गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या घेणे हा अतिशय सोपा उपाय आहे आणि अनेकजणी हाच पर्याय आजमवतात. पण त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत, हे लक्षात घेत नाहीत. किंवा काही वेळा माहित असून देखील त्याकडे दुर्लक्ष केले जाते. परंतु, याकडे दुर्लक्ष न करता गर्भनिरोधक गोळ्यांची निवड काळजीपूर्वक करा.
गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यास पहिला प्रश्न डोक्यात येतो तो म्हणजे यामुळे वजन तर वाढणार नाही ना? गर्भनिरोधक गोळ्यांचे अनेक दुष्परिणाम आहेत. त्यात वजन वाढणे ही सामान्यपणे दिसून येणारी समस्या आहे. हे खरे आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आम्ही स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. अमिता दंग यांच्याशी संवाद साधला. गर्भनिरोधक गोळ्यांसंबंधी या 5 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?
प्रत्येक स्त्री ची हार्मोन्सची पातळी वेगळी असते. त्यामुळे गर्भनिरोधक गोळ्यांचा होणारा दुष्परिणाम देखील स्त्रीनुसार बदलतो. उदारणार्थ, तुमच्या बहिणी किंवा मैत्रिणीपेक्षा तुमच्यामध्ये इस्ट्रोजनची पातळी नैसर्गिकरित्या अधिक असेल तर गर्भनिरोधक गोळ्यांचा तुमच्यावर होणार परिणाम हा तुमच्या बहिणी किंवा मैत्रिणीपेक्षा वेगळा असेल. गर्भनिरोधक गोळ्यांचा परिणाम तुम्हाला तुमच्या कंबरेजवळ दिसू लागेल. गर्भनिरोधक गोळ्यांचा ओव्हर डोस घेतल्यास काय होईल ?
परंतु, गर्भनिरोधक गोळ्यांची निवड काळजीपूर्वक करा. यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांमुळे तुमच्या कंबरेजवळ काय बदल होत आहेत, ते पहा. त्यावरून त्यात कोणते हार्मोन्स आहेत ते कळेल. जर त्यात इस्ट्रोजन प्रामुख्याने असेल तर फुइल्ड रिटेन्शन होऊन तुमचे वजन (वॉटर वेट) वाढेल. गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो का ?
परंतु, गोळ्या घेणे बंद केल्यावर तुम्हाला हलके वाटेल. वॉटर वेट पासून मुक्त झाल्यासारखे वाटेल. वजन वाढणे (वॉटर वेट) टाळायचे असल्यास उत्तम उपाय म्हणजे drospirenone असलेल्या गोळ्या घेणे. drospirenone हे लघवीचे प्रमाण वाढवणारे (diuretic) असल्यामुळे शरीरात पाणी साचून रहात नाही. गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर केल्यामुळे वंधत्व येते का?
पण जर तुम्ही hormonal IUD किंवा shot सारख्या गर्भनिरोधक गोळ्या घेणार असाल तर पाण्यामुळे नाही तर शरीरातील फॅट्स मुळे वजन वाढेल. जर तुम्ही गर्भधारणा होऊ नये म्हणून दुसऱ्या कोणत्यातरी पद्धतीचा अवलंब करणार असाल तर आहारात आवश्यक ते बदल करा आणि नियमित व्यायाम करा. गर्भनिरोधक गोळ्या घेऊनही या ५ चुकांमुळे तुम्ही गरोदर राहू शकता.
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock