Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

फ्रीजमधील थंडगार पाणी पिण्याची सवय आरोग्याला ठरू शकते घातक !

$
0
0

कडक उन्हाळ्याला सुरुवात झालीय.उन्हाच्या वाढत्या काहिलीपासून वाचण्यासाठी प्रत्येकजण काहीतरी प्रयत्न करीत असतो.कामानिमित्त दुपारी बाहेर जावे लागल्यास उन्हाच्या झळा तीव्रतेने जाणवतात.सहाजिकच त्यावर मात करण्यासाठी उन्हातून घरी आल्यावर अनेकजण थेट फ्रीजमधले थंडगार पाणी पितात.काही लोकांना बर्फाचे पाणी पिणे अथवा सरबतामध्ये बर्फ टाकून ते पिणे देखील फार आवडते.पण लक्षात ठेवा बर्फाचे तुमच्या शरीरावर दुष्परिणामच होत असतात.बर्फाचे पाणी अथवा थंड पाणी पिण्याने तुम्हाला तात्पुरते बरे वाटते.तुम्हाला असे बर्फाचे थंड पाणी पिण्याची नियमित सवय लागली तर त्याचे तुमच्या शरीरावर विपरित परिणाम नक्कीच होऊ शकतात. पण फ्रीज शिवाय पाणी थंडगार करण्याचे 4 नैसर्गिक मार्ग ! तुम्हांला ठाऊक आहेत का

जाणून घ्या बर्फाचे अथवा थंड पाणी न पिण्यामागची ही काही कारणे-

१.तुमच्या पचनशक्तीच्या कार्यात अडथळा येतो-

थंड पाण्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्या आंकुचित होतात ज्याचा परिणाम तुमच्या पचनशक्तीवर होतो.पचनक्रियेवर परिणाम झाल्याने तुमच्या शरीरातील अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही व त्यामुळे अन्नातील पोषकमुल्ये शरीराला मिळू शकत नाही.यासाठी कोमट की थंड पाणी ? निरोगी स्वास्थ्यासाठी कोणता पर्याय निवडाल हे देखील अवश्य वाचा.

२.पोषणमुल्यावर परिणाम होतो-

शरीराचे तापमान साधारणपणे ३७ अंश सेल्सिअस असते.पण जेव्हा तुम्ही कमी तापमान असलेले पेय पिता तेव्हा तुमच्या शरीराला बदललेले तापमान संतुलित करण्यासाठी उर्जा खर्च करावी लागते.अन्नाचे पचन करणे,पोषणमुल्ये शोषून घेणे यासाठी वापरण्यात येणारी उर्जा तापमान संतुलित करण्यासाठी वापरल्यामुळे शरीराला पोषणमुल्ये कमी प्रमाणात मिळतात.

३.घसा खवखवण्याची शक्यता वाढते-

जेव्हा तुम्ही थंड पाणी पिता तेव्हा तुमच्या श्वसनमार्गामधील श्लेष्मल थराचा भाग वाढतो.या भागातील श्लेष्मल थरामुळे श्वसनमार्ग संवेदनशील होतो ज्यामुळे विविध इनफेक्शन होऊन घसा खवखवण्याची शक्यता देखील वाढते.

४.तुमचे हार्ट रेट कमी होतात-

थंड अथवा बर्फाचे पाणी पिण्यामुळे तुमच्या ह्रदयाचे ठोके वाढू लागतात.संशोधनानूसार बर्फाचे पाणी पिण्याने तुमची vagus nerve उत्तेजित होते.vagus nerve ही १० वी cranial nerve असून ती शरीराच्या सर्व कार्यावर नियंत्रण ठेवाणा-या स्वायत्त मज्जासंस्थेचा एक महत्वाचा भाग असते.vagus nerve ह्रदयाचे ठोके कमी करण्यासाठी कारणीभूत असते.थंड अथवा बर्फाचे पाणी पिण्याने vagus nerve उत्तेजित होते व तुमच्या ह्रदयाचे ठोके कमी होतात.यासाठी फ्रीजमधील थंड पाण्याला पर्याय मातीच्या माठातून पाणी पिण्याचे ‘७’ फायदे !जरुर जाणून घ्या

1. Chiang CT, Chiu TW, Jong YS, Chen GY, Kuo CD. The effect of ice water ingestion on autonomic modulation in healthy subjects. Clin Auton Res. 2010 Dec;20(6):375-80. doi: 10.1007/s10286-010-0077-3. Epub 2010 Aug 1. PubMed PMID:20680385.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles