जर तुम्ही ट्विटर आणि फेसबुकवर असाल तर तुम्हाला कळलेच असेल की बरखा दत्त, रणा अय्युब, सागरिका घोसे, अनुष्का शर्मा आणि अनेक प्रभावी महिला या ट्रोलिंग किंवा ऑनलाईन अब्युसच्या बळी झाल्या आहेत. जेव्हा महिला आपले विचार, मतं सोशल मीडियावर स्पष्टपणे मांडतात. तेव्हा त्या ट्रोलिंगच्या बळी झाल्या आहेत. परंतु, हे सगळे करण्यामागे त्यांचा काय उद्देश असतो? हे करून त्यांना नेमकं काय मिळतं? मुंबईचे psychiatrist आणि sexologist डॉ. संघनायक मेश्राम यांनी या प्रश्नांची उत्तरे दिली.
- रेपविषयक मेसेज करताना:
जे लोक स्त्रियांना रेपविषयक वाईट मेसेज करतात तेव्हा त्यांना ते महान, शक्तिशाली आहेत असे वाटते. त्यांना त्याचे व्यसन असते. त्यामुळे समोरची व्यक्ती घाबरेल, कमजोर होईल, असे त्यांना वाटते. स्त्रिला कमीपणा दाखवण्यासाठी अशा प्रकारचे मेसेज केले जातात, असे कॅन्सल्टंट सायंकायट्रिस्ट आणि TEDx speaker Ruksheda Syeda म्हणाल्या.
अजूनही आपण स्त्रियांवरील पुरुषांचे वर्चस्व कमी करण्यासाठी झगडत आहोत. परंतु, काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांना न घाबरता आपले विचार मांडण्याचा अधिकार सोशल मीडिया वरील स्वतंत्रतेने आपल्याला दिला आहे. बोलण्याचे, व्यक्त होण्याचे स्वातंत्र (विचारस्वातंत्र) खूप वर्षाच्या लढ्यानंतर स्त्रीला प्राप्त झाले आहे.
रेप विषयक मेसेज स्त्रीच्या मनाला खोलवर लागतो आणि ते करणाऱ्या हे माहित असते की याचा परिणाम स्त्रीवर अनेक प्रकारे होणार आहे. म्हणजेच तिच्या कामावर, कर्तृत्वावर, समाज्यातील स्थानावर आणि कुटुंबावर. हा मेसेज स्त्रीच्या कानाखाली मारावे असा तिच्या जिव्हारी लागतो, असे त्या म्हणाल्या. अशा त्रासदायक स्थितीत परिस्थितीने खचून न जाता स्त्री खंबीर राहते. परंतु, त्रास देणारी व्यक्ती तिचे पूर्णपणे खच्चीकरण होत नाही तोपर्यंत तिला त्रास देत राहते. अजून एक त्रास देण्याचा मार्ग म्हणजे सोशल मीडियावर तिच्या चारित्र्याविषयी वाईट बोलणे. म्हणजे तिला लाजिरवाणे वाटेल व ती पूर्ण खचून जाईल.
- तुम्ही तिचा आवाज बंद करू शकत नाही:
स्त्री स्वतंत्र आहे. ते तुम्हाला आवडत असो किंवा नसो ती तिचे विचार, मतं स्पष्टपणे मांडू शकते.
कोण कधी कसे वागेल, याचा अंदाज कोणालाच बांधता येत नाही. स्त्री ने मागे न हटता भेदभाव, असमानता याविषयी आवाज उठवला पाहिजे. आपली मते मांडली पाहिजे. याला विरोध करणारी हजार माणसे असतील तर दहा हजार माणसे त्याला आधार देणारी असतात, असे Ruksheda म्हणाल्या. परंतु, दुर्देवाने सगळ्याच स्त्रियांना ट्रोलिंग आणि ऑनलाईन अब्युजशी सामना करताना अपेक्षित आधार मिळत नाही. खऱ्या आयुष्याप्रमाणे व्हर्चुअल जगात देखील आपण मूकपणे सगळे पहात राहतो.
आतापर्यंत ऑनलाईन अब्युज हा गुन्हा समजला जात नव्हता. पण आता गोष्टी हळूहळू बदलू लागल्या आहेत. Gujarat Riots च्या लेखिका आणि पत्रकार रना अय्युब यांना ज्या व्यक्तीने वाईट मेसेजस पाठवणाऱ्या व्यक्तीला त्यांनी ट्विटरवर एक्सपोज केल्यावर त्या व्यक्तीला जिथे तो काम करत होता त्या कंपनीने कामावरून काढून टाकले. आजकाल बरीच लोक याकडे गंभीरपणे पाहू लागले आहेत. रेप मेसेजेसचा परिणाम खूप गंभीर होतो. कारण अजूनही आपल्या सामाज्यात रेप झालेल्या स्त्री कडे सहानभूती, अहवेलना अशा नजरेने बघितले जाते आणि त्यांना आयुष्यभर लाजिरवाणे जगावे लागते. म्हणून त्रास देणाऱ्यांना असे वाटते की रेप मेसेजेस पाठवणे हा राग व्यक्त करण्याचा चांगला आणि प्रभावी मार्ग आहे, असे डॉ. मेश्राम म्हणाले.
आपली ओळख लपवून सोशल मीडियावर स्त्रियांना त्रास देणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कडक कायदे असायला हवेत.
तुम्हालाही आई, बहीण असल्याने स्त्रियांकडे संवेदनशील नजरेने बघा, ही शिकवण देखील फारसा बदल घडवणार नाही. कारण याचा अर्थ असा होतो की स्त्री कमजोर आहे व तिला सुरक्षित राहण्यासाठी पुरुषांच्या मदतीची गरज आहे. तसंच कोणाच्या तरी आई आणि बहिणीप्रमाणे त्यांचा देखील आदर करण्याची गरज आहे. हा संदेश लोकांना मिळता कामा नये. कोणत्याही नात्याशिवाय पुरुषांनी स्त्रीचा आदर करायला शिकायला हवे, असे डॉ. Syeda म्हणाल्या.
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock