आजकाल शाळांमधील मुले सर्रास जंक फूड खातात. पालकांनी कितीही सांगितले तरी शाळेच्या कॅन्टीनमध्ये उपलब्ध असलेल्या पर्यायांचा मुले अगदी आवडीने आस्वाद घेतात आणि या पदार्थांमुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. परंतु, कॅन्टीनमध्येच हेल्दी पदार्थ विक्रीसाठी ठेवले तर ही समस्या उद्भवणार नाही. यासाठी महाराष्ट्र सरकारने एक पाऊल उचलेले आहे. घातक ‘जंकफ़ूड’ला आत्ताच दूर करण्याची ’10′ कारणे
महिला व बाल विकास मंत्रालय, नवी दिल्ली यांनी शाळेतील विद्यार्थांना अधिक मीठ, साखर आणि मेदयुक्त पदार्थ खाणे वर्जित करावे व आरोग्यास हितकारक पदार्थ खाण्यासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी हैद्राबादच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ न्यूट्रीशयनचे डायरेक्टर यांच्या अधिपत्याखाली एका समितीची स्थापना केली आहे.
त्या समितीनुसार शाळेच्या कॅन्टीनमध्ये जंक फूड विकण्यास महाराष्ट्र सरकारने बंदी घातली आहे. शाळेच्या उपहारगृहात HFSS Food (High in fat, salt and sugar) विकण्यास बंदी घालावी, असे समितीने सूचित केले आहे. त्याऐवजी काही हेल्दी पर्याय त्यांनी सुचवले आहेत. मुलांमध्ये वाढत चाललेले स्थूलतेचे आणि त्यासंबंधित आजारांचे प्रमाण लक्षात घेता सरकारने हा निर्णय घेतला आहे.
HFSS अन्नपदार्थांमध्ये खूप कमी प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. तसंच या पदार्थांच्या अति सेवनाने मुलांमध्ये स्थूलतेचा आणि इतर आजारांचा धोका वाढतो. याचा परिणाम मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर दिसून येतो. त्यामुळे हे अन्नपदार्थ शाळेच्या उपहारगृहात आढळणार नाहीत, याची दक्षता सर्व मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापनाने घ्यावी.
जंक फूड सारख्या आरोग्यास हानिकारक पदार्थांऐवजी चपाती, भात, भाजी, डाळी, राजमा, उपमा, खिचडी, इडली, वडा सांबार, नारळपाणी, लिंबू सरबत, जलजीरा हे पदार्थ उपहारगृहात विक्रीसाठी ठेवावे.
या समितीच्या अहवालानुसार साखर, मीठ व मेदाचा समावेश असलेल्या पदार्थांमुळे स्थूलता, मधुमेह, हृदयविकार, दातांच्या समस्या यांचा धोका वाढतो. तसंच, शरीरास हानिकारक असणारे HFSS Food च्या ऐवजी अन्य पोषक अन्नपदार्थांचे सेवन अधिकाधिक केल्याने होणारे फायदे याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करणे आवश्यक आहे. मुलांना हेल्दी खाण्याची सवय कशी लावाल ?
अनेक राज्य संलग्न शाळांमध्ये उपहारगृह नसली तरी शैक्षणिक विभागच्या सरकारी निर्यणयानुसार (GR) शाळांमध्ये जंक फूडला बंदी असून शाळेच्या परिसरात जंक फूड किंवा आधी शिजवलेले अन्नपदार्थ विकण्यास देखील सक्त मनाई आहे.
शाळांनी मुलांना आरोग्यदायी पदार्थ खाण्यासाठी प्रोत्साहित करायला हवे. यासाठी तज्ज्ञांची मदत घ्यावी. इंटरनेटवरून माहिती शोधावी, असे GR मध्ये म्हटले आहे.
छायाचित्र सौजन्य – Shutterstock