग्रॅम) वाफवलेला बटाटा खाल्ल्यास तुमचे पोट तर भरेल पण सोबतीला आवश्यक 100 कॅलरीज मिळतील.
कॉम्प्लॅस कार्बोहायड्रेट्सचा पुरवठा होतो -
बटाट्यामध्ये कॉम्प्लॅस कार्बोहायड्रेट्स मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे साखरेचे प्रमाण विशिष्ट काळाने आणि विशिष्ट प्रमाणात रिलिझ होते. त्यामुळे बटाटे खाल्ल्यानंतर तुमचे पोट लवकर भरते. यामुळे तुमच्या भूकेवर नियंत्रण राहते. परिणामी वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
पोषणद्रव्यांनी परिपूर्ण -
100 ग्रॅम बटाट्यातून सुमारे 1.6 ग्रॅम प्रोटीन्स आणि केवळ 0.1 ग्रॅम फॅट्स व 0.4 ग्रॅम फायबर मिळते. बटाट्यामधून आयर्न आणि व्हिटामिन सी मुबलक प्रमाणात मिळते. तसेच पोटॅशियम आणि सोडीयमचादेखील पुरवठा होतो. त्यामुळे रक्तदाबाच्या रुग्णांसाठी वजन घटवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. पाव, तांदूळ यांच्या तुलनेत बटाट्याचा ग्ल्यासमिक इंडेक्स कमी आहे. त्यामुळे मधूमेहींसाठीदेखील बटाटा हा उत्तम पर्याय आहे.
झटपट आणि चविष्ट पर्याय -
इतर भाज्यांच्या तुलनेत बटाटा हा झटपट आणि सह्ज शिजतो. मात्र याचा अर्थ असा नाही की तुम्ही तो डीप फ्राय किंवा तुपामध्ये तळावा. चटपटीत मात्र हेल्दी ग्रेव्हीमध्ये किंवा शॅलो फ्राय केलेल्या व्हेजिटेबल कटलेट्समध्ये, पोटॅटो सलाडमधून आहारात घ्यावा. परंतू पोटॅटो चिप्स, आलू पराठा किंवा पोटॅटो सॅन्डव्हिच हे वजन वाढवण्यास अधिक मदत करतात.
त्यामुळे वजन घटवताना बटाटा आहारातून टाळण्याऐवजी तो स्मार्टली आहारात घ्या. म्हणजे त्यातील अधिकाधिक पोषणद्रव्यं तुमच्या आहारात येतील. परिणामी हेल्दी मार्गाने तुमचे वजनही आटोक्यात राहण्यास मदत होते.
संबंधित दुवे -
परिणामकारक वजन घटवतील ही ’15′ घरगुती ड्रिंक्स !!
वजन घटवण्याचा अस्सल भारतीय ‘डाएट प्लान’
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Source – Eat potatoes to lose weight. Yes, LOSE weight!
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.