Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

सरोगसीचा निर्णय घेण्यापूर्वी या ‘४’गोष्टी लक्षात ठेवा !

$
0
0

बाळासाठी सरोगसीचा पर्याय निवडणे हा अत्यंत कठीण निर्णय आहे. यात भावनिक गुंतागुंत आहे. अनेक विचार, प्लॅन्स, भावनांना सामोरे जाणे, निर्णय घेणे अशा अनेक गोष्टी कराव्या लागतात. सरोगसीचा निर्णय घेण्याआधी खूप दुःख, त्रास, निराशा यांना अनेक जोडपी सामोरी गेलेली असतात. परंतु, या सगळ्या अनुभवानंतर देखील तुम्ही हा निर्णय, ही प्रक्रिया कशी स्वीकारता आणि नवीन बाळाचे कसे स्वागत हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवल्यास  सरोगसीच्या निर्णयाला सामोरे जाणे सोपे होईल. सरोगसी म्हणजे काय ?

. मनातील कटुता दूर करा: अनेक वर्षे बाळासाठी प्रयत्न केल्यानंतर देखील पदरी निराशा आल्यावर अनेक जोडप्यांमध्ये या विषयाबद्दल कटुता निर्माण होते. मग ते सरोगसीच्या प्रक्रियेबद्दल अधिक बचावात्मक भूमिका घेतात. सरोगसीची कल्पना त्यांच्यात अधिक कटुता आणते. म्हणून ही कल्पना सत्यात उतारवण्याआधी तुमची मनःस्थिती बदला. त्यासाठी प्रयत्न करा.

२. अधिक विनम्र होऊ नका: या सगळ्या प्रक्रियेत अनेक जोडपी सरोगेट आईसमोर झुकतात किंवा अधिक विनम्र होतात. ती तुमच्या बाळाला जन्म देणार असली तरी तिच्यापुढे हतबल होऊ नका. तिच्याशी हेल्दी आणि तटस्थ संबंध ठेवा.

. बाळ कदाचित तुमच्यासारखे दिसणार नाही, हे समजून घ्या: बाळ कोणासारखे दिसेल हे आपल्या हातात नसते. हे जेनेटिक असते. गर्भात वाढवलेली स्वतःची मुले देखील अनेकदा आई-वडिलांसारखी दिसत नाहीत. म्हणून बाळ आपल्यासारखेच दिसेल किंवा दिसावे, अशी अपेक्षा ठेऊ नका. तुम्हाला बाळ होणार आहे आणि तुम्ही आई-वडील होणार आहात याचा आनंद माना आणि त्याबद्दल आभारी रहा.

. डॉक्टरांचा सल्ला घ्या: सरोगेट आई मिळवण्यासाठी आणि गरोदरपण, प्रसूती यशस्वी होण्याकडे तुमचे लक्ष असू द्या. बाळाला स्तनपान करण्याकडे किंवा बाळाला काय देऊ, याकडे जास्त लक्ष देऊ नका. कारण त्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. म्हणून बाळाला स्तनपान करण्याबद्दल तुमच्या डॉक्टर किंवा lactation expert चा सल्ला घ्या. त्यामुळे तुम्हाला तुमच्याकडे असलेले पर्याय कळतील आणि तुमची मानसिकता बदलेल व पुढील निर्णय घेणे सोपे जाईल.

कोणत्याही पद्धतीने असो पण नव्या जीवाला या जगात आणि तुमच्या आयुष्यात आणणे, हा अतिशय सुंदर आणि आयुष्य बदलवणारा अनुभव आहे. म्हणून त्यातील प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आनंद घ्या.

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>