May 8 - World Thalassemia Day
Thalassemia हा एक असा विकार आहे ज्या विकारामध्ये शरीरातील हिमोग्लोबिनची निर्मिती असामान्य होते.हिमोग्लोबिनच्या निर्मितीमध्ये बिघाड झाल्यामुळे योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही ज्यामुळे रुग्णाच्या रक्तातील लाल पेशी नष्ट होतात.थॅलेसेमिया ग्रस्त रुग्णांच्या रक्तात लाल रक्त पेशी कमी प्रमाणात असून त्यांना सौम्य अथवा तीव्र अॅनिमिया ही समस्या देखील असते.थॅलेसेमिया ग्रस्त रुग्णांमध्ये तीव्र अॅनिमिया असल्यास त्यांना सतत ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज भासते.
अशा रुग्णांना सतत,स्वयंसेवी व विनामुल्य रक्तदान करणा-या रक्तदात्यांमुळे पुरेश्या प्रमाणात व सुरक्षित रक्तपुरवठा निश्चित करता येऊ शकतो.मात्र असे असले तरी रक्तदानाबाबत लोकांच्या मनात अनेक समज-गैससमज असतात.रक्तदान केल्यामुळे रक्तदाता अशक्त व रोगी होतो किंवा सतत रक्तदान केल्यामुळे रक्तदात्याच्या शरीरातील रक्ताचे नुकसान होते असे गैरसमज अनेकांच्या मनात असतात.खरेतर रक्तदान व ब्लड ट्रान्सफ्युजन मुळे एखाद्याचा जीव वाचवता येऊ शकतो.यासाठी रक्तदानाबाबत हे ’10′ गैरसमज आजच दूर करा !
१. ब्लड ट्रान्यफ्युजन मुळे रुग्णाला जीवदान मिळते व त्या रुग्णाचे आरोग्य देखील सुधारते.
ब्लड ट्रान्यफ्युजन मुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो हे जरी खरे असले तरी सुरक्षित रक्त वेळेवर न मिळाल्यामुळे अनेक गरजू रुग्णांना आजही वेळेवर रक्त पुरवठा करता येऊ शकत नाही.अशा रुग्णांना सुरक्षित ब्लड ट्रान्यफ्युजन करण्यासाठी जवळजवळ सर्वच देशांमध्ये एचआयव्ही,हिपॅटायटीस व इतर इनफेक्शनपासून सुरक्षित अशा रक्ताची मुबलक प्रमाणात व विनामुल्य पुरवठा करण्याची गरज असते.तसेच ब्लड ट्रान्सफ्युजनने ‘बीग बीं’नी गमावले 75% लिव्हर ! पण हा धोका आज तुम्हांलाही आहे का ?हे देखील जरुर वाचा.
२.विविध उपचारांसाठी ब्लड ट्रान्सफ्युजनची मदत होते.
उच्च उत्पन्न असणा-या देशांमध्ये ब-याचदा रुग्णांवर अनेक आधुनिक उपचार करण्यासाठी व ओपन-हार्ट सर्जरी सारख्या अवघड शस्त्रक्रियांसाठी ब्लड ट्रान्सफ्युजन चा वापर करण्यात येतो.तर कमी व मध्यम उत्पन्न असणा-या देशांमध्ये ब्लड ट्रान्सफ्युजनचा वापर प्रेगन्सीमधील गुंतागंतीच्या जटील समस्या,लहानपणापासून असणा-या मलेरियातील तीव्र अशक्तपणा ,दुुखापतीमध्ये होणा-या गंभीर समस्या यासाठीच केला जातो.
३.रुग्णांना सुरक्षित व योग्य प्रमाणात लागणा-या रक्ताचा पुरवठा केवळ नियमित,स्वयंसेवी व विनामुल्य रक्तदान करण्या-या रक्तदात्यांमुळेच केला जाऊ शकतो.
रुग्णांना सुरक्षित व योग्य प्रमाणात लागणा-या रक्ताचा पुरवठा केवळ नियमित,स्वयंसेवी व विनामुल्य रक्तदान करण्या-या रक्तदात्यांमुळेच केला जाऊ शकतो कारण अशा रक्तदात्यांमध्ये ब्लड इनफेक्शन असण्याचा धोका कमी असतो.तसेच अनेक रक्तदाते केवळ त्यांच्या कुटूंबातील व्यक्तींना रक्ताची गरज असल्यास किंवा एखाद्याला पैशांची गरज असल्यासच रक्तदान करतात.
