योगासनांमुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते. शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होते. मन शांत, प्रसन्न व ताणविरहीत होते. त्यामुळे निश्चितच तुम्हाला अधिक उत्साही व फ्रेश वाटते.
लो ब्लड प्रेशर असल्यास आर्टरीज आणि व्हेन्स मधून रक्ताचा प्रवाह कमी होतो. त्यामुळे मेंदू आणि इतर अवयवांना रक्त, ऑक्सिजन आणि पोषकतत्त्वे कमी प्रमाणात मिळतात. असे सातत्याने झाल्यास अवयव कायमचे निकामी होऊ शकतात. शारीरिक स्वास्थ्य उत्तम असून लो ब्लड प्रेशर असल्यास हा उत्तम आरोग्याचा संकेत आहे. पण चक्कर येणे, गरगरणे याबरोबर ब्लड प्रेशर लो होत असल्यास हा आरोग्य बिघडल्याचा संकेत आहे. या ’10′ कारणांमुळे येऊ शकते भोवळ !
लो ब्लड प्रेशर हे हृदयविकार, डिहायड्रेशन, certain endocrine आणि neurological disorders, इन्फेकशन या आजरांचे लक्षण आहे. योगसाधनेचा परिणाम लो ब्लड प्रेशरची कारणे व लक्षणे दोघांवर होतो. शरीरातील विविध संस्थांचे कार्य सुरळीत होते. रक्ताभिसरण सुधारते व मन शांत, प्रसन्न होते. ‘बीपी लो’ झाल्यास करा हे प्रथमोपचार !
- सर्वांगासन: सर्वांगासनामुळे मेंदूला होणारा रक्ताचा पुरवठा सुधारतो. तसंच थायरॉईड आणि पिट्युटरी ग्रंथींना चालना मिळते. त्यामुळे तुम्हाला रिफ्रेश आणि उत्साही वाटते. ताण हे देखील बीपी लो होण्याचे एक कारण आहे. म्हणून करा: सलंब सर्वांगासन- ताण दूर करण्याचा उपाय
- मत्सासन: लो ब्लड प्रेशर हा अनेक आजरांचा संकेत आहे. म्हणजेच डिहायड्रेशन, हार्ट फेल्युअर, इत्यादी. म्हणून फक्त रक्तदाब वाढवणारी आसने करण्यापेक्षा संपूर्ण आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असलेली आसने करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी मत्स्यासन हा अत्यंत उत्तम उपाय आहे. लो ब्लड प्रेशरला प्रतिबंध करणाऱ्या ६ एक्स्पर्ट टीप्स
- उष्ट्रासन: उष्ट्रासन केल्याने मेंदूला रक्ताचा उत्तम पुरवठा होतो. नर्व्हस सिस्टिमचे कार्य सुरळीत होते व पाठकण्याचे आरोग्य सुधारते. निरोगी स्वास्थ्यासाठी नियमित करा सूर्यनमस्कार !
- बालासन: मेंदूला होणारा रक्तपुरवठा सुधारतो व तुम्हाला शांत वाटते. त्यामुळे तुमचे ब्लड प्रेशर स्थिर रहाते.
ही आसने नियमित केल्यास तुम्हाला माहीत नसलेले आजार, समस्या दूर होण्यास मदत होते. आरोग्याची कोणतीही समस्या असो रक्तदाब सुरळीत राहिल्यास आरोग्यात लवकर सुधारणा होण्यास मदत होईल. आहारामध्ये हे ’6′ बदल करून कमी करा Low BP चा त्रास !
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock