Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

स्तनांचा आकार लहान असल्यास दूध निर्मिती कमी प्रमाणात होते का ?

$
0
0

मी नवमाता असून माझे बाळ दोन महिन्यांचे आहे. मी बाळाच्या जन्मापासून त्याला दूध पाजते आणि मला ते नियमित करायचे आहे. परंतु, माझ्या सासूबाईंना असे वाटते की माझ्या दुधामुळे बाळाची भूक भागत नाही. याचे कारण म्हणजे माझ्या स्तनांचा आकार लहान आहे. म्हणून मी पुरेसं दूध तयार करण्यास सक्षम नाही, असे त्यांना वाटते. कधीही माझे बाळ रडले की त्या बोलतात, हिला पुरेसं दूध येत नाही म्हणून बाळाचे पोट भरत नाही. त्या मला फॉर्मुला फीडिंगचा सल्ला देतात. हे खरं आहे का? की ब्रेस्टच्या लहान आकारामुळे पुरेशा दुधाची निर्मिती होत नाही? मला खरंच फॉर्मुला फीडिंग करण्याची गरज आहे का?

या प्रश्नाचे उत्तर IBCLC, Certified Lactation Consultant, FORTIS La Femme आणि a member of Medela LC Club डॉ. अनिता शर्मा यांनी दिले.

जर तुम्हाला असे वाटते की ब्रेस्ट साईझ आणि दूधनिर्मिती याचा काही संबंध असतो? तर याचे उत्तर आहे, नाही. कारण ब्रेस्ट हे फॅटी टिशूने बनलेले असतात. त्यामुळे ब्रेस्टला आकार प्राप्त होतो व टिकून राहतो. ब्रेस्टचा आकार हा फॅटी टिशूच्या प्रमाणावर अवलंबून असतो. प्रत्येक स्त्रीच्या शरीरात असलेल्या Mammary gland दुधाची निर्मिती करते. बाळाला दूध पाजताना ब्रेस्टमध्ये कोणते बदल होतात ?

ब्रेस्टची साईझ काहीही असो,  mammary gland आवश्यक तितक्या दुधाची निर्मिती करते. म्हणून जर inverted nipple, कोणत्याही कारणाने दुधाचा कमी पुरवठा यांसारख्या समस्या नसल्यास तुम्ही बाळाला पुरेसं दूध तुम्हाला हवे तितके दिवस अगदी सहज देऊ शकता. स्तनपान देणार्‍या नवमातांसाठी खास ८ एक्सपर्ट टीप्स !

बाळाला हवे तितके दूध दिल्यानंतर देखील त्याला भूक लागत असेल तर त्यामागे नक्कीच काहीतरी वेगळे कारण असेल. ब्रेस्टची साईझ हे कारण नक्कीच नसेल. स्तनपान केल्यानंतर देखील बाळाला भूक लागण्याची काही कारणे: नवमातांचे दूध वाढवतील आयुर्वेदाने सुचवलेले हे ’5′ घरगुती उपाय

  • Improper latch
  • Inverted nipple
  • अपुरा दूध पुरवठा, याची अनेक कारणे आहेत.
  • बाळाच्या पोटात दुखणे
  • तुमचे आरोग्य

तुमचे स्तनपान योग्य पद्धतीने होते की नाही, हे तपासून बघण्यासाठी lactation expert चा सल्ला घेणे, योग्य ठरेल. स्तनपानाच्या काळात बाळाचे कमी वजन ही तुमच्या चिंतेची बाब आहे का?

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>