सिझरियननंतर व्यायाम किंवा कोणतीही अॅक्टिव्हिटी करताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. टाके भरून निघण्यास आणि शरीर पूर्ववत होण्यास काही वेळ लागतो. तसंच लगेचच वजन कमी होणे सोपे नसते. प्रसूतीनंतर वजन कमी होण्यास वेळ लागतो. आणि त्यात जर तुमचे सिझरियन असेल तर तुमच्या व्यायाम करण्यावर देखील खूप बंधन येतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार टाके आतून पूर्णपणे बरे होण्यास प्रसूतीनंतर सहा ते बारा आठवडे लागतात. त्याआधी तुम्ही वजन कमी करण्यासाठी व्यायाम करू शकत नाही. सिझेरियन प्रसुतीनंतर आठवड्याभरापासून महिनाभर काय त्रास होतो ?
Internationally Certified Child Birth, Lactation and Pregnancy Fitness Educator सोनाली शिवलानी यांनी सिझरियननंतर व्यायामाला सुरवात करण्यासाठी काही टिप्स दिल्या. वाढत्या सिझेरीयन डिलीवरीच्या प्रमाणाविरुद्ध सुर्वणा घोष यांचा लढा !
- चेकअप करा: सिझरियननंतर व्यायाम करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. मधुमेह तपासून घ्या.
- चालण्याचा व्यायाम करा: सिझरियननंतर वजन कमी करताना बेसिक एक्सरसाईजने फारसा परिणाम दिसून येत नाही. पण तुमच्या व्यस्त कामकाजातून वेळ काढून ३० मिनिटे अवश्य चाला. यामुळे नक्कीच परिणाम दिसून येईल. प्रसूतीनंतर येणाऱ्या नैराश्यावर मात करण्यासाठी करा योगसाधना !
- व्यायामाने शरीराची स्ट्रेंथ वाढावा: प्रसूतीनंतर प्रत्येक महिलेला आपले वजन आणि पोटाजवळील चरबी कमी करायची असते. परंतु, त्यासाठी अतिरिक्त व्यायाम करणे त्रासदायक ठरू शकते. त्याऐवजी शरीराच्या वरच्या भागाला व्यायाम मिळेल अशा प्रकारच्या एक्सरसाईज करा. कारण त्या वेळेस ब्रेस्ट मध्ये बदल होतात व त्यांना स्ट्रेंथ मिळण्यासाठी व्यायामाची गरज असते. तसंच पाय, पोटऱ्या टोन करणारे व्यायाम नक्की करा. गरोदरपणात स्त्रियांच्या शरीरात हे ’10′ बदल होतात
- पाठकण्याची काळजी घ्या: प्रसूतीनंतर पाठकण्याचे आरोग्य राखण्यासाठी व्यायाम करणे गरजेचे आहे. त्यामुळे पार्श्वभागाची स्ट्रेंथ वाढते. पाठदुखीवर आराम मिळतो. यासाठी रोज मार्जरासन, उष्ट्रासन आणि भुजंगासन करा.
- पेल्विक मसल्सकडे लक्ष द्या: गर्भारपणाच्या प्रत्येक टप्प्यात गर्भाशयाचा आकार वाढत जातो त्यामुळे पेल्विक मसल्सवर ताण येतो. यासाठी Kegels हा व्यायामप्रकार उत्तम आहे. प्रसूतीनंतर दिसणारे स्ट्रेच मार्क्स लेझर उपचारांनी दूर करता येतात का?
काय टाळायला हवे?
सिझरियननंतर व्यायाम करताना काळजी घेणे गरजेचे आहे. त्यापैकी काही गोष्टी.
- पोटाचे व्यायाम करणे टाळा: सिझरियननंतर ८-१२ आठवडे तरी पोटाचे व्यायाम करणे टाळा. पोटावर दाब येणारे, त्रासदायक ठरणारे किंवा ज्यामुळे टाके दुखावले जातील असे व्यायामप्रकार करणे टाळा. प्रसुतीनंतर वजन कमी करण्यासाठी बाळासोबत करा हे ५ व्यायाम
- शरीराकडे लक्ष द्या: प्रसूतीनंतर शरीराकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. कारण त्या काळात शरीरात अनेक बदल झालेले असतात. त्यामुळे ते पूर्ववत होण्यास शरीराला थोडा वेळ द्या. व्यायामाला हळूहळू सुरवात करा. एखाद्या दिवशी खूप थकवा जाणवल्यास आराम करण्यास काही हरकत नाही.
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock