Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या ’7′एक्स्पर्ट टीप्स तुम्हांला घामोळ्यांपासून ठेवतील दूर !

$
0
0

उन्हाळ्यात आंब्या-फणसाची रेलचेल असली तरीही तीव्र उन्हाळा त्वचेचे नुकसान करतात. उन्हाळ्याच्या दिवसात घामोळ्यांचा त्रास अनेकांना जाणवतो. पूर्ण बाह्यांचे कपडे घातले तरीही घामामुळे त्वचेवरील छिद्र बंद होतात वेळीच घामोळ्यांच्या त्रासाकडे लक्ष दिले नाही तर हिट स्ट्रोकचा त्रास बळावू शकतो. या समस्येमध्ये शरीराचे तापमान संतुलित राखणे कठीण होते. म्हणूनच Fortis S. L. Raheja Hospital, Mahim च्या Consultant Dermatologist, डॉ. रिंकी कपूर यांनी दिलेल्या या टीप्स नक्की लक्षात ठेवा. 

  1. उन्हाळ्याच्या दिवसात सैलसर आणि सुती कपड्यांचा समावेश करा. प्रवास करताना ज्या कपड्यांमध्ये तुम्हांला कम्फर्टेबल वाटेल अशाच कपड्यांची निवड करा. घाम आल्यानंतर ताबडतोब कपडे बदला. उष्णता आणी घामामुळे त्वचेला त्रास होण्याची शक्यता वाढते. त्वचेला रॅश येणे, घाम येणे हा त्रास हमखास वाढतो. उन्हाळ्यामध्ये बाळाची काळजी घेण्यासाठी ६ टीप्स
  2. थेट उष्ण वातावरणात जाणं टाळा. तसेच उन्हाळ्याच्या दिवसात बाहेर कष्टदायक व्यायाम करणं टाळा. यामुळे घाम येण्याचं प्रमाण वाढते. तसेच घामोळ्यांचा त्रासही वाढू शकतो. उन्हाळ्यात बाळाला होणारा घामोळ्यांंचा त्रास कमी करतील हे 5 उपाय !
  3. घराबाहेर पडण्यापूर्वी छातीजवळ, पाठीवर भरपूर घामोळ्यांपासून बचाव करणारी पावडर मारा. घामोळ्यांचा त्रास असलेला भाग थंड आणि शुष्क राहील याची काळजी घ्या. बाहेरून आल्यानंतर थंड पाण्याने आंघोळ करा.
  4. तुम्हांला घामोळ्यांचा त्रास होत असेल तर त्यावर कोरफडीचा गर /लोशन किंवा बर्फ लावणंदेखील फायदेशीर ठरेल.
  5. कॅलॅमाईन लोशन किंवा डॉक्टरांनी सुचवलेली सौम्य स्टिरॉईड क्रीम्स त्वचेला होणारी जळजळ किंवा खाज कमी करण्यास फायदेशीर ठरतात. पण ऑईल बेस्ड प्रोडक्ट्स वापरू नका. यामुळे खाज किंवा घाम अधिक वाढू शकते.
  6. घामोळ्यांचा त्रास कमी करण्यासाठी स्टिरॉईड घेणं तुम्हांला त्रासदायक वाटत असेल तर काही घरगुती उपायांची मदत घ्या. मुलतानी माती, चंदन किंवा कडूलिंबाचा पॅक काहीवेळ त्वचेवर लावल्यास थंडावा निर्माण होण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसात घरच्या घरी ओटमिल पाण्यात मिसळून आंघोळ करणंदेखील फायदेशीर ठरते.  उन्हाळ्यात डोकेदुखी आणि पित्ताचा त्रास कमी करण्यास खास टीप्स !
  7. नियमित मुबलक पाणी पिण्याची सवय ठेवा. यामुळे तुम्ही हायड्रेटेड रहाल.पाण्यासोबतच ताज्या फळांचा रस, ग्लुकोज, व्हिटॅमिन सी युक्त ड्रिक्स यांचा आहारात समावेश वाढवा. तसेच उन्हाळाचा त्रास टाळण्यासाठी कोल्ड ड्रिंक्स , कार्बोनेटेड बेव्हरेजेस पिणं टाळा. यामुळे डिहायड्रेशनचा त्रास वाढतो.  ताडगोळा आणि निरा – उन्हाळ्यात नैसर्गिकरित्या कूल राहण्याचे उपाय !

Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>