Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

ध्यान करण्यास उपयुक्त ठरतील ही योगासनं !

$
0
0

पतंजली योगसूत्रात हठयोगाचे महत्त्व सांगताना असे सांगितले आहे की, ध्यान करण्यासाठी शरीर व मनाला तयार करण्यासाठी हठयोग आहे. तसंच वजन कमी करण्यासाठी व शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी योगासने केली जातात. परंतु, या सगळ्याचे अंतिम उद्दिष्ट एकच आहे ते म्हणजे शरीर व मनाचा समतोल राखणे. योगसाधनेमुळे शरीर मोकळे होते आणि खुला श्वास घेऊ लागते. योगसाधनेमुळे शरीराबरोबरच मनाचे आरोग्य देखील सुधारते. आजकालचे धावपळीचे जीवन हे अनेक ताण तणावांनी भरलेले आहे. त्यावर मात करण्यासाठी ध्यान करणे हा अत्यंत उत्तम उपाय आहे. परंतु, ध्यान करणे सगळ्यांना जमतेच असे नाही. त्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतात. शरीर व मनाची तयारी करावी लागते. तसंच त्यासाठी काही योगासने केल्यास ध्यानात्मक स्थितीत खूप वेळ बसण्यासाठी शरीर तयार होते. योगा एक्स्पर्ट रमण मिश्रा यांच्या सल्ल्यानुसार ही आसने ध्यान करण्यासाठी तयार होण्यास मदत करतात.

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>