४.बासष्ट देशात स्वयंसेवी विनामुल्य रक्तदानाची संख्या १०० टक्के आहे.
२००४ पासून जागतिक रक्तदाता दिनाची सुरुवात झाली.या माध्यमातून १११ देशांतून स्वयंसेवी रक्तदानाच्या संख्येत वाढ झाली आहे.मात्र चाळीस देशांमधून २५ टक्क्यांपेक्षा कमी रक्तपुरवठा स्वयंसेवी विनामुल्य रक्तदानाच्या माध्यमातून केला जातो.
५.दरवर्षी जगभरातून जवळजवळ ९२ दशलक्ष रक्तदान गोळा केले जाते.
जगभरातील ८५ टक्के लोकसंख्या समाविष्ट असलेल्या कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमधून यापैकी ५० टक्के रक्तदान गोळा केले जाते.कमी उत्पन्न असलेल्या देशांपेक्षा उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये या रक्तदानाचा सरासरी दर हा १३ पटीने अधिक आहे.
६.ब्लड सेंटर मधील रक्त संकलन हे उत्पन्न गटानूसार बदलू शकते.
१५९ देशांमधील ८,००० ब्लड सेंटरमधील प्रत्येक सेंटरवर सरासरी १०,००० रक्तदान केले जाते(याची श्रेणी २० ते जवळजवळ ५,००,००० आहे).प्रत्येक ब्लड सेंटरवरील वार्षिक सरासरी रक्तदान हे उच्च उत्पन्न देशांमध्ये ३०,०००,मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ७,५०० तर कमी उत्पन्न असलेल्या देशामध्ये ३,७०० इतके असते.
७.कमी उत्पन्न असलेल्या देशाच्या तुलनेत उच्च उत्पन्न असलेल्या देशांमधील लोक अधिक वेळा रक्तदान करतात.
उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये हजार लोकांमागे रक्तदानाचा दर ३६.४ आहे.हाच दर मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये लोकांमागे हजार लोकांमागे ११.६ तर कमी उत्पन्न असलेल्या लोकांमध्ये २.८ आहे.
७.रक्तदान केलेले रक्ताची चाचणी गरजेचे अाहे.
रक्तदान झालेले रक्त रुग्णाच्या शरीरात ट्रान्सफ्युजन करण्यापूर्वी ते एचआयव्ही,हिपॅटायटीस बी,हिपॅटायटीस सी व सिलीफिस रोगांपासून सुरक्षित असल्याची चाचणी करणे गरजेचे असते.असे असले तरीही आजही ३९ देशांमध्ये रक्तदानातून गोळा केलेल्या रक्ताच्या या चाचण्या केल्या जात नाहीत.काही देशांमध्ये या चाचण्या कर्मचा-यांच्या कमतरते अभावी,खराब क्वालिटी टेस्ट कीट,अनियमित पुरवठा किंवा प्रयोगशाळेतील सेवांच्या अभावामुळे केल्या जात नाहीत.यासाठी हिपॅटायटिस – कारणे, लक्षणं आणि निदान !जरुर जाणून घ्या.
९.एका ब्लड युनिटचा अनेक रुग्णांना फायदा होऊ शकतो.
एका व्यक्तीच्या रक्ताचे निरनिराळ्या घटकांमध्ये विभाजन केल्यामुळे एकच ब्लड युनिट अनेक रुग्णांना त्यांच्या गरजेनूसार वापरता येऊ शकते.गोळा झालेल्या रक्तातील घटकांचे विभाजन उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ९१ टक्के,मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ७२ टक्के तर कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ३१ टक्के या प्रमाणात केले जाते.
१०.आवश्यक्ता नसताना केलेल्या ब्लड ट्रान्सफ्युजन मुळे रुग्णाच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
ब्लड ट्रान्सफ्युजन करण्याचा सल्ला तेव्हाच देण्यात येतो जेव्हा हा पर्यायी उपचार रुग्णांसाठी सुरक्षित व प्रभावी असतो.पण कधीकधी रुग्णाला ब्लड ट्रान्सफ्युजनची आवश्यक्ता नसते अशावेळी गरज नसताना केलेल्या ट्रान्सफ्युजन मुळे रुग्णाच्या आरोग्याला इनफेक्शन अथवा इतर गंभीर दुष्परिणांमाचा धोका निर्माण होऊ शकतो.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock