मी ३२ वर्षांची विवाहित महिला असून मला दोन मुलं आहेत. नुकतेच मला जाणवले की माझ्या ब्रा ची एक बाजू काहीशी हलकी वाटतेय. तेव्हा मी जवळून बघितलं तर माझ्या लक्षात आलं की माझा डाव्या बाजूचा ब्रेस्ट उजव्या ब्रेस्ट पेक्षा मोठा आहे. तेव्हापासून मी इंटरनेटवर त्याबद्दल बरंच काही वाचलं आणि मला काळजी वाटू लागली. कृपया मला याबद्दल सांगा. यात काही काळजी करण्यासारखे आहे का?
या प्रश्नाचे उत्तर मुंबई येथील वाशीच्या वर्ल्ड ऑफ वूमनच्या डिरेक्टर आणि स्त्रीरोग तज्ञ व फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉ. बंदिता सिन्हा यांनी दिले.
सामान्यपणे एक ब्रेस्ट दुसऱ्या ब्रेस्टपेक्षा काहीसा मोठा असतो आणि यात कोणत्याही काळजीचे कारण नाही. खूप कमी महिल्यांचे दोन्ही ब्रेस्ट योग्य आकारात असतात. पण जर एका ब्रेस्टची साईझ अचानक वाढलेली दिसत असेल तर तुम्हाला शक्य तितक्या लवकर स्त्री रोग तज्ज्ञांची भेट घेणे गरजेचे आहे. जाणून घ्या स्त्रीयांच्या स्तनाबद्दल काही आश्चर्यकारक गोष्टी
- स्तनपान: जर तुम्हाला नुकतंच बाळ झालं असेल किंवा तुम्ही बाळाला स्तनपान करत असाल तर एक ब्रेस्ट दुसऱ्यापेक्षा मोठा दिसेल. याचे कारण असे असू शकते की, एका ब्रेस्टमध्ये दुसऱ्या ब्रेस्ट इतकी दूधनिर्मिती होत नसेल. काही वेळा बाळाला एका ब्रेस्टमधून अधिक वेळा दूध दिल्याने त्या ब्रेस्टमध्ये जास्त दूधनिर्मिती होते. जर तुम्ही असे करत नसाल तरी काळजीचे काही कारण नाही. बाळाला दूध पाजताना ब्रेस्टमध्ये कोणते बदल होतात ?
- सिस्ट: ब्रेस्टमध्ये फ्लुईड फिल्ड सॅकची निर्मिती झाल्यास ब्रेस्टचा आकार तात्पुरता वाढलेला दिसतो. हा सुरवातीचा टप्पा असून याचे निदान डॉक्टर व्यवस्थित करू शकतील. ब्रेस्टचे आरोग्य जपण्यासाठी काही ’7′ खास टिप्स
- इन्फेकशन: काही वेळा ब्रेस्टमध्ये mastitis टिशूंची निर्मिती होते. याचा परिणाम ब्रेस्टवर होतो आणि ब्रेस्ट दुखू लागतात. निप्पल्स मधून स्त्राव बाहेर पडतो व ब्रेस्टला सूज येते. जर तुम्हाला ही तीनही लक्षणे जाणवली तर ब्रेस्टचा आकार वाढण्याचे कारण mastitis टिशू असू शकते. यासाठी शक्य तितक्या लवकर डॉक्टरांकडून तपासून घ्या. स्त्री शरीरात या ’6′ टप्प्यांवर होतात Breast च्या आकारात बदल !
- Breast abscesses: ब्रेस्टमध्ये पू तयार होऊन ते खूप दुखू लागते. त्यामुळे ब्रेस्टचा आकार मोठा दिसतो. काही वेळा यामुळे ताप देखील येतो.
- ब्रेस्ट ट्युमर किंवा ब्रेस्ट कॅन्सर: ब्रेस्टमध्ये अॅबनॉर्मल टिशू किंवा ट्युमरची वाढ होते. त्यामुळे ते मोठे दिसू लागतात. ट्युमर सुरवातीच्या टप्प्यात असल्यास काळजीचे काही कारण नाही. पण त्याची वाढ झाल्यास शक्य तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या. ही ’6′ लक्षणं देतात ‘ब्रेस्ट कॅन्सर’चा संकेत !
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock