केस पांढरे होणं हे वृद्धत्त्वाकडे जाण्याचे संकेत देत असत… पण आजकाल अकाली केस पांढरे होण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. केवळ तरूणांमध्ये नव्हे तर अनेक शाळकरी मुलांचेही केस पांढरे होतात. मग त्यांना लपवण्यासाठी केसांना रंग लावणं किंवा ते उपटणं हा काही कायमस्वरूपी किंवा आरोग्यदायी उपाय असू शकत नाही. म्हणूनच तुम्ही पहिला पांढरा केस पाहिल्यानंतर नेमके काय करावे ? याबाबतचा खास सल्ला ब्युटी एक्सपर्ट Janet Fernandez याने दिला आहे. पण एक पांढरा केस उपटल्याने अधिक पांढरे केस उगवतात का ?
- केस अगदीच लहान कापू नका -
वाढत्या वयानुसार अनेक स्त्रिया त्यांचे केस लहान करतात. अनेकदा केस टोकाऐवजी मूळाशी पांढरे असतात. त्यामुळे केस वाढवणं हे त्यांना लपवण्यास अधिक फायदेशीर ठरतं.म्हणूनच लेअरमध्ये केस कापणं टाळा. गरजेनुसार तुम्ही केस ट्रीम करू शकता. या ‘७’ एक्स्पर्ट टीप्सने सहज लपवा पांढरे केस!
- ऑईल बेस्ड डाईज -
तुम्हांला केसांना रंगवायचे असेल तर डाईज निवडताना ते ऑईल बेस्ड असतील याची खात्री करा. त्यामधील मॉईश्चर घटक केसांना चमक देतात. तसेच शाम्पू आणि कंडिशनरमुळे केसांचे /रंगाचे नुकसान होणार नाही अशा डाईजची निवड करा. म्हणजे केसांवरील रंग अधिक वेळ टिकून राहण्यासाठी मदत होईल. घरीच केस रंगवण्याचे ’6′ नैसर्गिक व सुरक्षित उपाय !
- मेहंदी -
पांढरे केस लपवण्यासाठी मेंहदी लावणं हा पर्याय वर्षानुवर्ष वापरला जातो. यामुळे केसांना चमक आणि पोषण मिळते. तसेच मेहंदीमुळे केसांना नैसर्गिकरित्या रंगही मिळतो. घरगुती तेलाच्या मिश्रणानेदेखील अकाली केस पांढरे होण्याची समस्या दूर होऊ शकते.
- बोअर ब्रिस्टल ब्रश -
मुळापासूनच तुमचे केस पांढरे होत असतील तर boar-bristle brush चा वापर करा. यामुळे केस पॉलिश होतात. तसेच ब्लो ड्राय केल्यानंतरही ते सरळ रेषेत रहायला मदत करतात.
- कॅफिनयुक्त पदार्थ कमी करा -
कॅफिनयुक्त पदार्थ कमी करा आणि अॅन्टिऑक्सिडंट मुबलक असणार्या ग्रीन टी चा आस्वाद घ्या. हेल्दी आणि स्ट्रॉग केसांसाठी फॉलिक अॅसिडयुक्त भाज्यांचा आहारात समावेश करा.
Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock