रक्तामध्ये गुठळ्या होण्याची समस्या आटोक्यात ठेवण्यासाठी काही जणांना नियमित ब्लड थिनर्सच्या गोळ्या नियमित घ्याव्या लागतात. अनेक आजारांचा / आरोग्याच्या समस्या आटोक्यात ठेवण्यासाठी ब्लड थिनर्सच्या गोळ्या लाईफ सेव्हर ठरतात.त्यामुळे रक्ताभिसरणाच्या समस्या असणार्यांमध्ये ब्लड थिनर्स गोळ्या नियमित घ्याव्याच लागतात.
ब्लड थिनर्स हे दोन स्वरूपात असतात. Anticoagulants या heparin किंवा warfarin असतात.ज्यामुळे शरीरात केमिकल रिअॅक्शन होऊन रक्ताच्या गुठळ्या होण्याचं प्रमाण कमी होते. तर दुसर्या प्रकारचे ब्लड थिनर्स antiplatelet असतात. ज्यामध्ये अॅस्प्रीनचा समावेश होतो. ज्यामध्ये प्लेटलेट्स एकमेकांना चिकटत नाहीत, त्याच्या गुठळ्या होत नाहीत. deep vein thrombosis, हार्ट अटॅक,स्ट्रोक आणि atrial fibrillation सारख्या आजारांमध्ये अनेकजण रक्त पातळ राहण्यासाठी ब्लड थिनर्सचा वापर करतात. हृद्यविकाराचा झटका आल्यानंतर या 8 गोष्टींची मदत पटकन करा !
इतर औषधांप्रमाणेच ब्लड थिनर्सचादेखील शरिरावर दुष्परिणाम होतो. ब्लड थिनर्सच्या गोळ्यांमुळे दम लागणं, ब्रुझिंग किंवा अति प्रमाणात रक्त स्त्राव होणं अशा समस्या वाढतात. या समस्यांमुळे काही जण ब्लड थिनर्सच्या गोळ्या घेणं टाळतात. पण ब्लड थिनर्स गोळ्यांचे हे साईड इफेक्ट जीवघेणे नसतात. म्हणूनच ब्लड थिनर्स गोळ्या घेण्याबाबत नवी मुंबईच्या फोर्टिस हॉस्पिटल्सचे जनरल मेडिशन स्पेशॅलिस्ट डॉ. प्रदीप शहा यांनी दिलेला हा सल्ला नक्की जाणून घ्या.
- ब्लड थिनर्स गोळ्या घेणं राहून गेलं तर… ?
ब्लड थिनर्स गोळ्यांचा परिणाम शरीरात खूप काळ राहतो. त्यामुळे ब्लड थिनर्सच्या गोळ्या घेणारी व्यक्ती त्यांच्या दातांवर कोणती ट्रिटमेंट घेत असेल तर आम्ही शक्यतो त्यांना किमान 3-4 दिवस आधी गोळ्या न घेण्याचा सल्ला देतो.त्यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान रक्तस्त्राव होणार नाही याची दक्षता घेतली जाते. त्यामुळे ब्लड थिनर्सच्या गोळ्या न घेतल्याने आरोग्यावर लगेगच गंभीर परिणाम होत नाही. पण याचा अर्थ असा नाही की सलग 4-5 डोस विसरणं योग्य आहे. डॉ. शहा यांच्या सल्ल्यानुसार, रुग्ण नेमके कशासाठी ब्लड थिनर्स घेत आहे. यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. सौम्स आजारांवर घेत असलेल्या ब्लड थिनर्सच्या गोळ्या घेणं राहिल्यास ते फारसे त्रासदायक ठरणार नाही. पण स्ट्रोक किंवा हार्ट अटॅकच्या रुग्णांनी ब्लड थिनर्सच्या गोळ्या घेणं विसरल्यास खूपच त्रासदायक ठरू शकतं त्यामुळे या रुग्णांनी मुळीच ब्लड थिनर्सच्या गोळ्यांचा डोस लक्षात ठेवा आणि घ्या.या ’7′ उपायांनी लक्षात ठेवा तुमच्या औषधांच्या वेळा !
काही गंभीर आजारामध्ये ब्लड थिनर्सच्या गोळ्या घेणं थांबवल्यास रक्ताच्या गुठळ्या होण्याचं प्रमाण वाढू शकते. केवळ शस्त्रक्रियेच्या दरम्यान ब्लड थिनर्स गोळ्या घेणं टाळलं जातं. म्हणजे अनेक गुंतागुंत कमी केली जाते.
Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock